वायनाड होणार अजून एका विक्रमाचा साक्षीदार; गांधी-नेहरु कुटुंबासाठी प्रियंका गांधी इतिहास रचणार?

Priyanka Gandhi Wayanad : गेल्या दोन लोकसभा निवडणुकांपासून पराभावाचा सामना करणाऱ्या काँग्रेसला 2024 मध्ये सूर गवसला. काँग्रेस तीन आकडी संख्येपासून एका जागेने मागे राहिली. काँग्रेसला 99 जागा मिळाल्या. आता प्रियंका गांधी लोकसभेच्या रिंगणात उतरत आहे.

वायनाड होणार अजून एका विक्रमाचा साक्षीदार; गांधी-नेहरु कुटुंबासाठी प्रियंका गांधी इतिहास रचणार?
गांधी कुटुंबिय हा विक्रम करणार?
Follow us
| Updated on: Jun 18, 2024 | 11:38 AM

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने यंदा दमदार कामगिरी बजावली. त्यांनी 99 खिशात घातल्या. तर इंडिया आघाडीने मोठी मजल मारली. राहुल गांधी हे यावेळी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यांना एक जागा आता सोडावी लागेल. राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघाची जागा सोडली आहे. त्याजागी आता पोटनिवडणूक होईल. काँग्रेसने या जागेवर आता प्रियंका गांधी यांना उमेदवारी दिली आहे. त्या जर वायनाड येथून लोकसभेवर आल्या तर एक नवीन इतिहास रचला जाणार आहे. गांधी-नेहरु कुटुंबाच्या नावावर एक विक्रम नोंदविला जाईल.

आता प्रियंका गांधी मैदानात

मोठ्या प्रतिक्षेनंतर वर्ष 2019 मध्ये प्रियंका गांधी राजकारणात सक्रिय झाल्या. त्याचवेळी त्या लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावतील असा अंदाज व्यक्त होत होता. त्यांच्यासाठी उत्तर प्रदेशातील पारंपारिक अमेठी लोकसभा तर कधी सोनिया गांधी यांचा रायबरेली मतदारसंघ तर वाराणसी लोकसभा जागेची चर्चा रंगत होती. पण त्या कधी निवडणुकीत उतरल्या नाहीत.

हे सुद्धा वाचा

एकाच कुटुंबातील तीन सदस्य संसदेत

आता काँग्रेस पक्षाने केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून प्रियंका गांधी वाड्रा यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. या पोटनिवडणुकीत प्रियंका विजयी झाल्या तर एक मोठा इतिहास रचल्या जाईल. एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती संसदेत त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतील. गांधी कुटुंबातील आई, मुलगा आणि मुलगी संसदेत असतील. सोनिया गांधी सध्या राज्यसभेच्या सदस्य आहेत. राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेत पोहचले आहेत.

सासरे-जावायाची जोडी

यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरु पंतप्रधान असताना त्यांचे जावाई फिरोज गांधी लोकसभेचे सदस्य होते. फिरोज गांधी 1952 मध्ये आणि 1957 मध्ये रायबरेली लोकसभा निवडणुकीत खासदार झाले. 1964 मध्ये इंदिरा गांधी पहिल्यांदा राज्यसभा सदस्य झाल्या. त्यानंतर 1967 मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक जिंकली होती.

20 वर्षांपासून आई-मुलगा सदस्य

2004 मध्ये गांधी-नेहरुन कुटुंबातील आई-मुलाच्या जोडीने यापूर्वीच्या विक्रमाशी बोलणी केली. सोनिया गांधी रायबरेलीतून विजयी झाल्या. तर राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून राजकीय जीवनाला सुरुवात केली.

सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.