राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील 9 महत्त्वाचे मुद्दे

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. अत्यंत संयमी, सौम्य आणि शांततेत राहुल गांधी यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. काँग्रेस कार्यकर्त्यांवरील विश्वास त्यांनी बोलून दाखवला. राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील 9 महत्त्वाचे मुद्दे : मुद्दा क्रमांक – 01 काँग्रेस कार्यकर्ते ‘बब्बर शेर’ आहेत. काँग्रेसच्या […]

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील 9 महत्त्वाचे मुद्दे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. अत्यंत संयमी, सौम्य आणि शांततेत राहुल गांधी यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. काँग्रेस कार्यकर्त्यांवरील विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील 9 महत्त्वाचे मुद्दे :

मुद्दा क्रमांक – 01

काँग्रेस कार्यकर्ते ‘बब्बर शेर’ आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलंय की, आम्ही काय आहोत ते! – राहुल गांधी

मुद्दा क्रमांक – 02

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी जे केले, त्यासाठी त्यांचे आभार मानतो. मात्र आता बदल झालाय. आम्ही आणखी काम करु राज्याला पुढे नेऊ – राहुल गांधी

मुद्दा क्रमांक – 03

शेतकरी, युवा, लघुद्योजक इत्यादी सर्वांना जी आश्वासनं दिलीत, ती पूर्ण करु. विशेषत: रोजगार आणि शेतकऱ्यांच्या समस्या, हे आमच्या समोरील सर्वात महत्त्वाचे मुद्दे असतील – राहुल गांधी

मुद्दा क्रमांक – 04

विरोधक एकत्र लढतील, हे निश्चित आहे, आम्ही किती एकजुटीने एकत्र आहोत, हेही तुम्ही पाहिले असालच – राहुल गांधी

मुद्दा क्रमांक – 05

सगळ्या विचारधारांचा मी आदर करतो. आम्ही भाजपच्या विचारधारेविरोधात लढू, त्यांना पराभूत करु. आताही पराभव केलंय, 2019 साली पण पराभव करु.मात्र आम्ही त्यांना देशातून ‘मुक्त’ करणार नाही – राहुल गांधी

मुद्दा क्रमांक – 06

मुख्यमंत्रिपदाच्या नावासाठी कुठेही अडचण नाही, ती प्रक्रिया सहज पूर्ण होईल – राहुल गांधी

मुद्दा क्रमांक – 07

देशाला व्हिजन देण्यात मोदी आणि भाजप पूर्णपणे पराभूत झाले आहेत. देशात परिवर्तन घडवण्याची चार वर्षांपूर्वी मोदींना मोठी संधी होती, मात्र दुर्दैवाने, देशवासियांच्या मनातील गोष्ट त्यांनी ऐकलीच नाही – राहुल गांधी

मुद्दा क्रमांक – 08

मी स्पष्ट सांगू? शेतकऱ्यांच्या समस्यांवरील उपाय खूप कठीण आहेत, मात्र एक नक्की, की आम्ही ते उपाय शोधू आणि अंमलात आणू – राहुल गांधी

मुद्दा क्रमांक – 09

भले काँग्रेस जिंकली असेल, पण ईव्हीएमबाबतची शंका ही कायम आहे, कारण ईव्हीएमबाबत काही मुलभूत प्रश्न आहेत – राहुल गांधी

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.