Punjab Assembly Election 2022: ‘आप’कडून भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार, पब्लिक व्होटिंगनंतर केजरीवाल यांचा निर्णय
खासदार भगवंत मान हे आपचे पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत. आम आदमी पार्टीने पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाबाबत पसंतीच्या उमेदवाराबाबत जनतेचा कौल मागितला होता.
चंदीगड: आपचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष, माजी खासदार भगवंत मान हे आपचे पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत. आम आदमी पार्टीने पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाबाबत पसंतीच्या उमेदवाराबाबत जनतेचा कौल मागितला होता. त्यात सर्वाधिक लोकांनी भगवंत मान यांच्या नावाला पसंती दिली होती. त्यामुळे केजरीवाल यांनी भगवंत मान यांना पंजाबचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं आहे. त्यामुळे पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विटस्ट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंजाब काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू असतानाच आम आदमी पार्टीने सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार थेट जनतेमधूनच ठरवण्याचा निर्णय आपने घेतला होता. त्यानुसार आम आदमी पार्टीने फोन आणि व्हॉट्सअॅपवरून लोकांची मते मागवली होती. एकूण 21 लाख 59 हजार 437 लोकांनी आपलं मत नोंदवलं होतं. त्यात टेलिव्होटमध्ये भगवंत मान यांच्या नावाला सर्वाधिक लोकांनी पसंती दर्शवली होती. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज मोहालीत पत्रकार परिषद घेऊन भगवंत मान हे मुख्यमंत्रीपदाचे आपचे उमेदवार असतील असं जाहीर केलं.
केजरीवाल आणि सिद्धूंनाही पसंती
या व्होटिंगमध्ये 21 लाख 59 हजार 437 लोकांनी कौल दिला होता. यातील काही लोकांनी अरविंद केजरीवाल यांच्या नावालाही मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली. मात्र, 93 टक्के लोकांनी भगवंत मान यांनाच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून कौल दिला. तर 3.6 टक्के लोकांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्या नावाला पसंती दिली आहे. राज्यातील जनतेला टेलिव्होटिंगचाही पर्याय दिला होता. मात्र, त्यात मुख्यमंत्रीपदाच्या नावाचं ऑप्शन देण्यात आलं नव्हतं. एखाद्याला आपली पसंती कळवायची असेल तर त्यांना फोन करून बीपनंतर त्यांच्या पसंतीचं नाव एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप करून कळवावं लागत होतं. अशा पद्धतीने मिळालेल्या व्होटिंगवरून सीएमपदाच्या चेहऱ्याची घोषणा करण्यात आली आहे.
आप एकमेव पक्ष
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचाच विजय होईल असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. चंदीगड महापालिकेत विजय मिळाल्यानंतर आपचा आत्मविश्वास वाढला आहे. भगवंत मान हे 48 वर्षीय आहेत. ते दोन वेळा खासदार राहिले आहेत. सध्या पंजाबचे आपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पंजाब निवडणुकीसाठी आपने ‘जनता चुनेगी अपना सीएम’ ही मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार त्यांनी जनतेचा कौल मागवला होता. व्होटिंगद्वारे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवणारा आम आदमी पार्टी हा राज्यातील एकमेव पक्ष आहे.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 18 January 2022 pic.twitter.com/9vGqyCyqam
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 18, 2022
संबंधित बातम्या:
Punjab | काँग्रेसला पंजाबमध्ये मोठा धक्का! हरजोत कमलनंतर काँग्रेसचे आणखी 5 ज्येष्ठ नेते भाजपात दाखल