इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या निधनावर भारतात एक दिवसाचा राजकीय दुखवटा

इराणचे राष्ट्राध्यक्ष रायसी यांच्या निधनावर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. अनेक देशांच्या प्रमुखांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. भारताने देखील एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेत रायची यांच्यासह नऊ जणांचा मृत्यू झाला होता.

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या निधनावर भारतात एक दिवसाचा राजकीय दुखवटा
Follow us
| Updated on: May 20, 2024 | 6:21 PM

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी आणि परराष्ट्र मंत्री यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले आहे. त्यांच्या निधनावर भारत सरकारने देखील २१ मे रोजी देशात एक दिवसाचा राजकीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितले की, मृत व्यक्तींच्या स्मरणार्थ, भारत सरकारने 21 मे रोजी संपूर्ण भारतामध्ये एक दिवसाचा राजकीय शोक पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी भारतातील सर्व इमारतींवर राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल. या दिवशी कोणतेही अधिकृत कार्यक्रम होणार नाहीत.

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे रविवारी निधन झाले. अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्यासोबत ते धरणाचे उद्घाटन करणार होते. पण यादरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. त्यांच्या ताफ्यातील दोन हेलिकॉप्टर सुखरूप पोहोचले पण ते ज्या हेलिकॉप्टरमध्ये होते त्याला अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच इराणचे सुरक्षा दल आणि बचाव अधिकारी घटनास्थळी रवाना झाले होते.

राष्ट्रपतींसह 9 जणांचा मृत्यू

इराणच्या वायव्य भागातील डोंगराळ भागात खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टरला अपघात झाला. रविवारी रात्री उशिरापर्यंत त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नव्हती. सोमवारी सकाळी इराणने राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या मृत्यूची पुष्टी झाली. या अपघातात हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारे राष्ट्राध्यक्ष रायसी यांच्यासह ९ जणांचा मृत्यू झालाय.

पीएम मोदींनी व्यक्त केला शोक

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. ते म्हणाले, “इराणचे इस्लामिक प्रजासत्ताक राष्ट्राध्यक्ष डॉ. सय्यद इब्राहिम रायसी यांच्या दुःखद निधनाने अत्यंत दु:ख आणि धक्का बसला आहे. भारत-इराण द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यात त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांचे कुटुंब आणि इराणच्या लोकांप्रती माझ्या संवेदना. या दु:खाच्या काळात भारत इराणच्या पाठीशी उभा आहे.

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्यासोबत भारताचे चांगले संबंध होते. त्यांच्या काळात भारत आणि इराण या दोन्ही देशांमध्ये अनेक करार झाले. काही दिवसांपूर्वीच चाबहार बंदराबाबत भारत आणि इराण या दोन्ही देशांमध्ये करार झाला होता.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.