वंदे भारत चालवणारी महिला लोको पायलट ही मोदींच्या शपथविधीला राहणार उपस्थित
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. ९ जून रोजी संध्याकाळी हा शपथविधी सोहळा पार पडणार असून याला ८ हजार लोकं उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. यावेळी काही विशिष्ट लोकांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहे. ९ जून रोजी मोदी मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. या शपथविधी सोहळ्याला अनेक देश-विदेशातील पाहुणे सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी एकूण 8 हजार विशेष पाहुण्यांना निमंत्रण पाठवण्यात आल्याची माहिती आहे. या पाहुण्यांमध्ये नरेंद्र मोदी आणि नवीन सरकारच्या शपथविधी समारंभाला उपस्थित असलेल्या विशेष पाहुण्यांमध्ये दक्षिण रेल्वेच्या चेन्नई विभागातील वरिष्ठ सहाय्यक लोको पायलट ऐश्वर्या एस मेनन यांचा देखील समावेश आहे.
वंदे भारत ट्रेनवर लोको पायलट
ऐश्वर्या एस मेनन हिने वंदे भारत ट्रेन तसेच जन शताब्दी सारख्या विविध ट्रेनमध्ये लोको पायलट म्हणून काम केले आहे. चेन्नई-विजयवाडा आणि चेन्नई-कोइम्बतूर वंदे भारत एक्सप्रेस सेवा सुरू झाल्यापासून ऐश्वर्याने लोको पायलट म्हणून काम करत आहे. ऐश्वर्या ही एक हुशार लोको पायलट आहे. तिची चपळ अचूकता, सतर्कता आणि रेल्वे सिग्नलिंगचे सखोल ज्ञान यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तिने प्रशंसा देखील मिळवली आहे.
10 लोको पायलट सहभागी होणार
आशियातील पहिली महिला लोको पायलट सुरेखा यादवही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर वंदे भारत ट्रेन त्या चालवतात. PM मोदींच्या शपथविधी सोहळ्यात एकूण 10 लोको पायलट सहभागी होणार आहेत. सुरेखा यादव 1988 मध्ये भारतातील पहिली महिला ट्रेन चालक बनल्या होत्या. त्या सेमी-हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेसची पहिली महिला लोको पायलट देखील होत्या. नवीन सरकारच्या शपथविधी समारंभात स्वच्छता कामगार, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर काम करणारे ट्रान्सजेंडर आणि मजूर देखील विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित आहेत.
सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होत आहेत. याआधी हा मान फक्त पंडित नेहरु यांना मिळाला आहे. मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्यात एकून १८ जण मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. ९ जून रोजी ६.३० वाजता हा शपथविधी सोहळा सुरु होणार आहे.