ग्राहकांना समोर ठेवूनच नवीन आधार कायदा करणार; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं मोठं विधान
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आधार कायद्यात डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अॅक्ट 2023 च्या तरतुदींचा समावेश करण्याची घोषणा केली आहे. या नवीन आधार कायद्याचा मुख्य उद्देश गरिब आणि उपेक्षित वर्गांना सक्षम करणे आणि त्यांच्या डिजिटल प्रायव्हेसीचे संरक्षण करणे हा आहे.

ग्राहकांना समोर ठेवूनच नवीन आधार कायदा डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अॅक्ट (डीपीडीपी) 2023 च्या अनुरुप बनवण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. समाजातील उपेक्षित वर्गाला सशक्त करणं हा आमचा मूलमंत्र आहे, असंही अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आधार कार्डाची आयडेंटिटी अधिक सुलभ करण्यासाठी आणखी एक आधार अॅप लॉन्च केलं. त्यावेळी ते बोलत होते. जेव्हा आधारचा कायदा बनला तेव्हा आपल्याकडे डेटा प्रोटेक्शनचा आणि प्रायव्हेसीचा होरिझोनटल कायदा नव्हता. बेसिक प्रिव्हेन्शन लॉ देशात नव्हता. आता आपल्याकडे डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अॅक्ट 2023 आहे. त्याचे नियम आहेत. कन्सल्टेशन अॅक्ट बनवताना जसं झालं होतं, तसंच एक्स्टेन्सिव्ह कन्सल्टेशन रुल्स तयार करताना झालं आहे. आता ते कन्सल्टेशन जवळपास तयार होत आलं आहे. लवकरच रुल्स नोटिफाय होतील. एक प्रकारे आपल्याकडे देशात एकदम आधुनिक लीगल फ्रेमवर्क आलं आहे. आता आधार कायदा कसा हार्मोनायइज करायचा हे टास्क आहे, असं अश्विनी वैष्णव म्हणाले.
गरीबातील गरीब लोक फोकस
आज अनेक गॅप्स भरले आहेत. त्यामुळे आधार अॅक्टचं मॉर्डन व्हर्जन काय असलं पाहिजे याचं ऑब्जेक्टिव्ह आपल्याकडे असलं पाहिजे. तसेच यूजर्स हे आपल्या केंद्रस्थानी आहेत. सामान्य नागरिक हे आपल्या केंद्रस्थानी आहेत. लाखो लोकांच्या आयुष्यात कसा पॉझिटिव्ह बदल होईल, त्यांचं आयुष्य सुसह्य कसे होईल याकडे लक्ष देत आहोत. नागरिकांना आता वेगवेगळ्या ठिकाणी आयडेंटिफिकेशन द्यावी लागणार नाही. एक गरीब आईला तिच्या सर्व सर्व्हिसेससाठी सोपी पद्धत उलब्ध व्हावी हा या कायद्याचा फोकस असणार आहे. समाजातील इन्कम पिरॅमिडमध्ये गरीबातील गरीब लोक आहे, त्यांच्यावर फोकस आम्ही दिला आहे. त्यांच्या जीवनात बदल आणायचा आहे. हा आमचा जगण्याचा धर्म आहे. आमच्या गव्हर्न्सचं महत्त्वाचं पाऊल आहे. हा मोदी सरकारचा सर्वात मोठा फोकस आहे, असंही अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं.
The new Aadhaar law will be harmonised vis-a-vis the DPDP Act 2023, keeping user interest at the center. pic.twitter.com/phyZ2FrxsZ
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) April 9, 2025
गरीबांसाठी जगायचं आहे
आपल्याला गरीबांसाठी जगायचं आहे, गरीबांचं आयुष्यमान सुधारण्यासाठी जगायचं आहे आणि गरीबांसाठी काम करायचंय आहे. देशाला मजबूत करण्याचं आपलं उद्दिष्ट्ये आहे. समाजातील सर्वात उपेक्षित वर्गाला सशक्त करावे, हा आमचा मूलमंत्र आहे. याच मूलमंत्रावर नवीन कायदा आणा. याच मूलमंत्रावर जेवढ्या आधारशी संबंधित सुविधा आहेत, त्या आणखी चांगल्या करा, असे निर्देशही त्यांनी दिले.