Heart Attack Video : अरेरेरे, तो माणूस नाचता नाचता खूर्चीवर बसला अन् स्वत:च्याच आयुष्यातून उठला, पहा कॅमेऱ्यात कैद मृत्यू Video

मेहंदी आणि संगीत सेरेमनीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू असताना ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गणपती आचार्य हे व्यवसायाने सोनार होते. कार्यक्रमस्थळी खुर्चीवरून पडल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना मणिपाल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Heart Attack Video : अरेरेरे, तो माणूस नाचता नाचता खूर्चीवर बसला अन् स्वत:च्याच आयुष्यातून उठला, पहा कॅमेऱ्यात कैद मृत्यू Video
अरेरेरे, तो माणूस नाचता नाचता खूर्चीवर बसला अन् स्वत:च्याच आयुष्यातून उठलाImage Credit source: Aaj Tak
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 10:25 PM

उडपी : जीवन आणि मृत्यू कोणाच्याच हातात नाही. चालता-बोलता, हसता-खेळता कधी कोण देवाला प्रिय होईल हे सांगता येत नाही. असाच एक धक्कादायक व्हिडीओ कर्नाटकातून समोर आला आहे. उत्साहाचे, आनंदाचे वातावरण असलेल्या एका लग्न घरावर शोककळा पसरली आहे. एका कुटुंबात लग्नसमारंभाची धामधूम सुरु होती. मेहंदीचा कार्यक्रम (Mehndi Ceremony) सुरु होता. घरातील सर्व सदस्य गाण्याच्या तालावर थिरकत होते. याच दरम्यान डान्स पाहण्यासाठी मंडपात आलेल्या एका सदस्याला खुर्चीवर बसताच जोराचा हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आला आणि जागीच त्याचा मृत्यू (Death) झाला. एका आनंदाचे शोकात रुपांतर झाले. हा धक्कादायक व्हिडीओ कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील आहे. गणपती आचार्य (56) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मेहंदी आणि संगीत सेरेमनीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू असताना ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गणपती आचार्य हे व्यवसायाने सोनार होते. कार्यक्रमस्थळी खुर्चीवरून पडल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना मणिपाल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र ही घटना नक्की कधी घडली, हे अद्याप समजू शकलेले नाही.

गुजरातमध्येही घडली होती अशीच घटना

लग्नाची वरात निघण्यापूर्वी मित्रांसोबत डीजेवर नाचताना वराला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची अशीच दुर्दैवी घटना गुजरातमधील सुरतमध्ये घडली आहे. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मितेश भाई चौधरी (33) असे मयत वराचे नाव आहे. सुरत जिल्ह्यातील मांडवी तहसील अंतर्गत असलेल्या अरेथ गावातील मितेश भाई चौधरी याची बालोद तालुक्यातील धामंडळा गावात वरात जाणार होती. वरात निघायला थोडा वेळ होता. आनंदाच्या प्रसंगी वराचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी डीजेवर नाचत होती. मित्रांना नाचताना पाहून मितेशलाही नाचण्याचा मोह आवरता आला नाही आणि तोही डीजेजवळ पोहोचला. दरम्यान नाचत असलेल्या मितेशला त्याच्या मित्रांनी खांद्यावर बसवून नाचायला सुरुवात केली. त्यानंतर अचानक मितेशला छातीत दुखू लागलं आणि त्याचा मृत्यू झाला. (A man died of a heart attack while watching a dance at a wedding in Karnataka)

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.