‘बस आता एवढंच ऐकणं बाकी होतं’, बलात्कारावरील निर्णयावर तापसी पन्नू, सोना मोहापात्राकडून संतप्त प्रतिक्रिया

छत्तीसगड उच्च न्यायालयाने गुरुवारी (26 ऑगस्ट) वैवाहिक बलात्काराबाबत वादग्रस्त निर्णय दिला. त्यानंतर आता देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आपल्या रोखठोक भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री तापसी पन्नूने (Taapsee Pannu) या निर्णयावर प्रतिक्रिया देताना आता इतकंच ऐकायचं राहिलं होतं असं म्हणत आपली नाराजी व्यक्त केली.

'बस आता एवढंच ऐकणं बाकी होतं', बलात्कारावरील निर्णयावर तापसी पन्नू, सोना मोहापात्राकडून संतप्त प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 12:08 PM

मुंबई : छत्तीसगड उच्च न्यायालयाने गुरुवारी (26 ऑगस्ट) वैवाहिक बलात्काराबाबत वादग्रस्त निर्णय दिला. त्यानंतर आता देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आपल्या रोखठोक भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री तापसी पन्नूने (Taapsee Pannu) या निर्णयावर प्रतिक्रिया देताना आता इतकंच ऐकायचं राहिलं होतं असं म्हणत आपली नाराजी व्यक्त केली. तापसीने न्यायालयाच्या निर्णयावर ट्विट करत आपली भूमिका मांडली. दुसरीकडे प्रसिद्ध गायिका सोना मोहापात्राने देखील या निर्णयावर संताप व्यक्त केलाय.

एका खटल्यावर निकाल देताना छत्तीसगड उच्च न्यायालयाने वैवाहिक बलात्काराचा आरोप फेटाळला. तसेच पतीने कायदेशीर पत्नीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले तरी तो बलात्कार होत नाही, असा निर्णय दिला. यावर बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने ट्विट करत म्हटलं, “बस, आता एवढंच ऐकायचं राहिलं होतं.”

सोना मोहापात्राकडून संताप व्यक्त

तापसी पन्नू शिवाय गायिका सोना मोहापात्राने ट्विट करत आपला संताप व्यक्त केला. ती म्हणाली, “या भारताला वाचून मला जो आजार जाणवत आहे तो इतर कोणत्याही गोष्टीपलिकडचा आहे. याविषयी मी इथं लिहू शकते.”

नेमकं प्रकरण काय?

पीडित महिलेने 2017 मध्ये रायपूरच्या चंगोराभाटा परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीशी लग्न केलं. लग्नानंतर काही दिवसातच पती आणि सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी छळ सुरू केल्याचा आरोप पीडित महिलेने केला. यानंतर पीडितेने नवरा आणि सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याविरोधात आरोपींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन हे गुन्हे रद्द करण्याची मागणी केली होती.

छत्तीसगड उच्च न्यायालयाने एका खटल्याची सुनावणी करताना मोठा निर्णय दिलाय. यात पतीने पत्नीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले तरी तो बलात्कार नाही, असं म्हटलंय. याचिकाकर्त्या पीडित महिलेने आपल्या पतीने इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवल्याची तक्रा करत वैवाहिक बलात्काराचा आरोप केला होता. याशिवाय लग्नानंतर सासरच्यांकडून छळ होत असल्याचाही आरोप होता. न्यायालयाने यावर सुनावणी करताना आरोपी पतीला निर्दोष मुक्त केलंय.

न्यायालयानं नेमकं काय म्हटलं?

छत्तीसगड उच्च न्यायालयाने या खटल्याचा निकाल सुनावताना म्हटलं, “या प्रकरणात तक्रारदार महिला आरोपीची कायदेशीर पत्नी आहे. त्यामुळे आरोपीने पीडितेसोबत लैंगिक संबंध ठेवणं हा बलात्काराचा गुन्हा ठरत नाही. पतीने जबरदस्तीने इच्छेविरुद्ध लैंगिक संबंध ठेवले तरी तो बलात्कार असू शकत नाही.” न्यायमूर्ती एन. के. चंद्रवंशी यांनी हा निकाल दिला.

हेही वाचा :

फिरायला गेलेल्या विद्यार्थिनीवर तीन मित्रांकडूनच गँगरेप, अश्लील व्हिडीओ बनवल्याचाही दावा

बीडमध्ये 28 वर्षीय विवाहितेवर बलात्कार, सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्याची धमकी

चार अल्पवयीन मुलांनी गाठलं, 65 वर्षीय महिलेवर रेल्वे क्रॉसिंगजवळ गँगरेप

व्हिडीओ पाहा :

Actress Taapsee Pannu and Singer Sona Mohapatra on Uttarakhand High court marital rape decision

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.