Aditya-L1 | सुर्ययानाने 9.2 लाख किमीचे अंतर पार केले, ISRO दिली आदित्य एल-1 ची माहिती

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने 2 डिसेंबर रोजी भारताच्या पहिल्या सुर्ययान आदित्य एल-1 चे आंध्रप्रदेशातील सतिश धवन केंद्रातून लॉंचिंग केले होते.

Aditya-L1 | सुर्ययानाने 9.2 लाख किमीचे अंतर पार केले, ISRO दिली आदित्य एल-1 ची माहिती
solarImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 30, 2023 | 9:09 PM

नवी दिल्ली | 30 सप्टेंबर 2023 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( इस्रो ) भारताचे आदित्य एल-1 या सूर्ययानाने तब्बल 9.2 किलोमीटरपेक्षा जादा अंतर कापल्याची माहीती दिली आहे. तसेच हे यान पृथ्वीच्या प्रभाव क्षेत्राच्या बाहेर गेल्याचेही इस्रो ( ISRO ) ने स्पष्ट केले आहे. आता हे यान पृथ्वी आणि सूर्याच्या मधील लॅंग्रेज पॉईंट 1 ( एल-1 ) च्या दिशेने आपला प्रवास सुरु करणार आहे. आतापर्यंत कोणत्या यानाला पृथ्वीच्या प्रभाव क्षेत्राच्या बाहेर ढकल्याची इस्रोची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी मंगळयानाला पहिल्यांदा पृथ्वीच्या प्रभाव क्षेत्राबाहेर इस्रोने प्रथम पाठवले होते.

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने 2 डिसेंबर रोजी भारताच्या पहिल्या सुर्ययान आदित्य एल-1 चे लॉंचिंग केले होते. इस्रोने आंध्रप्रदेशातील सतीश धवन केंद्रातून पीएसएलव्ही सी-57 लॉंच व्हेईकलने आदित्य एल-1 यशस्वीपणे लॉंचिंग केले होते. हे यान चंद्रयान-3 सारखे पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा घातल्यानंतर वेगाने सुर्याच्या दिशेने जाणार आहे.

इस्रोचे ट्वीट येथे पाहा –

15 लाख किमीचे अंतर कापणार

आदित्य एल-1 अंतराळ यान सुर्याच्या कोरोनाचा ( सुर्याच्या सर्वात बाहेरील थर ) दूरुन अभ्यास करणार आहे. एल-1 या बिंदूवरुन सुर्याच्या सौर वादळाचा तसेच चुंबकीय क्षेत्राचा आणि कणांचा अभ्यास करणे यासाठी ही मोहीम आखली आहे. एल-1 हा बिंदू पृथ्वीपासून 15 लाख किमी दूरवर आहे. तर सुर्य पृथ्वीपासून 15 कोटी किमी दूर आहे.

सुर्याची माहीती मिळणार

सुर्य हा आपल्या सर्वात जवळचा तारा आहे. ताऱ्यांच्या अभ्यासासाठी ही मोहीम फायदेशीर ठरु शकते. त्यातून दुसरे तारे, आकाश गंगा, आणि खगोलीय ज्ञान मिळेल. अनेक रहस्यं समजण्यास मदत होईल. सुर्याच्या पृथ्वीपासूनच्या एकूण अंतराच्या तुलनेत एल-1 अंतर केवळ एक टक्के आहे. तरीही पृथ्वीवरुन सुर्याची जी माहीती आपल्या मिळू शकत नाही ती या एल-1 अंतरावरुन मिळणार आहे.

'जिसका EVM उसकी...', संजय राऊत यांचं सूचक ट्वीट, नेमकं काय म्हटलं?
'जिसका EVM उसकी...', संजय राऊत यांचं सूचक ट्वीट, नेमकं काय म्हटलं?.
'दादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वतः त्यांचं अभिनंदन करेन' - रोहित पवार
'दादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वतः त्यांचं अभिनंदन करेन' - रोहित पवार.
एक दिवस असा येईल की ठाकरे रात्री २..., शिवसेनेच्या नेत्याची भविष्यवाणी
एक दिवस असा येईल की ठाकरे रात्री २..., शिवसेनेच्या नेत्याची भविष्यवाणी.
दादा मुख्यमंत्री झाले तर चांगलं..भुजबळांचा CM म्हणून फडणवीसांना विरोध?
दादा मुख्यमंत्री झाले तर चांगलं..भुजबळांचा CM म्हणून फडणवीसांना विरोध?.
'...म्हणून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय', भुजबळांचा जरांगेंवर निशाणा
'...म्हणून फडणवीसांना टार्गेट केलं जातंय', भुजबळांचा जरांगेंवर निशाणा.
'... तर राजकीय संन्यास घेईल', शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?
'... तर राजकीय संन्यास घेईल', शहाजी बापू पाटील नेमकं काय म्हणाले?.
कडूंनी काढली राणा दाम्पत्यांची औकात; म्हणाले, मला पाडण्याची त्यांची...
कडूंनी काढली राणा दाम्पत्यांची औकात; म्हणाले, मला पाडण्याची त्यांची....
'..यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये', राऊतांचा शिंदेंवर घणाघात
'..यापुढे त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये', राऊतांचा शिंदेंवर घणाघात.
मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI
मुंबईकरांनो काळजी घ्या, हवेची गुणवत्ता खालावली, बघा कितीवर पोहोचला AQI.
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल
हे अत्यंत दुर्देवी.., दादांच्या मुलानं राष्ट्रवादीच्या आमदाराला सुनावल.