Gyanvapi Masjid Case: नमाजासाठी लोक मोठ्या संख्येने ज्ञानवापीत पोहोचले, शुक्रवारच्या संदर्भात आधीच अलर्ट जारी करण्यात आला होता
ज्ञानवापीवरील सुनावणीदरम्यान शुक्रवारच्या नमाजबाबत जिल्हा प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वजूच्या पाण्याची व्यवस्था करण्याबरोबरच दोन ड्रम आणि वजूसाठी तांब्याचीही व्यवस्था ही करण्यात आली आहे.
वाराणसी : ज्ञानवापीच्या (Gyanvapi mosque) सत्यावरून देशात हिंदु-मुस्लिम पक्षाकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. तर त्या मशीदीत नक्की काय आहे. याकडे देशाच्या नजरा खिळल्या आहेत. मात्र याचा निर्णय आता न्यायालयात होणार असून त्यावर अजून सुनावणी सुरू आहे. तर याबाबतच आज अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) होण्याची शक्यता आहे. तर यादरम्यान मागितलच सुनावणी वेळी न्यायालयाने येथे कोणालाही सोडू नये असे सक्त आदेश जिल्हा प्रशासना दिले होते. मात्र आज मुस्लिमांकडून या आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्याचे बोलले जात आहे. आज शुक्रवार (जुम्मा) असून अठवड्याच्या नमाजसाठी (Jumma Prayer) मोठ्या संख्येने लोक ज्ञानवापी येथे पोहोचले होते. दरम्यान, मोठ्या संख्येने लोक आल्यानंतर मशीद समितीला या आदेशाची लोकांना आठवन करून देण्यासाठी आवाहन करण्याची वेळ आली. तसेच लोकांनी दुसऱ्या मशीदीत जाऊन नमाज अदा करावी, असेही मस्जिद कमिटीच्या वतीने सांगण्यात आले. शुक्रवारची नमाज अदा करण्यासाठी लोक त्यांच्या घरी किंवा जवळच्या मशिदीत जातात. दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनही सज्ज करण्यात आल्याचे दिसून येत होते.
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
ज्ञानवापी मशीद-श्रृंगार गौरी वादावर सुप्रीम कोर्टात तीन वाजता सुनावणी होणार आहे. यादरम्यान पाहणी अहवाल समोर आल्यानंतर सर्वांच्या नजरा त्या सुनावणीकडे लागल्या होत्या. शुक्रवारच्या नमाजच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. लखनौ, वाराणसी, प्रयागराज, कानपूर, अलीगढ आणि आग्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये विशेष खबरदारी घेण्याचा संदेश देण्यात आला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी आणि अफवा रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात आली आहेत. या दरम्यान मुस्लिम भागात पोलीस बंदोबस्त पूर्णपणे सज्ज असेल.
वजूबाबत जिल्हा प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता
ज्ञानवापीवरील सुनावणीदरम्यान शुक्रवारच्या नमाजबाबत जिल्हा प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वजूच्या पाण्याची व्यवस्था करण्याबरोबरच दोन ड्रम आणि वजूसाठी तांब्याचीही व्यवस्था ही करण्यात आली आहे. ज्ञानवापी मशिदीच्या आत नमाज पठन करणाऱ्यांना वजूसाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून हे करण्यात आले आहे. दरम्यान, सीलबंद वजूची जागा सुरक्षित ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. धर्मीक नेते आणि धर्मगुरूंनाही परस्पर सौहार्द राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हिंदू पक्षकारांचा काय आहे दावा?
काशी विश्वनाथ धाम– ज्ञानवापी परिसर स्थित गौरी स्वयंभू आदि विश्वेश्वरनाथच्या मंदिरांपैकी एक आहे. इथे पूजेसाठी मंजुरी देण्यात यावी, अशी हिंदू पक्षकारांची मागणी आहे. या परिसरातील सर्व विग्रहांची वसुस्थिती माहित करुन घ्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. १९९१ साला पूर्वी १८ विग्रहांत नियमित दर्शन, पूजाविधी करण्यात येत होते. आदि विश्वेशर परिसरातील विग्रहांची परिस्थिती आहे तशी राहू द्यावी
मुस्लीम पक्षकारांचा काय दावा?
मशीद कमिटीच्या याचिकेत वाराणसीत असलेल्या ज्ञानवापी शृंगार गौर परिसरात जैसे थे परिस्थिती ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मशीद प्राचीन काळापासून आहे आणि वाराणसी कोर्टाने दिलेला सर्वेचा आदेश हा पूजास्थळाच्या नियमांच्या विपरीत आहे. १५ ऑगस्ट १९४७ च्या पूर्वी असलेले कोणतेही प्रार्थनास्थळ, दुसऱ्या धर्माच्या प्रार्थनास्थळात बदलता येणार नाही. स्वातंत्र्य मिळाल्याच्या दिवशी ते ज्या स्थितीत होते, त्याच स्थितीत ते राहायला हवे.