एका महिला खासदाराचे फाडले कपडे, साधे पिण्यासाठी पाणी दिले नाही, कोण आहेत या महिला खासदार, ज्यांच्यासोबत करण्यात आले गैरवर्तन, अपराध्यांप्रमाणे दिली वागणूक
या महिला काँग्रेस खासदार आहेत जोथिमनी. तामिळनाडूच्या करुर मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहेत. राहुल गांधींवरील ईडीच्या कारवाईच्या विरोधात झालेल्या अंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या.
नवी दिल्ली – राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीच्या (Rahul Gandhi Ed inquiry)वेळी निदर्शने करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना झालेली कथित मारहाण प्रकरण सध्या वादाचा विषय ठरला आहे. यातच आता एका महिला काँग्रेस खासदाराने (Woman congress MP mistreated)दिल्ली पोलिसांवर (Delhi Police)गंभीर आरोप केला आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठे नेते शशी थरुर यांनी, काँग्रेस खासदार जोथिमनी यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत महिला खासदाराने आरोप केला आहे की, दिल्ली पोलिसांनी त्यांना जबर मारहाण केली आणि त्यांचे कपडेही फाडून टाकण्यात आले. त्यांना पिण्याचे पाणीही देण्यात आले नाही, अशी तक्रार या महिला खासदाराने केली आहे. त्यांच्यासोबत अपराध्यांप्रमाणे व्यवहार करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
कोण आहेत या महिला खासदार?
सोशल मीडियात व्हारल झालेल्या व्हिडिओतील या महिला काँग्रेस खासदार आहेत जोथिमनी. तामिळनाडूच्या करुर मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहेत. राहुल गांधींवरील ईडीच्या कारवाईच्या विरोधात झालेल्या अंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांना आरोपींप्रमाणे वागणूक दिली गेल्याचा आरोप जोथिमनी यांनी केला आहे.
This is outrageous in any democracy. To deal with a woman protestor like this violates every Indian standard of decency, but to do it to a LokSabha MP is a new low. I condemn the conduct of the @DelhiPolice & demand accountability. Speaker @ombirlakota please act! pic.twitter.com/qp7zyipn85
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) June 15, 2022
काय आहे व्हिडीओत?
व्हिडीओमध्ये जोथिमनी यांचे कपडे फाटलेल्या अवस्थेत असल्याचे दिसते आहे. त्यांच्या पायात केवळ एकच चप्पल असल्याचेही दिसते आहे. आंदोलन करतेवेळी अत्यंत निदर्यपणे पोलिसांनी त्यांना बसमध्ये कोंबले असा त्यांचा आरोप आहे. यावेळी कुर्ता फाडण्यात आला, चप्पल काढण्यात आली आणि एखाद्य अटट्ल गुन्हेगारांप्रमाणे बसमध्ये चढवण्यात आले, असे त्यांनी सांगितले आहे. पोलिसांनी पिण्याचे पाणी देण्यासही नकार दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बाहेर पाणि विकणाऱ्या व्यक्तीकडून पाणी विकत घेण्यासही पोलिसांनी नकार दिल्याचा आरोप खासदारांनी केला आहे. त्यांच्यासोबत आणखी सात ते आठ महिला बसमध्ये अशाच अवस्थेत असल्याचे जोथिमनी यांनी सांगितले आहे.
काँग्रेस नेते काय म्हणाले?
हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या शशी थरुर यांनी, हे कोणत्याही लोकशाहीसाठी लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. कोणत्याही महिला आंदोलकांसोबतची ही वर्तणूक अशोभनीय आणि शालिनतेचे नियम मोडणारी आहे, असे त्यांनी लिहिले आहे. लोकसभा खासदारासोबतची ही वर्तणूक अयोग्य असून दिल्ली पोलिसांचा निषेध त्यांनी नोंदवला आहे. लोकसभा अध्यक्षांनी या प्रकरणात कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान दिल्ली पोलिसांनी हे आरोप फेटाळले आहेत.