Aditya L1: इस्रोच्या सूर्य मोहिमेने रचला नवा इतिहास, पंतप्रधान मोदींकडून शास्त्रज्ञांचं कौतूक

Aditya L1 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आणखी एक मोठा इतिहास रचला आहे. इस्रोचे सूर्य मिशन यशस्वी पणे आपल्या ठिकाणी पोहोचले आहे. त्यामुळे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोला मोठे यश मिळणार आहे. इस्रोने केलेल्या या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतूक केले आहे.

Aditya L1: इस्रोच्या सूर्य मोहिमेने रचला नवा इतिहास, पंतप्रधान मोदींकडून शास्त्रज्ञांचं कौतूक
Follow us
| Updated on: Jan 06, 2024 | 5:26 PM

Aditya L1 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने इतिहास रचला आहे. इस्रोची पहिली सूर्य मोहीम शनिवारी लाग्रेंज पॉइंटवर दाखल झाली आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून सप्टेंबर २०२३ मध्ये लॉन्च करण्यात आलेला आदित्य L1, आज शेवटच्या प्रक्रियेतून देखील यशस्वीपणे पुढे गेला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत इस्रोचे अभिनंदन केले आहे. मोदी म्हणाले की, “भारताने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. भारताची पहिली सौर वेधशाळा आदित्य-L1 त्याच्या गंतव्यस्थानावर पोहोचली आहे. सर्वात जटिल अंतराळ मोहिमांपैकी एक ही मोहीमत आमच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचे मोठे योगदान आहे.” हा अथक समर्पणाचा दाखला आहे. या विलक्षण कामगिरीचे कौतुक करण्यात मी माझ्या देशवासियांसोबत सहभागी आहे. आम्ही मानवतेसाठी विज्ञानाच्या नवीन सीमा पार करत राहू.”

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, हे वर्ष भारतासाठी अतिशय आश्चर्यकारक ठरले आहे. पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली इस्रोने आणखी एक यशोगाथा लिहिली आहे. आदित्य L1 सूर्याचे रहस्य शोधण्यासाठी त्याच्या अंतिम कक्षेत पोहोचले आहे.

हे यान सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या लॅग्रेंज पॉइंट (L1) भोवती पृथ्वीपासून सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रभामंडल कक्षेत पोहोचले आहे. L1 बिंदू हा पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील एकूण अंतराच्या सुमारे एक टक्का आहे. शेवटच्या मुक्कामावर पोहोचल्यानंतर हे यान कोणत्याही प्रकारचे ग्रहण न होता सूर्य पाहू शकणार आहे.

लॅन्ग्रेस पॉइंट म्हणजे काय?

लॅग्रेंज पॉइंट हा असे एक ठिकाण आहे जिथे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील गुरुत्वाकर्षण तटस्थ होईल. हॅलो कक्षेतील L1 बिंदूभोवती उपग्रहांद्वारे सूर्य सतत दिसू शकतो. हे सौर क्रियाकलाप आणि रिअल टाइममध्ये अवकाशातील हवामानावर होणार्‍या प्रभावाविषयी माहिती देईल.

मोहिमेचा उद्देश काय आहे?

या मोहिमेचा उद्देश सौर वातावरणातील गतिशीलता, सूर्याची उष्णता, सूर्याच्या पृष्ठभागावरील सौर भूकंप, सौर भडकण्याशी संबंधित क्रियाकलाप आणि त्यांची वैशिष्ट्ये आणि अवकाशातील हवामान समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे हा आहे.

आदित्य एल1 सूर्याचा अभ्यास करणार

आदित्य L1 मोहिमेचे ध्येय सूर्याचा अभ्यास करणे हे आहे. या मोहिमेने सात पेलोड्स वाहून नेले, जे वेगवेगळ्या वेव्ह बँडमध्ये फोटोस्फियर, क्रोमोस्फियर आणि सूर्याच्या सर्वात बाहेरील थर वर संशोधन करण्यास मदत करतील.

सूर्याचा अभ्यास करणे खूप आव्हानात्मक आहे, कारण त्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे 9,941 डिग्री फॅरेनहाइट आहे. आतापर्यंत सूर्याच्या बाह्य कोरोनाचे तापमान मोजले गेले नाही. हे लक्षात घेऊन आदित्य L1 हे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील एकूण अंतराच्या सुमारे एक टक्का अंतरावर असलेल्या L1 च्या जवळच्या कक्षेत 15 लाख किलोमीटर अंतरावर ठेवण्यात आले आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.