Delhi Murder : दिल्लीत पाण्यावरुन झालेल्या भांडणातून महिलेची गळा चिरुन हत्या, पतीवरही वार
दलित एकता कँप झोपडपट्टीत श्याम कला या आपल्या कुटुंबासह राहतात. 26 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास श्याम कला घराबाहेर पाणी भरत होती. त्याचवेळी घरासमोर राहणाऱ्या अर्जुन आणि त्याच्या कुटुंबीयांमध्ये पाणी भरण्यावरून भांडण झाले. अर्जुनची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. भांडण सुरू असतानाच अर्जुनने चाकूने महिलेचा गळा चिरला.
नवी दिल्ली : पाणी भरण्यावरून झालेल्या भांडणात एका महिलेचा गळा चिरून हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना दिल्लीतील वसंतकुंज परिसरात घडली आहे. महिलेला वाचवण्यासाठी गेलेल्या तिच्या पतीच्या हातावरही आरोपीने वार (Attack) केला. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी 6 पथके तयार केली आहेत. पोलिस आरोपीचा सर्वत्र शोध घेत आहेत. आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांच्या दहशतीमुळे स्थानिक लोक कमालीचे घाबरले आहेत. वसंतकुंज येथील दलित एकता कँपमध्ये ही घटना घडली आहे. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे. (A woman was strangled to death in a quarrel over water in Delhi)
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
दलित एकता कँप झोपडपट्टीत श्याम कला या आपल्या कुटुंबासह राहतात. 26 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास श्याम कला घराबाहेर पाणी भरत होती. त्याचवेळी घरासमोर राहणाऱ्या अर्जुन आणि त्याच्या कुटुंबीयांमध्ये पाणी भरण्यावरून भांडण झाले. अर्जुनची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. भांडण सुरू असतानाच अर्जुनने चाकूने महिलेचा गळा चिरला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. महिलेचा पती बचावासाठी आला असता आरोपी अर्जुनने महिलेच्या पतीवरही चाकूने वार केले, त्यानंतर तोही गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपींनी रस्त्यात चाकू फिरवून सर्वांना धमक्या देण्यास सुरुवात केली.
आरोपीची नागरिकांना धमकी
कुणीही पोलिसांना बोलावले किंवा त्याच्या भांडणात पडले तर त्यांना मारुन टाकण्याची धमकी अर्जुनने दिली होती. मयत महिलेच्या मुलाने आरोप केला आहे की, पाणी भरण्यातून झालेल्या भांडणातून अर्जुनने आपल्या आईची हत्या केली. तसेच वस्तीतील नागरिकांनीही अर्जुन आणि त्याच्या कुटुंबीयांच्या दादागिरीबद्दल सांगितले. आरोपी अर्जुन हा चोरीच्या गुन्ह्यात यापूर्वी कारागृहात जाऊन आला आहे. याशिवाय त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीही तुरुंगाची हवा खाल्ली आहे. एकूणच हे कुटुंबच गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहे. (A woman was strangled to death in a quarrel over water in Delhi)
इतर बातम्या