AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘राम मंदिर ट्रस्टची निर्मिती अवैध’! निर्वाणी आखाडाचे महंत धर्मदास यांचा आरोप, गृह मंत्रालयाला कायदेशीर नोटीस

निर्वाणी आखाड्याचे महंत धर्मदास यांनी राम मंदिर ट्रस्टची स्थापना अवैध असल्याचा आरोप केला आहे. राम मंदिर ट्रस्टची निर्मिती अवैध, मनमानी पद्धतीने करण्यात आली आहे, असा आरोप करतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरुद्ध असल्याचं महंत धर्मदास यांनी नोटीसमध्ये म्हटलंय.

'राम मंदिर ट्रस्टची निर्मिती अवैध'! निर्वाणी आखाडाचे महंत धर्मदास यांचा आरोप, गृह मंत्रालयाला कायदेशीर नोटीस
Follow us
| Updated on: Nov 13, 2020 | 9:32 AM

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टच्या निर्मितीवरुन आता नवा वाद उभा राहिला आहे. निर्वाणी आखाड्याचे प्रमुख महंत धर्मदास यांनी गुरुवारी गृहमंत्रालयाला एक नोटीस बजावली आहे. राम मंदिर ट्रस्टची निर्मिती सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार करण्यात आलेली नाही, ती अवैध असल्याचं या नोटीसमध्ये म्हणण्यात आलंय. तंसच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच या ट्रस्टची निर्मिती आणि नियंत्रण असावं, अशी मागणीही महंत धर्मदास यांनी केली आहे. (Mahant Dharmadas notice to Ram mandir trust)

निर्वाणी आखाड्याचे महंत धर्मदास यांनी राम मंदिर ट्रस्टची स्थापना अवैध असल्याचा आरोप केला आहे. राम मंदिर ट्रस्टची निर्मिती अवैध, मनमानी पद्धतीने करण्यात आली आहे, असा आरोप करतानाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरुद्ध असल्याचं महंत धर्मदास यांनी नोटीसमध्ये म्हटलंय. या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अन्यथा कायदेशीर कारवाईची मागणी करु, असा इशाराही देण्यात आला आहे.

राम मंदिर ट्रस्टची निर्मिती सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आणि संत समाजाच्या इच्छेनुसार झालेली नाही. स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी आणि संपत्ती हडपण्यासाठी या ट्रस्टची निर्मिती झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. आपल्याला या ट्रस्टमध्ये का घेण्यात आलं नाही? असा सवालही धर्मदास यांनी केला आहे.

‘राजकारणाशी संबंध असलेल्यांना संधी’

जे लोक 1949 पासून टायटल सूट प्रकरणात सुनावणी करत होते, त्यांना ट्रस्टमध्ये सहभागी करुन घेण्यात आलं नाही. पण जे लोक 1989 नंतर त्यात सहभागी झाले त्यांना ट्रस्टमध्ये घेण्यात आलं. कारण, त्यांचा मोठ्या राजकीय व्यक्तींशी संबंध आहे, असाही आरोप महंत धर्मदास यांनी केला आहे.

गुरु बाबा अभिराम दास हे 1949 पासून रामललाचे पुजारी होते. त्यांच्या परिवारातील कुणालाही ट्रस्टमध्ये स्थान देण्यात आलं नाही, असं नोटीसमध्ये म्हणण्यात आलं आहे. अनुसूचित जातीतील सदस्याला ट्रस्टी बनवून हिंदूंमध्ये दरी निर्माण करण्याचं काम सातत्यानं झाल्याचा आरोप मंहत धर्मदास यांनी केला आहे. हे एका राजकीय अजेंड्याप्रमाणे करण्यात आल्याचंही महंत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन पार पडलं आहे. आता राम मंदिर ट्रस्टच्या निर्मितीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो तर मराठा आरक्षणाचा का नाही?; अशोक चव्हाणांचा थेट सवाल

Ayodhya : राम मंदिर ट्रस्टला 200 किलो चांदीची देणगी, चांदीदान थांबवण्याची वेळ

Ayodhya Ram Mandir | राम मंदिराचं निर्माण हे भाजपचं स्वप्न : लालकृष्ण आडवाणी

Mahant Dharmadas notice to Ram mandir trust Ayodhya

ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट.
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज.
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन.
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही.
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.