Bikini Contro: बिकिनीचे फोटो इन्स्टावर टाकले म्हणून प्राध्य़ापिकेला नोकरीवरुन काढले, आता विद्यापीठाला 99 कोटींचा भुर्दंड बसणार?

या प्रकरणाच्या निमित्ताने महत्तवाच्या प्रश्नाला तोंड फुटले आहे. सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या प्रतिमा आणि त्यात केलेले हावभाव हे या महिला प्राध्यापिकेच्या किंवा कुणाच्याही कर्तव्यावर किती परणाम करतात, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे. असे होत नसेल तर सोशल मीडिया आणि कर्तव्याचा एकमेकांशी संबंध जोडण्याची गरज आहे का, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतो आहे.

Bikini Contro: बिकिनीचे फोटो इन्स्टावर टाकले म्हणून प्राध्य़ापिकेला नोकरीवरुन काढले, आता विद्यापीठाला 99 कोटींचा भुर्दंड बसणार?
महिला प्राध्यापिकेच्या बिकिनीचा वाद Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 2:43 PM

कोलकाता- सेंट झेवियर्स विद्यापाठीतील एका महिला प्राध्यापिकेला (Ladies Professor) गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नोकरी सोडावी लागली होती. कारण होते बिकिनीचे (Bikini). तिने घरात घातलेल्या बिकिनीचे फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram)टाकले होते. ते फोटो व्हायरल झाले, त्याच्यावर चर्चा झाली, त्यानंतर या प्राध्यापिकेला राजीनामा द्यावा लागला होता. आता हे प्रकरण कोर्टात गेल्याची माहिती स्थानिक न्यूज पोर्टलने दिली आहे. ही महिला प्राध्यापक घडलेल्या या प्रकाराबाबत कोलकता हायकोर्टात रिट याचिका दाखल करणार असल्याची माहिती आहे. विद्यापीठाने तिची बिनशर्त माफी मागावी आणि तिचे प्रतिमा हनन केले म्हणून तिला ९९ कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येणार आहे.

ऑक्टोबर २०२१मध्ये काय घडले होते?

या महिला प्राध्यापिकेने तिचे बिकिनीतील फोटो इन्सावर टाकल्यानंतर, विद्यार्थ्यांच्या पालकांनी तिच्या या फोटोंची तक्रार विद्यापीठाकडे केली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये तिली कुलगुरुंच्या दालनात बोलावण्यात आले. तसेच त्यावेळी तिला राजीनामा देण्यास सांगण्यात आले. त्यावेळी नेमकी काय तक्रार करण्यात आली होती, ते पत्रही तिला दाखवण्यात आले नसल्याचे या महिला प्राध्यापिकेचे म्हणणे आहे. जे वाचून दाखवण्यात आले तेवढेच आपण ऐकले, आणि त्यानंतर राजीनामा देण्यास सांगण्यात आले, अशी माहिती या महिला प्राध्यापिकेने दिली आहे.

इन्स्टाची पोस्ट व्हायरल झालीच कशी?

या एकूण प्रकाराबाबत तिने जाडावपूर पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. तसेच तिच्या इन्स्टा अकाऊंटचा एक्सेस तिच्या काही जवळच्यांनाच असताना, हे फोटो तिसऱ्या व्यक्तीकडे कसे गेले, याचा तपास करण्याची मागणी करण्याची दुसरी पोलीस तक्रारही या प्राध्यापिकेने नोंदवली होती. या प्रकरणात सेंट झेवियर्स विद्यापीठाचे कुलगुरु फादर फेलिक्स राज यांनी अद्यापपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावरील प्रतिमा कर्तव्यावर परिणाम करतात का?

या प्रकरणाच्या निमित्ताने महत्तवाच्या प्रश्नाला तोंड फुटले आहे. सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या प्रतिमा आणि त्यात केलेले हावभाव हे या महिला प्राध्यापिकेच्या किंवा कुणाच्याही कर्तव्यावर किती परणाम करतात, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे. असे होत नसेल तर सोशल मीडिया आणि कर्तव्याचा एकमेकांशी संबंध जोडण्याची गरज आहे का, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतो आहे. बदलत्या काळात अनेक जण प्रवासात, पर्यटनात किंवा वैयक्तिक जगण्यात दिलाशासाठीही सोशल मीडियावरील पोस्ट टाकतात. त्यात अनेकदा त्यांच्या विषयांवरील भूमिका, फोटो ते टाकत असतात. त्यावरुन त्यांच्या कर्तव्यावर प्रश्न निर्माण करण्याचा अधिकार कुणाला आहे का, की हा प्रश्न अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे, यावर चर्चा होण्याची आवश्यकता असल्याचे मत यानिमित्ताने व्यक्त होते आहे.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.