रामायण, महाभारतचे अरबीमध्ये भाषांतर करणारे ते दोघे कोण? नरेंद्र मोदी यांनीही घेतली भेट
Narendra Modi visit to Kuwait: अब्दुल्ला बैरन कुवैतमधील प्रसिद्ध साहित्यिक आहे. ते उत्तम अनुवादक आहेत. त्यांनी भारतीय महाकाव्य रामायण आणि महाभारतचे अरबी भाषेत भाषांतर केले. त्यासाठी त्यांनी भारतीय परंपरा, इतिहास यांचा अभ्यास केला. त्यामुळे अरबी समाजापर्यंत भारतीय महाकाव्य पोहचले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुवैत दौऱ्यावर आहेत. त्यांचा कुवैत दौरा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरला आहे. नरेंद्र मोदी यांना कुवेतचा सर्वोच्च सन्मान ‘द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ने सन्मानित करण्यात आले. कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबाह यांनी मोदी यांना सन्मानित केले. या दौऱ्यात नरेंद्र मोदी यांनी दोन विशेष व्यक्तींची आवर्जून भेट घेतली. अब्दुल्ला अल बैरन आणि अब्दुल लतीफ अलनसेफ यांना नरेंद्र मोदी भेटले. या दोघांनी भारतीय महाकाव्य रामायण आणि महाभारतचे अरबी भाषेत भाषांतर केले. भाषांतर अब्दुला अल बैरन यांनी केले तर प्रकाशन अब्दुल्ल लतीफ अलनेसेफ यांनी केले. नरेंद्र मोदी यांनी त्यांनी अरबीत भाषांतर केलेल्या रामायण आणि महाभारत ग्रंथावर आपले हस्ताक्षर केले.
कोण आहे अब्दुल्ला बैरन आणि अब्दुल लतीफ?
अब्दुल्ला बैरन कुवैतमधील प्रसिद्ध साहित्यिक आहे. ते उत्तम अनुवादक आहेत. त्यांनी भारतीय महाकाव्य रामायण आणि महाभारतचे अरबी भाषेत भाषांतर केले. त्यासाठी त्यांनी भारतीय परंपरा, इतिहास यांचा अभ्यास केला. त्यामुळे अरबी समाजापर्यंत भारतीय महाकाव्य पोहचले. साहित्य आणि भाषांतराच्या क्षेत्रात बैरन यांचे योगदान मोठे आहे. तसेच अब्दुल लतीफ कुवैतमधील प्रसिद्ध प्रकाशक आहेत.
अब्दुल्ला अल बैरन यांनी आतापर्यंत 30 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय महाकाव्यांचे भाषांतर केले आहे. त्याचे प्रकाशन अब्दुल लतीफ यांनी केले आहे. त्यात रामायण, महाभारतचा समावेश आहे. 43 वर्षांनी भारताच्या पंतप्रधानांनी कुवैत दौऱ्यात या दोघांची घेतलेली भेट ही भारताच्या आंतरराष्ट्रीय कुटनीतीचा भाग आहे.
‘मन की बात’मध्ये केला होता उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल्ला बैरन आणि अब्दुल लतीफ यांचा उल्लेख ‘मन की बात’मध्ये केला होता. त्यांनी म्हटले होते, कुवैतमधील दोन विद्वानांनी रामायण, महाभारतचे अरबीमध्ये भाषांतर केले आहे. त्यांचा हा प्रयत्न भारत आणि कुवैत दरम्यान सांस्कृतिक संबंध आधिक दृढ करणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांचे नाते अधिकच घनिष्ट होणार आहे.