बागेश्वरधाममधून शिक्षक बेपत्ता, लहान भाऊ १२ लाख पॅकेजची नोकरी सोडून शोधतोय भावाला

शिक्षक बेपत्ता झाल्याने त्यांच्या घरच्यांची हालत अतिशय खराब झाली आहे. आता या शिक्षकाला शोधून देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

बागेश्वरधाममधून शिक्षक बेपत्ता, लहान भाऊ १२ लाख पॅकेजची नोकरी सोडून शोधतोय भावाला
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 8:48 PM

छतरपूर : देशातील लाखो लोकं बागेश्वरबाबाच्या दरबारात हजेरी लावत आहेत. यापैकी काही लोकं बेपत्ता होत असल्याची माहिती समोर येत आहे. बिहारमधून फेब्रुवारी महिन्यात आलेला एक शिक्षक बेपत्ता झाला. तीन महिन्यांपासून या शिक्षकाचा पत्ता अद्याप सापडला नाही. कुटुंबीय स्टेशनवर जाऊन फोटो दाखवून त्यांचा शोध घेत आहेत. शिक्षक बेपत्ता झाल्याने त्यांच्या घरच्यांची हालत अतिशय खराब झाली आहे. आता या शिक्षकाला शोधून देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात बागेश्वरधाम आहे. फेब्रुवारी महिन्यात लालन कुमार हे शिक्षक बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातून बागेश्वरधामला आले होते. तेव्हापासून ते बेपत्ता आहेत. लालन यांचे लहान भाऊ त्यांचा शोध घेत आहेत. ते म्हणाले, सहा फेब्रुवारीला लालन हे बागेश्वरधामला आले. तेव्हापासून त्यांच्याशी बोलण झालं नाही. अद्याप त्यांचा काही पत्ता नाही.

हे सुद्धा वाचा

१२ लाखांची नोकरी सोडून भावाचा शोध

लालनचे लहान भाऊ यांनी सांगितलं की, ते एक सॉफ्टवेअर इंजिनीअर आहेत. १२ लाख रुपयांचे पॅकेज त्यांना मिळते. महिन्याला एक लाख रुपये ते कमावतात. पण, आता नोकरी सोडून तीन महिने झालेत. पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. परंतु, अद्याप कोणताही पत्ता लागला नाही.

घरच्यांची हालत खूप खराब आहे. आई तीन महिन्यांपासून बेडवर झोपून आहे. वहिणी आणि पुतण्याचीही हीच परिस्थिती आहे. माझ्या वडिलांची भेट घालून द्या, अशी साद पुतण्या घालत आहे. काका वडिलांना केव्हा घरी घेऊन यालं, हा प्रश्न तो विचारत आहे.

मी माझ्या भावाला शोधू शकत नाही. माझा मोठा भाऊ शिक्षक असताना नियमित शाळेत जात होते. परंतु, बागेश्वरधामला आल्यापासून ते बेपत्ता आहेत.

बाबा आणि दरबारावर भरोसा नाही

बाबा आणि दिव्य दरबारावर काही भरोसा नसल्याचं शिक्षकाच्या लहान भावाचं म्हणणं आहे. बाबाने आतापर्यंत माझ्या भावाला शोधण्यासाठी काही मदत केली नाही. बेपत्ता लालनचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.