Rajasthan Crime: आधी सामूहिक बलात्कार, मग पीडितेला दोन लाखांना विकले; राजस्थानमधील धक्कादायक प्रकार

सामूहिक बलात्कार केल्यानंतर या नराधमांनी महिलेला राजस्थानच्या करौली भागात 2 लाख रुपयांना विकल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तिथे तिला 8 महिने ओलीस ठेवले होते. त्यानंतर कशीतरी आपली सुटका करुन ती तेथून पळून जाण्यात यशस्वी झाली.

Rajasthan Crime: आधी सामूहिक बलात्कार, मग पीडितेला दोन लाखांना विकले; राजस्थानमधील धक्कादायक प्रकार
आधी सामूहिक बलात्कार, मग पीडितेला दोन लाखांना विकले
Follow us
| Updated on: Dec 11, 2021 | 9:52 PM

राजस्थान : एका महिलेवर सामूहिक बलात्कार करुन नंतर तिला दोन लाख रुपयांना विकल्याची धक्कादायक प्रकार राजस्थानमधील भरतपूरमध्ये उघडकीस आला आहे. पीडितेची विक्री केल्यानंतर तिथे तिला काही महिने डांबून ठेवण्यात आले होते. पीडितेने कशीतरी स्वतःची सुटका करीत पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन पोलिसांना गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.

पीडित महिलेचे पतीसोबत भांडण झाले होते. याच रागातून महिला आपल्या माहेरी चालली होती. यादरम्यान भरतपूर येथील डीग बसस्थानकावर तिला एक व्यक्ती भेटली. बोलता बोलता त्याने तिला फूस लावून मथुरेतील गोवर्धन येथे नेले. एका गेस्ट हाऊसवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्याने आपल्या इतर साथीदारांनाही बोलावले आणि सामूहिक बलात्काराची घटना घडवली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे.

आधी गँगरेप, नंतर 2 लाखांना विकले

सामूहिक बलात्कार केल्यानंतर या नराधमांनी महिलेला राजस्थानच्या करौली भागात 2 लाख रुपयांना विकल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तिथे तिला 8 महिने ओलीस ठेवले होते. त्यानंतर कशीतरी आपली सुटका करुन ती तेथून पळून जाण्यात यशस्वी झाली. तेथून पळाल्यानंतर तिने थेट मथुरा गेट पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी महेश शर्माविरुद्ध तक्रार दाखल केली.

आरोपीने विधवा मुलगी सांगून विकले

पीडित महिला मथुरा गेट पोलीस स्टेशन परिसरात राहते. पतीशी भांडण करून ती माहेरी जात होती. त्यानंतर मथुरेतील गोवर्धन येथील बसस्थानकात राहणारा महेश शर्मा याने त्याला फूस लावून गोवर्धन येथे नेले. जिथे त्याने साथीदारांसह सामूहिक बलात्कार केला, त्यानंतर करौली येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला ही आपली विधवा मुलगी असल्याचे सांगत दोन लाखांत विकले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी महेश शर्मा याला अटक केली आहे. (Accused sold to victim after gang rape in Rajasthan)

इतर बातम्या

Love breakup | प्रेयसीशी जबरदस्तीचा प्रयत्न; नकार देताच गळफास लावला पण…

Bihar Crime | बलात्कार करून चार वर्षाच्या चिमुरडीची क्रूर हत्या; बिहारमधील संतापजनक घटना

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.