जयपूर – २३ वर्षांच्या तरुणीने राज्स्थानच्या एका मंत्र्याच्या (Rajasthan)मुलाविरोधात नवी दिल्लीत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. जलसंपदा मंत्री डॉ. महेश जोशी (Minister Mahesh Joshi)यांचा मुलगा रोहित याच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नशा येणारे पेय देऊन अनेकदा बलात्कार (rape)केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. अनेकदा कपाळावर सिंदूर भरुन त्याने लग्नाचे आमिष दाखवल्याचाही तरुणीचा आरोप आहे. तरुणी आपली पत्नीच असल्याचे सांगत लवकरच लग्न करण्याचे खोटे आश्वासनही रोहितने दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे दोघेही लग्नाआधीच हनीमूनलाही गेले होते. त्यानंतर या तरुणीला गर्भधारणा झाल्यावर तिचा गर्भपातही मंत्र्याच्या मुलाने घडवून आणल्याचा या तरुणीचा आरोप आहे. या प्रकरणी उत्तर दिल्लीत एफआयआर नोंदवण्यात आला असून, तो पुढे जोधपूरला तपासासाठी पाठवण्यात आला आहे.
रोहित जोशीशी तिची ओळख फेसबुकवर झाल्याचे या तरुणीने सांगितले आहे. सुरुवातीला दोघे फेसबुकवर बोलत होते, नंतर ते एकमेकांना भेटू लागले. त्यानंतर ८ जानेवारी २०२१ रोजी या तरुणीला रोहित त्याच्या मित्राच्या घरी सवाई मधोपूरला घेऊन गेला. तिथे तिला गुंगीचे पेय पाजून तिच्यावर बलात्कार केल्याचा तरुणीचा आरोप आहे. तरुणी बेशुद्ध असताना तिचे न्यूड फोटो आणि व्हिडिओही करण्यात आल्याचे तिचे म्हणणे आहे.
A 23-year-old woman from #Jaipur has alleged that she was raped by Rajasthan minister #MaheshJoshi‘s son, Rohit Joshi, on multiple occasions for over a year, the police said on 8 May.https://t.co/DHknJcBXRF
— The Quint (@TheQuint) May 8, 2022
त्यानंतर रोहीत २१ एप्रिल २०२१ रोजी तिला घेऊन मित्राच्या फार्म हाऊसवर गेला,. तिथे त्याने तिच्या कपाळावर सिंदूर लावल्याचेही तिने सांगितले आहे. त्यावेळी त्याने तरुणी आता त्याची पत्नी झाल्याचे सांगितले. लवकरच लग्नाचे रिसेप्शन करु, असे खोटे आश्वासनही त्याने दिल्याचा तिचा आरोप आहे. त्यानंतर २६ जून २०२१ ला तिला घेऊन रोहित मनालीला गेला. हा त्यांचा हनिमून असल्याचे त्याने तिला सांगितले. ११ ऑगस्ट २०२१ रोजी तरुणी गर्भवती असल्याचे तिच्या लक्षात आले. हे तरुणीने रोहितला सांगितल्यानंतर त्यांच्यात भांडण झाले. यावेळी दोघांनीही एकमेकांना मारहाणही केली.
१२ ऑगस्टला या तरुणीला रोहितने मित्राच्या कार्यालयात बोलावले. तिथे तिला मारहाण केली त्यानंतर तरुणीने गर्भपात केला. त्यानंतरही ३–४ सप्टेंबरला दिल्लीच्या हॉटेल सम्राटमध्ये तिच्यावर बलात्कार करण्यात आला. १७ एप्रिल २०२२ रोजीही रोहितने बलात्कार केल्याचा या तरुणीचा आरोप आहे.
रोहित वडील मंत्री असल्याची धमकी तिला देत असल्याचे तिने एफआयआरमध्ये लिहिले आहे. पोलिसांना घाबरत नाही, माफिया आणि गुंडांशी संबंध असल्याचे रोहित तिला सांगत असे. तरुणीने आपल्या जीवाला धोका असल्याचेही नमूद केले आहे. राजस्थानात तक्रार घेत नसल्यने दिल्लीत येवून तक्रार दिल्याचे तिचे म्हणणे आहे. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करुन, पुढील तपाससाठी हे प्रकरण सवाई माधोपूरला पाठवण्यात आले आहे.
रोहित हा प्रदेश काँग्रेसचा महासचिव होता. सध्या तो विधानसभा निवडणुकांची तयारी करतो आहे. याबाबत मंत्र्यांशी संपर्क साधला असता, आपण बाहेर आहे, जयपूरात येऊन माहिती घेतो, असे उत्तर त्यांनी दिले आहे.