नको त्या कमेंटचा भयंकर त्रास, आपच्या महिला नेत्याचं ब्रेस्टवरून बोल्ड स्टेटमेंट, म्हणाली, आता काय मी…

महिलांच्या पोशाखावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर AAP नेत्या सुरभी रेणुकांबिके यांनी ताशेरे ओढले आहेत. त्यांनी एक फेसबूक पोस्ट लिहून अनेकांना खडसावलंय. महिलांचे शरीर पाहून उत्तेजित होणे हा पुरूषांचा कमकुवतपणा नाही का? असा सवाल त्यांनी विचारला.

नको त्या कमेंटचा भयंकर त्रास, आपच्या महिला नेत्याचं ब्रेस्टवरून बोल्ड स्टेटमेंट, म्हणाली, आता काय मी...
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 21, 2024 | 11:35 AM

समाजात महिलांविरोधातील अत्याचारांमध्ये बरीच वाढ झाली आहे. मात्र यासाठी महिलांना, त्यांच्या पोशाखांनाच जबाबदार ठरवले जाते. ते योग्य आहे का ? हो, असं त्याचं उत्तर असेल तर मग लहान मुलींसोबत होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांबद्दल काय म्हणायचं ? महिलाचा पोशाखाबद्दल प्रश्न उपस्थित करणं हे खूप कॉमन आहे. असंच काहीस आप नेत्या सुरभि रेणुकम्बिके यांच्यासोबतही झालं, त्यांच्या एका फेसबूक पोस्टमुळे सोशल मीडियावर चांगलाच वादंग माजलाय. असं त्यांनी लिहीलंय तरी काय ? जाणून घेऊया…

सुरभी यांची पोस्ट काय ?

‘ तुम्ही cleavage का दाखवता ? थोडे बरे, आणखी कपडे घालायला हवे होते, छाती दिसत आहे ‘ असे अनेक मेसेज मला इनबॉक्समध्ये येतात.

‘ स्त्रियांच्या शरीरात काय-काय बदल होतात हे तुम्हाला माहीत तरी आहे का गुरु ? एखादा आठवडा सलग ब्रा घातली तर पुरेशी हवा न लागल्यामुळे छातीत दुखायला लागत, रॅशेस येता, हे कधी तुम्हाला तुमची आई, बहीण, गर्लफ्रेंडने सांगितलं नाही का ? त्यांच्या शरीराचे होणारे हाल याबद्दल त्या स्वत:हून बोलत नसतील तर तुम्हीच स्वत:शी विचार करा की त्यांना कधीच असे विषय बोलणं कम्फर्टेबल का वाटलं नाही?’ .

‘तुमची ब्रेस्ट मोठी आहे, या वयातही तुम्ही हॉट दिसता, असे जे लोक तुम्हाला म्हणत असतील, त्यांना फक्त एकच प्रश्न विचारा, आता काय मी ब्रेस्ट कापून घरी ठेवू का ? हे माझं शरीर आहे.. ते याच आकाराचं असेल… महिलाचं शरीर काय एखादं फर्निचर आहे का की ऑर्डर देऊन बनवता येईल ?’ असा सवाल सुरभि यांनी विचारला आहे.

महिला विचलित होतात का ?

पुढे त्या म्हणतात,

तसं पहायला गेलं तर inbox मध्ये येणाऱ्या बकवास मेसेजपेक्षा आम्ही (महिला) कित्येक पटींनी चांगल्या आहोत. एखाद्या व्यक्तीच्या मागे न लागता, ( शांतपणे) आपलं आयुष्य जगणं हे खरंच इतक वाईट आहे का ?

अरे हे विचलित करणारं आहे, असं दिसतं, तसं दिसतं,यंव नी त्यंव… असं सगळं म्हणणाऱ्या लोकांना मला एवढंच सांगायचं आहे, अरे भाऊ.. पुरूष तर एक अंडरवेअर घालून जगभर फिरतात.. अंघोळीला जातानाही कपड्यांची झंझट नाही, मंदिरातही जाताना कमरेच्या खाली धोतर नेसून जातात. मग त्यांच्या या कृतीमुळे महिला विचलित होतात का ?

तो तुमचा कमकुवतपणा

जर कोणी विचलित होत असेल तर तो तुमचा कमकुवतपणा आहे. तुम्ही स्वत:कडे लक्ष दिलं पाहिजे, स्वत:वर काम केलं पाहिजे, महिलांना सल्ले देत बसू नका. कोणालाही पाहून विचलित होत असाल तर स्वत:ला प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही कसे पुरूष आहात ? त्याहूनही जास्त त्रास होत असेल तर ते तुमचं नशीब…यामध्ये महिला काहीच करू शकत नाहीत’ अस सुरभि यांनी सुनावलं.

आमच्या शरीरालाही हवा आणि सूर्यप्रकाश मिळायला हवा ना ! सूर्यप्रकाशाचा आनंद घेण्यासाठी जगभरातून लोक आपल्या देशात येतात. आम्ही आमच्या सोयीनुसार कपडे घातले तर तुमची परवानगी का घ्यायची? तुम्हाला आवडलं तर बघा, नाहीतर तुमचे डोळे बंद करा… किंवा unfriend करा, ब्लॉक करा.. बरेच पर्याय आहेत. ते सगळं राहिलं बाजूला आणि मी काय घालावं, काय घालू नये, हे मला सांगणारे तुम्ही कोण, तु्म्हाला हा अधिकार कोणी दिला ? मी तुमच्या घरची मोलकरीण आहे का? असा खडा सवाल सुरभि यांनी विचारला.

जर तुम्हाला स्त्रियांच्या शरीराशी संबंधित समस्या समजत नसतील तर याचा अर्थ असा आहे की या समाजात इतक्या वर्षांपासून चालत आलेल्या वाईट प्रथांमुळे तुमची विचारसरणी लहान झाली आहे… त्याला आम्ही काय करू? तुमच्या शरीरालाच हवा, पाणी, प्रकाश आणि सूर्यप्रकाशाची गरज असते. हा अधिकार, हे स्वातंत्र्य स्त्रियांना मिळायला नको का? हे ठरवणारे तुम्ही कोण? किती दिवस आपण गप्प बसणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करत पुरुषांना थेट सुनावलं.

राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर..
राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर...
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?.
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?.
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू.
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी.
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस.
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?.
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात...
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात....
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप.
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव.