आज अमृतसरमध्ये ‘आप’चा भव्य रोड शो; अरविंद केजरीवाल, भगवंत मान होणार सहभागी

पंजाब निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर आता आज आम आदमी पार्टीच्या वतीने अमृतसरमध्ये भव्य रोड शोचे (Mega Road Show) आयोजन करण्यात येणार आहे. या रोड शोमध्ये आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि आपचे पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान सहभागी होणार आहेत.

आज अमृतसरमध्ये 'आप'चा भव्य रोड शो; अरविंद केजरीवाल, भगवंत मान होणार सहभागी
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 12:36 PM

अमृतसर : दोन दिवसांपूर्वीच पाच राज्यातील विधानसभा निवडणुकींचा निकाल हाती आला. यापैकी चार राज्यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात भाजपाची सत्ता आली तर पंजाबमध्ये आपने बाजी मारली. आपने पंजबामध्ये (Punjab Assembly election) एकहाती सत्ता मिळवली आहे. आपचा हा विजय काँग्रेससाठी मोठा धक्का माणण्यात येत आहे. दरम्यान पंजाब निवडणुकीत मिळालेल्या या ऐतिहासिक विजयानंतर आता आज आम आदमी पार्टीच्या वतीने अमृतसरमध्ये भव्य रोड शोचे (Mega Road Show) आयोजन करण्यात येणार आहे. या रोड शोमध्ये आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि आपचे पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान सहभागी होणार आहेत. नियोजित कार्यक्रमानुसार केजरीवाल आज सकाळी आकरा वाजता अमृतसर विमानतळावर पोहचल्यानंतर दुपारी दोन वाजता रोड शोला सुरुवात होणार आहे.

भगत सिंह यांच्या गावी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

भगवंत मान यांची विधीमंडळ पक्षाचा नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. ते येत्या 16 मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मान हे पंजाबच्या खटकड या गावात शपथ घेणार आहेत. खटकड गाव हे स्वातंत्रसैनिक भगत सिंह यांचे मुळ गाव आहे. पंजाबमध्ये आपला प्रचंड बहुमत मिळाले आहे. आतापर्यंतच्या इतिहासात जनतेचा एवढा कौल राज्यात कोणत्याच पक्षाला मिळाला नव्हता. 1992 साली काँग्रेसचे 87 आमदार निवडून आले होते. मात्र आपचे तब्बल 92 आमदार निवडून आल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य – मान

दरम्यान यावेळी बोलताना मान यांनी म्हटले आहे की, पंजाबचा विकास आणि तेथील जनतेला सुरक्षीत वातावरण उपलब्ध करून देणे यालाच आमचे सर्वोच्च प्राधान्य असणार आहे. पंजाबमध्ये अधिकाधिक पायाभूत सुविधांचा विकास कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे मान यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

यूपीचा घाव वर्मी; पराभवाच्या आघातानंतर काँग्रेसमध्ये मंथन सत्र, दिवसभरात दौन बैठका

High Court : पत्नीने खोटी तक्रार करणे हा पतीचा छळच; हायकोर्टाचा घटस्फोटाच्या प्रकरणात महत्वपूर्ण निर्वाळा

विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी कुणाची? काँग्रेस कार्यकारणीची उद्या बैठक, गांधी परिवार राजीनामा देणार?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.