आई-बाप दिवसा करायचे रेकी अन रात्री सुरु व्हायचा खरा गेम, चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल अशी भयंकर घटना समोर!
कानपूरमधील एका कुटुंबाने असच काही स्वप्न ठरवलं. मात्र, त्यांच्यावर अशी काही परिस्थिती आली की त्यांच्या या अपेक्षांचा भंग झाला. त्यासाठी एक चुकीचे पाऊल टाकले.
कानपूर : प्रत्येकजण आपण स्वतः चांगले शिकून उत्तम माणूस होण्याचा, आपले नाव कसे उंचावेल याचा विचार करतात. आपण शिकलो नाही तरी आपला मुलगा चांगला शिकून समाजात आपले नाव कमावेल अशी किमान अपेक्षा प्रत्येक पालक बाळगून असतो. कानपूरमधील एका कुटुंबाने असच काही स्वप्न ठरवलं. मात्र, त्यांच्यावर अशी काही परिस्थिती आली की त्यांच्या या अपेक्षांचा भंग झाला. त्यासाठी एक चुकीचे पाऊल टाकले. त्यांची मुलेही त्याच पावलावर पाऊल ठेऊन चालू लागली. त्यांच्या कुटुंबाची चर्चा सुरु झाली आणि ते सारे कुटुंब बदनाम झाले.
कानपुर येथे भारतीय लष्कर दलात सुभेदार असलेल्या जवानाच्या घरी चोरी झाली. त्या सुभेदारांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने तपास हाती घेतला. परिसरात बसवलेले सुमारे 50 सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले. त्यावेळी त्यांना एका दुचाकीस्वार जोडप्याचा संशय आला.
पोलिसांनी या जोडप्याचा शोध घेतला. त्यांची प्राथमिक चौकशी केली. या चौकशीत पोलिसांना संशय आल्याने त्यांनी पोलिसी खाक्या दाखवून अधिक कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी दिलेली माहिती एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल अशीच होती.
संध्या निगम आणि राजेश निगम हे दाम्पत्य त्यांच्या दोन मुलांसह कानपूरमध्ये रहातात. त्यांना अंकित आणि संदीप अशी दोन मुले आहेत. संध्या आणि राजेश हे दोघे सकाळी आपल्या दुचाकीवरून शहरात फिरायला निघत. कोणते तरी एक घर हेरत. दिवसभर त्या घराची रेकी करून आपल्या घरी परत येत.
राजेश आणि संध्या काही दिवस हेरून ठेवलेल्या घराची रेकी केल्यानंतर घरी येऊन नियोजन करत. त्या नियोजनात मुलेही सहभागी होत. एकदा नियोज करून पूर्ण झाले की त्याच रात्री त्यांची दोन मुले आणि त्यांचा एक साथीदार असे तिघेजण घराबाहेर पडत.
अंकित, संदीप आणि त्यांचा साथीदार रेकी केलेल्या घरात सफाईदारपणे घुसत. त्या घरातील दागदागिने, मौल्यवान वस्तू, जी काही रोख रक्कम असेल ते घेऊन ते सगळे तिथून पोबारा करत. चोरलेला ऐवज विकण्याची त्यांची पद्धतही निराळी होती.
राजेश यांची मुले चोरी करून ते दागिने त्यांच्याच टोळीचे काही सदस्यांना देत. मग, ते दागिने पुढे दुकानात विकत असत. राजेश याने दिलेल्या कबुलीवरून पोलिसांनी राजेश याच्यासह त्याची पत्नी संध्या, अंकित, संदीप ही दोन मुले आणि त्यांचा एक साथीदार वेद याला अटक केली. तर उर्वरित तीन फरार साथीदारांचा शोध सुरू आहे.
चौकशीदरम्यान राजेशने माझा मुलगा आणि मीच चोरी करतो. इतर लोकांचा यात हात नाही असे सांगून इतरांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण, पुरावे काही वेगळेच सांगत होते. सीसीटीव्हीमध्ये राजेशसोबत त्याची पत्नी संध्या नेहमीच दिसत होती. त्यामुळेच पोलिसांनी त्याची कडक चौकशी केली असता त्याने सगळं काही सांगून टाकलं. त्यांच्याकडून पोलिसांनी 50 लाखांचे दागिने, चोरलेल्या देवाच्या मूर्ती आणि रोख रक्कम जप्त केली. पोलीस आता या टोळीच्या तीन फरारी सदस्यांचा शोध घेत आहेत.