अंधश्रद्धेचा कहर किती? उत्तर प्रदेशात एका व्यक्तीनं थेट घेतली ब्लेड अन्….

संपतने नेमक्या कोणत्या नवसासाठी देवीसमोर अशा प्रकारे जीभ कापून ठेवली, हे पत्नीलाही ठाऊक नाही. मात्र त्याने एकाएकी असे कृत्य केल्यानंतर पत्नीलाही सावरणं मुश्कील झालं. 

अंधश्रद्धेचा कहर किती? उत्तर प्रदेशात एका व्यक्तीनं थेट घेतली ब्लेड अन्....
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 8:51 PM

गाझियाबादः अंधश्रद्धेच्या (Superstitious)आहारी जाण्याचा एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) समोर आलाय. कोशंबी जिल्ह्यात एका भक्तानं थेट स्वतःची जीभच छाटून देवीसमोर ठेवली. कोशंबी येथील शक्तिपीठ कडा धाम येथील शीतला मातेच्या मंदिरात (Temple) हा धक्कादायक प्रकार घडला. आज शनिवारी सकाळी सदर व्यक्ती, त्याच्या पत्नीसोबत मंदिरात आला होता. मात्र पतीने देवीला नमस्कार केल्यानंतर थेट खिशातून ब्लेड काढली आणि जीभ छाटून देवीसमोर ठेवली. त्यामुळे परिसरात खळबळ माजली.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, संपत आणि बन्नोदेवी हे दाम्पत्य हे पती पत्नी आज सकाळी कऱ्हा येथील शीतला माता मंदिरात गेले होते. मंदिराजवळ गंगेत डुबकी मारल्यानंतर दोघेही मंदिराच्या दिशेने निघाले.

देवीचं दर्शन घेतलं. प्रदक्षिणा मारल्या. त्यानंतर देवीसमोर पुन्हा एकदा हात जोडले. त्याचवेळी संपतने एकाएकी खिशातून ब्लेड काढली आणि जीभ कापली.

थरारत्या हातानं रक्तबंबाळ अवस्थेतील जीभ हातात घेतली आणि मंदिराच्या उंबऱ्यावर ठेवली. हे दृश्य पाहून पत्नी प्रचंड घाबरली. तिला कापरं भरलं. परिसरातील उपस्थित भाविक मदतीला धावले.

या घटनेनंतर संपतला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

पत्नीनं पोलिसांना याविषयी अधिक माहिती दिली. शुक्रवार रात्रीपासूनच संपतने मंदिरात जाण्यासाठी हट्ट धरला होता. शनिवारी सकाळीच दोघे दर्शनासाठी गेले.

मात्र संपतने नेमक्या कोणत्या नवसासाठी देवीसमोर अशा प्रकारे जीभ कापून ठेवली, हे पत्नीलाही ठाऊक नाही. मात्र त्याने एकाएकी असे कृत्य केल्यानंतर पत्नीलाही सावरणं मुश्कील झालं.

उत्तर प्रदेशातील कोशंबी जिल्ह्यात घडलेल्या या प्रकारामुळे अंधश्रद्धेचा किती कहर केला गेलाय, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.