“भारतीयांच्या जीवाची किंमत मोजून कोरोना लस निर्यात केली नाही”, अखेर अदर पुनावालांनी मौन सोडलं

भारताची कोरोना लस उत्पादक कंपनी सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी अखेर भारताच्या वाट्याच्या कोरोना लस परदेशात निर्यात केल्याच्या आरोपावर मौन सोडलंय.

भारतीयांच्या जीवाची किंमत मोजून कोरोना लस निर्यात केली नाही, अखेर अदर पुनावालांनी मौन सोडलं
Adar Poonawlla
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 8:32 PM

नवी दिल्ली : भारताची कोरोना लस उत्पादक कंपनी सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी अखेर भारताच्या वाट्याच्या कोरोना लस परदेशात निर्यात केल्याच्या आरोपावर मौन सोडलंय. भारतात कोरोनाच्या लसींचा तुटवडा असताना कोरोना लस परदेशात निर्यात केल्याचा गंभीर आरोप केंद्रातील मोदी सरकारवर आणि सीरमवर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी अधिकृतपणे एक निवेदन काढत त्यात आपली भूमिका स्पष्ट केलीय. यात त्यांनी कोरोना लसींच्या निर्यातीपासून तर लस पुरवठ्यापर्यंत 5 मुद्द्यांवर भाष्य केलंय (Adar Poonawalla comment on controversy over Corona vaccine export).

अदर पुनावाला आपल्या निवेदनात म्हणाले, “भारतासह जगभरात लोकांना कोरोना काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात मागील काही दिवसांपासून कोरोना लस निर्यातीवरुन सरकार आणि सीरमसह भारतीय कोरोना लस उत्पादकांविषयी अनेक चर्चा सुरु आहेत. मात्र, कोणत्याही निष्कर्षापर्यंत येण्याआधी आपण काही महत्त्वाच्या बाबी समजून घेणं गरजेचं आहे.”

अदर पुनावाला यांच्या निवेदनातील 5 महत्त्वाचे मुद्दे

1. जानेवारी 2021 मध्ये आपल्याकडे कोरोना लसींचा मोठा साठा उपलब्ध होता. भारतातही कोरोना लसीकरणाची मोहिम यशस्वीपणे सुरु झाली होती. याशिवाय देशात कोरोना रुग्णांची संख्या खूप कमी झाली होती. यावेळी आरोग्य तज्ज्ञांसह अनेकांना भारताने कोरोनावर मात केल्याचं वाटलं.

2. दुसरीकडे जगातील इतर काही देशांमध्ये कोरोनानं थैमान घातलं होतं. त्यांना तातडीने मदतीची गरज होती. त्यामुळे भारत सरकारने या देशांना मदत देत लस निर्यात केली. 2020 मध्ये कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा सुरुवातीला भारताने इतर देशांना औषधं देऊ केली होती त्याच भावनेतून ही मदत देण्यात आली. यानंतरच आज भारताला परतावा म्हणून जगभरातून मदत मिळते आहे.

3. कोरोनाची साध ही काही कोणत्याही राजकीय किंवा भौगोलिक भागापुरती मर्यादित नाही. जगातील प्रत्येक व्यक्ती कोरोनापासून सुरक्षित झाल्याशिवाय आपण सुरक्षित होऊ शकत नाही. कोव्हॅक्ससोबतच्या आपल्या कराराप्रमाणे जगभरात कोरोनावर नियंत्रणासाठी इतर देशांनाही कोरोना लस पुरवठा करणं आवश्यक होतं.

4. आपला देश जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या दोन देशांपैकी एक आहे हेही लोक लक्षात घेत नाहीत. अशा मोठ्या लोकसंख्येसाठीचं लसीकरण 2-3 महिन्यात पूर्ण होऊ शकत नाही. यात अनेक अडथळे आहेत. जगभरातील लसीकरण पूर्ण व्हायला कमीत कमी 2-3 वर्ष लागतील.

5. अमेरिकेतील फार्मा कंपन्यांना आपत्कालीन कोरोना लस वापराची परवानगी मिळाल्यानंतर 2 महिन्यांनी सीरमला परवानगी मिळाली. असं असतानाही सीरमने आतापर्यंत 20 कोटी लसींचं उत्पादन केलंय. जर कोरोना लसींचं उत्पादन आणि पुरवठा याचा विचार केला तर सीरमचा जगात पहिल्या 3 मध्ये क्रमांक लागतो. या वर्षांच्या अखेरपर्यंत कोव्हॅक्स देशांनाही कोरोना लस पुरवठा करण्यास सुरुवात होईल, अशीही आशा आहे.

“भारतीयांच्या जीवाची किंमत मोजून कोरोना लस निर्यात केली नाही”

“सीरमने भारताताली लोकांच्या जीवाची किंमत मोजून कोरोना लसीची निर्यात केलेली नाही. आम्ही भारतातील कोरोना लसीकरण मोहिमेसाठी शक्य ते करण्यास कटिबद्ध आहोत. सरकारसोबत मिळून मानवतेसाठी जे काही करता येईल ते करण्याचे आम्ही अथक प्रयत्न करतो आहे. हे काम आम्ही यापुढेही करत राहू. ही वेळ आपण सर्वांनी एकत्र राहण्याची आणि सोबत काम करत कोरोनाला हरवण्याची आहे,” असंही अदर पुनावाला यांनी आपल्या पत्रात शेवटी म्हटलं.

हेही वाचा :

कोरोना महामारीत लस उत्पादन करणारी कंपनी मालामाल, सीरमचा नफा तब्बल…………

पुण्यात लहान मुलांसाठी राखीव रुग्णालय, दुसऱ्या डोसला प्राधान्य : अजित पवार

धक्कादायक, भारतात श्रीमंत आणि शक्तीशाली लोकांकडून धमक्या, अदर पुनावालांकडून भारताबाहेर लस उत्पादनाचा विचार

व्हिडीओ पाहा :

Adar Poonawalla comment on controversy over Corona vaccine export

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.