Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेअर्समध्ये मोठ्या घसरणीनंतर अदानी एंटरप्रायजेसचा सर्वात मोठा निर्णय

शेअर मार्केटमधील अस्थिरतेमुळे अदानी समूहाने हा निर्णय घेतला आहे. गुंतवणूकदारांच्या हितार्थ हा निर्णय घेत असल्याचं अदानी समूहाकडून सांगण्यात आलं आहे. 

शेअर्समध्ये मोठ्या घसरणीनंतर अदानी एंटरप्रायजेसचा सर्वात मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Feb 01, 2023 | 11:34 PM

मुंबई : अदानी एंटरप्रायजेसने (Adani Enterprises) सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. अदानी एंटरप्रायजेस आता गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचा निर्णय घेतला आहे. अदानी एंटरप्रायजेसकडून 20 हजार कोटींचा FPO मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेअर मार्केटमधील (Share Market) अस्थिरतेमुळे अदानी समूहाने हा निर्णय घेतला आहे. गुंतवणूकदारांच्या हितार्थ हा निर्णय घेत असल्याचं अदानी समूहाकडून सांगण्यात आलं आहे. अदानी समूहाकडून परिपत्रक जारी करत याबाबत माहिती देण्यात आलीय. सध्याची परिस्थिती आणि बाजारातील अस्थिरता लक्षात घेत कंपनीने एफपीओची रक्कम परत करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलंय. अदानी समूहाने पूर्ण झालेले व्यवहार माघारी घेत आपल्या गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेत एफपीओ मागे घेत असल्याचं सांगितलंय.

अदानी एंटरप्रायजेसने नुकतंच EPO जारी केलं होतं. यामध्ये 31 जानेवारीपर्यंत गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्यासाठी संधी देण्यात आली होती. पण देशाचा अर्थसंकल्प सादर होणाऱ्या दिवशीच कंपनीने आपला FPO मागे घेण्याचा निर्णय घेतलाय.

गुंतवणूकदारांना दिलं पैसे परत देणार असल्याचं वचन

कंपनीने 20 हजार कोटी रुपये जमा करण्यासाठी FPO जारी केला होता. हा FPO 27 जानेवारीला उघडला होता. तर 31 जानेवारीला त्याची क्लोजिंग डेट होती. पण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अदानी ग्रुपने अदानी एंटरप्रायजेसचा FPO मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि गुंतवणूकदारांना त्यांचे सर्व पैसे परत करणार असल्याचं वचन दिलं.

नेमकं प्रकरण काय?

हिंडेनबर्ग या अमेरिकेतल्या कंपनीनं एक रिपोर्ट जाहीर केला. त्या रिपोर्टमध्ये अदानी समुहानं शेअर बाजार हाताळून स्वतःच्या संपत्ती फुगवल्याचा दावा आहे. हा रिपोर्ट आल्यानंतर अदानींच्या अनेक कंपन्यांचे शेअर गडगडले. श्रीमंताच्या यादीतून अदानींचा नंबर तिसऱ्या स्थानावरुन थेट 11 व्या स्थानी पोहोचलाय.

दरम्यान हे सारे आरोप खोटे असून हिंडेनबर्गचा रिपोर्ट अर्धवट आणि खोट्या माहितीवर आधारित असल्याचा दावा अदानी समुहानं केलाय.

हिंडेनबर्गच्या रिपोर्टमुळे गेल्या शुक्रवारच्या 6 तासांतच अदानी समूहाचं मार्केट कॅप म्हणजे बाजार भांडवलात ४.२ लाख कोटींचं नुकसान झालं. आणि खुद्द अदानींच्या संपत्तीत १ लाख ६६ हजार कोटींचा घाटा झाला.

घाटा नेमका किती झालाय याची तुलना जर पाकिस्तानच्या परकीय मुद्रेशी करायची झाली तर या पैशांतून अख्खा पाकिस्तान तब्बल ८ महिने दोन वेळचं जेऊ शकतो. हे सारं घडलं ते हिंडेनबर्ग या अमेरिकन कंपनीच्या एका रिपोर्टमुळे.

अदानी समुहानं हिंडेनबर्गच्या आरोपांवर 413 पानांचं उत्तर दिलंय. ज्यात अहवालातले दावे खोटे ठरवत हिंडेनबर्ग कंपनीनं हा भारतावर ठरवून केलेला हल्ला आहे. यामागे अमेरिकेतल्या कंपन्यांना आर्थिक फायदा पोहोचवण्याचं गणित असल्याचा दावा केलाय.

त्यावर उत्तर देताना हिंडेनबर्गनं म्हटलंय की भारत एक लोकशाही आणि आगामी महासत्ता देश आहे. पण देशाची लूट करणाऱ्या अदानी समुहानं तिरंग्याखाली भारताचं भविष्य रोखलंय. ते जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीनं केलं असलं तरी फसवणूक ही फसवणूकच आहे.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.