एका लग्नाची भयंकर गोष्ट! तिच्याशी धुमधडाक्यात लग्न, अन् हनीमूनच्या रात्री कळलं ती ती नाही तर…
तरुणाने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तरुणाची सर्व काहानी ऐकून पोलीसही हैराण झाले आहेत. या तरुणाने आम्हाला तोंडी तक्रार दिली आहे.
हरिद्वार: आपल्याला सोशल मीडियातून (social media) फ्रेंड रिक्वेस्ट येते. आपण ती स्वीकारतो आणि पुढे मैत्री (friend request) जमते. सोशल मीडियातून नातीही जुळतात. पण सोशल मीडियात जसं दिसतं तसं कधीच नसतं. अनेकदा सोशल मीडियात आपली खरी ओळख लपवून ठेवतात. त्यातून फार मोठा फटका बसू शकतो किंवा फार मोठा फ्रॉडही होऊ शकतो. उत्तराखंडच्या (uttarakhand) हरिद्वारमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका तरुणाच्या बाबतीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ही माहिती ऐकून तुम्हालाही धक्का बसेल अशीच आहे.
हरिद्वारच्या लक्सरमधील रायसी चौकी गावात हा धक्कादायक प्रकार घडला. या गावातील एका तरुणाची सोशल मीडियावर एका मुलीशी मैत्री झाली. या तरुणीच्या नावाने असलेल्या अकाऊंटवरून या तरुणीला फ्रेंड रिक्वेस्ट गेली.
या तरुणाने ती रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. त्यानंतर दोघांनी एकमेकांचे नंबर दिले. दोघांमध्ये फोनवरून बातचीत होऊ लागली.
या तरुणीने ती हरियाणाच्या हिसारमधील असल्याचं या तरुणाला सांगितलं. दोघांच्या गप्पा एवढ्या वाढल्या की दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर या दोघांनी एकत्र राहण्याचा विचार केला.
या तरुणाने तरुणीला लग्नाची मागणी घातली. तिला लग्न करण्यासाठी तयार केलं. त्यानंतर लग्नाचंही ठरलं आणि लग्नाची जोरदार तयारीही झाली.
ही तरुणी लग्नासाठी लक्सरला आली. त्यानंतर या दोघांनी एका मंदिरात विवाहही केला. लग्नाच्यावेळी या तरुणीच्या घरातील एकही व्यक्ती उपस्थित नव्हता. लग्नानंतर हा तरुणी तिला घेऊन आपल्या गावी घेऊन गेला.
गावाला आल्यावर हनिमूनच्या दिवशी जे घडलं ते भयंकरच होतं. लग्नाच्या पहिल्या रात्री आपण जिच्याशी लग्न केलं ती स्त्री नसून तृतीयपंथी असल्याचं या तरुणाला कळलं आणि त्याला धक्काच बसला.
हादरून गेलेल्या या तरुणाने या मुलीशी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. पण तिने काडीमोड घेण्यासाठी या तरुणाकडे पाच लाख रुपये मागितल्याचा आरोप आहे.
तरुणाने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तरुणाची सर्व काहानी ऐकून पोलीसही हैराण झाले आहेत. या तरुणाने आम्हाला तोंडी तक्रार दिली आहे. पीडित तरुणाने लेखी तक्रार केली तर पुढील कारवाई करण्यात येईल, असं पोलीस अधिकारी यशपाल सिंह बिष्ट यांनी सांगितलं.