“दानिश सिद्दिकी यांच्या मृत्यूचा आनंद साजरा करणाऱ्या प्रत्येकाचा नाश होईल”, अभिनेता सिद्धार्थचा हल्लाबोल
सोशल मीडियावर असाच एक गट होता ज्याने दानिश यांच्या मृत्यूवरही विकृती दाखवत आनंद साजरा केला. अशा ट्रोलर्सला अभिनेता सिद्धार्थने चांगलंच फैलावर घेतलं.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर पुलित्झर पुरस्कार विजेते पत्रकार दानिश सिद्दिकी यांचा अफगाणिस्तानमधील सैन्य आणि तालिबानच्या संघर्षावर रिपोर्टिंग करताना मृत्यू झाला. यानंतर सर्वच स्तरातून दुःख व्यक्त करण्यात आलं. दानिश भारतीय पत्रकार असल्यानं भारतातूनही मोठ्या प्रमाणात त्यांच्या कामाचं कौतुक करत त्यांना आदरांजली देण्यात आली. मात्र, सोशल मीडियावर असाच एक गट होता ज्याने दानिश यांच्या मृत्यूवरही विकृती दाखवत आनंद साजरा केला. अशा ट्रोलर्सला अभिनेता सिद्धार्थने चांगलंच फैलावर घेतलं. पत्रकार दानिश सिद्दिकी यांचा मृत्यू साजरा करणाऱ्या प्रत्येकाचा नाश होवो, अशी मी प्रार्थना करतो, असं ट्विट करत सिद्धार्थ यांनी आपला संताप व्यक्त केला (Actor Siddharth criticize those who celebrate on death of journalist Danish Siddiqui).
सिद्धार्थ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “मी दानिश सिद्दिकी यांच्यासाठी प्रार्थना करतो. तुमच्या जीवनाला माझा सलाम आहे. आम्ही तुमची नेहमीच अभिमानाने आठवण काढू. तुमच्या कुटुंबाला प्रेम आणि ताकद मिळो हीच सदिच्छा. युद्धभूमीवर मृत्यू आलेला पत्रकार हा लढणाऱ्या सैनिकासारखाच असतो.” यानंतर सिद्धार्थ यांनी आपल्या ट्विटच्या शेवटी दानिश यांच्या मृत्यूवर आनंद व्यक्त करणाऱ्यांना फैलावर घेतलं. “पत्रकार दानिश सिद्दिकी यांच्या मृत्यूवर आनंद साजरा करणाऱ्या प्रत्येकाचा नाश होवो, अशी मी प्रार्थना करतो,” अशी संतप्त भावना सिद्धार्थ यांनी व्यक्त केली.
Rest in power #DanishSiddiqui ❤️?
I pray for your soul. I salute your life. We will always remember you with pride. Love and strength to your family.
A journalist killed in action is no less than a soldier.
Every single person who celebrated his death…I pray for your end.
— Siddharth (@Actor_Siddharth) July 16, 2021
नेमकी घटना कशी घडलीय?
पत्रकार दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानमध्ये अफगाण सैन्य आणि तालिबानमधील संघर्षावर वृत्तांकन करत होते. यावेळी स्पीन बोल्डक (Spin Boldak area) भागात झालेल्या एका हल्ल्यात दानिश यांचा मृत्यू झाला. गेल्या काही काळापासून ह्याच भागात तालिबानी आणि अफगाण सैन्यात तुंबळ लढाई सुरु आहे. ते कव्हर करण्यासाठीच दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानमध्ये होते.
अफगाण सैन्याने तालिबानकडून झालेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा केलाय, तर तालिबानने याचं खंडन केलंय. तसेच दानिश यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलंय. कंदहारच्या ज्या भागात तालिबान आणि अफगाण सैन्यात चकमक सुरू होती तेथे पत्रकार असल्याची माहिती आम्हाला देण्यात आलेली नव्हती, असं मत तालिबानने व्यक्त केलंय.
हेही वाचा :
देशाला हादरुन टाकणारे फोटो काढणाऱ्या भारतीय फोटोग्राफरची अफगाणिस्तानमध्ये हत्या, तालिबानच्या हल्ल्यात अखेरचा श्वास
Danish Siddiqui : पत्रकारितेतील सर्वोच्च पुरस्काराने सन्मान, हजारो शब्दांची ताकद असणारे पत्रकार दानिश यांचे निवडक फोटो
Danish Siddiqui : ‘कोरोना माणसावरील सर्वात मोठं संकट असेल तर पत्रकारांना ते वास्तव दाखवावं लागेल’, पाहा दानिश सिद्दीकी यांचे खास फोटो
व्हिडीओ पाहा :
Actor Siddharth criticize those who celebrate on death of journalist Danish Siddiqui