Success Story: एक कोटीच्या नोकरीची ऑफर नाकारत युवतीने सुरु केले स्‍टार्टअप, आता कंपनीचा महसूल 40 कोटींवर

Arushi Agarwal: आरुषी हिच्या कंपनीची सुरुवात झाली होती. परंतु प्रवास सोपा नव्हता. अनेक कामे बाकी होती. सर्वात महत्वाचे म्हणजे या प्लॅटफॉर्मवर आयटी कंपन्यांना जोडणे होते. आयुषी आणि तिच्या को-फाउंडरची कोणत्याही कंपनीत ओळख नव्हती. मग ती स्वत: आयटी कंपन्यांमध्ये जावू लागली.

Success Story: एक कोटीच्या नोकरीची ऑफर नाकारत युवतीने सुरु केले स्‍टार्टअप, आता कंपनीचा महसूल 40 कोटींवर
Arushi Agarwal
Follow us
| Updated on: Nov 03, 2024 | 6:49 AM

Business Startup Journey: एखादा व्यवसाय उभारण्यासाठी धाडस लागते. त्यामुळे अनेक जण नोकरीच्या मागे लागतात. परंतु चांगल्या ठिकाणी नोकरीचे एक कोटी रुपयांचे पॅकेज मिळत असताना ते नाकारुन एखादे स्टार्टअप सुरु करणे म्हणजे ध्येयवेडपणा म्हटला जातो. उत्तर प्रदेशातील युवती आरुषी हिने अशीच काही जोखीम घेण्याचे धाडस केले. त्यात ती यशस्वी झाली. आज तिने उभारलेल्या स्टार्टअपचा महसूल 40 कोटींपेक्षा जास्त झाला आहे. ती यशस्वी महिला उद्योजक झाली आहे. परंतु तिचा हा उद्योगाचा प्रवास सोप नव्हता. त्यासाठी तिला अनेक अडथळे पार करत समस्यांना समोरे जावे लागले.

कशी सुरु झाली कंपनी?

आरुषी अग्रवाल हिने कॉम्प्‍यूटर सायन्समध्ये इंजिनिअरींगची पदवी घेतली. पदवी घेतल्यानंतर तिलाही अनेक ऑफर येऊ लागल्या. एका कंपनीकडून एक कोटीची ऑफर आली. परंतु तिने नकार दिला. तिला स्टार्टअप सुरु करायचे होते. त्यावेळी अनेक युवकांना नोकरी मिळत नव्हती, ते ही तिने पाहिले. त्यामुळे प्‍लॅटफॉर्म टॅलेंटडीक्रिप्‍ट (Talent Decrypt) सुरु करण्याची तिची योजनेस मूर्त स्वरुप प्राप्त झाले.

अनेक कंपन्यांच्या मारल्या फेऱ्या

आरुषी हिच्या कंपनीची सुरुवात झाली होती. परंतु प्रवास सोपा नव्हता. अनेक कामे बाकी होती. सर्वात महत्वाचे म्हणजे या प्लॅटफॉर्मवर आयटी कंपन्यांना जोडणे होते. आयुषी आणि तिच्या को-फाउंडरची कोणत्याही कंपनीत ओळख नव्हती. मग ती स्वत: आयटी कंपन्यांमध्ये जावू लागली. पहिल्या दिवशी 30 कंपन्यांमध्ये गेली. परंतु तिला आत सोडले नाही. आठवडाभर हा उपक्रम सुरु होता. मग वडिलांबरोबर एका आयटी कंपनीत गेली. त्या ठिकाणी सॉफ्टवेअर दाखवले. त्यानंतर एकामागे एक कंपन्या तिच्या कंपनीसोबत येऊ लागल्या. आता तिचा स्‍टार्टअपचा महसूल 40 कोटी रुपयांवर पोहचला.

हे सुद्धा वाचा

काय आहे टॅलेंटडीक्रिप्‍ट

टॅलेंटडीक्रिप्‍ट असा एक प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये कंपन्यांना विशेष एक्सेस मिळतो. त्या माध्यमातून जगातील कोणत्याही भागात असलेल्या उमेदवाराची कंपनी निवड करु शकते. त्याचा अनुभव आणि इतर गुण कौशल्य पाहून त्याची निवड करणे कंपन्यांना सोपे होते. तसेच फ्रेशर असलेल्या पदवीधर युवकांनाही नोकरी देण्यासाठी हे प्लॅटफॉर्म यशस्वी ठरले आहे. आरुषी या कंपनीची फाऊंडर आणि सीईओ आहे.

Non Stop LIVE Update
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'
सतेज पाटील भडकले, 'ही माझी फसवणूक, दम नव्हता तर xx मारायला...'.
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले...
जरांगेंवर राजकीय दबाव? निवडणुकीतून माघार, बच्चू कडू स्पष्टच म्हणाले....
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त
'राज ठाकरेंनी भेट नाकारली, पण भेटले असते तर..',सरवणकरांकडून खेद व्यक्त.
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र
विधानसभेला काही दिवस बाकी युगेंद्र पवारांनी सांगितला पवारांचा कानमंत्र.
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले....
राज ठाकरेंचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले.....
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली, आरोप नेमके काय?.
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र
'अजितदादांना अटक करा अन् फडणवीसांचा कान...', बिचुकलेंचं मोदींना पत्र.
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?
मविआत कोणाचं बंड? अपक्ष म्हणून कोण रिंगणात? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?
महायुतीत कोणाचं बंड? कोण उभं राहणार अपक्ष? बंडाळी रोखण्यात येणार यश?.
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?
'पवार-शिंदेंमध्ये काहीतरी सुरू?', विधानसभेच्या निकालानंतर काय घडणार?.