ISRO Aditya L1 mission Launch Live | आदित्य-L1 च लॉन्चिंग यशस्वी, नव्या इतिहासाच्या दिशेने सुरु झाला ISRO चा प्रवास

| Updated on: Sep 02, 2023 | 3:45 PM

ISRO Aditya L1 mission Launch LIVE Updates | आजपासून भारताची सूर्य मोहिम सुरु झाली आहे. हे भारताच पहिलं सौर मिशन आहे. चांद्रयान-3 च्या यशानंतर सगळ्यांच्या नजरा आदित्य एल 1 मिशनकडे लागल्या होत्या. चांद्रयान-3 प्रमाणेच आदित्य मिशनकडून यशाची अपेक्षा आहे.

ISRO Aditya L1 mission Launch Live | आदित्य-L1 च लॉन्चिंग यशस्वी, नव्या इतिहासाच्या दिशेने सुरु झाला ISRO चा प्रवास
Aditya L1 Launching live

हैदराबाद : चांद्रयान-3 च्या यशानंतर आजपासून भारताच्या आदित्य एल-1 मिशनला प्रारंभ झाला. भारताची ही पहिली सूर्य मोहीम (isro first sun mission) आहे. आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन आदित्य एल-1 मिशन लॉन्च झालं. PSLV-C57 रॉकेटद्वारे आदित्य एल-1 (Aditya L1 Launch LIVE)  सॅटलाइट पृथ्वीच्या लोअर ऑर्बिटमध्ये सोडण्यात आलं. सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी उपग्रहाचे लॉन्चिंग झालं. चांद्रयान-3 च्या यशानंतर सध्या संपूर्ण देशामध्ये उत्साहाच वातावरण आहे. इस्रोच्या वैज्ञानिकांनी कमाल केली. त्यामुळे आदित्य एल-1 मिशनकडून बऱ्याच अपेक्षा वाढल्या आहेत. 23 ऑगस्टला चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केलं होतं. भारताने या मिशनद्वारे इतिहास रचला होता.

चांद्रयान-3 च्या यशानंतर भारत आता सूर्य मिशनसाठी सज्ज आहे. सूर्याबद्दल बरीच माहिती या मिशनद्वारे मिळणार आहे. त्यामुळे देशवासियांच्या नजरा आज होणाऱ्या आदित्य एल-1 च्या लॉन्चिंगकडे लागल्या होत्या. आदित्य एल-1 सूर्याभोवती भ्रमण करुन सूर्याबद्दलची माहिती गोळा करणार आहे. भारताच चांद्रयान-3 मिशन आता अंतिम टप्प्यात आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरच चंद्रावर वेगात संशोधन कार्य सुरु आहे. चंद्राबद्दलची बरीच महत्त्वाची माहिती विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरकडून मिळाली आहे. आता तशीच अपेक्षा आदित्य एल-1 कडून आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 Sep 2023 01:27 PM (IST)

    Aditya L1 Live : यशस्वी लॉन्चिंगनंतर पंतप्रधान मोदींच टि्वट

    आदित्य L1 च्या यशस्वी लॉन्चिंगबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोचे वैज्ञानिक आणि इंजिनिअर्सना शुभेच्छा दिल्या आहेत. संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी ब्रह्मांड अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणं गरजेच आहे, त्यासाठी अविरत वैज्ञानिक प्रयत्न सुरु राहतील.

  • 02 Sep 2023 01:16 PM (IST)

    Aditya L1 Live : आदित्य-L1 ला अपेक्षित कक्षेत सोडलं

    आदित्य-L1 च लॉन्चिंग यशस्वी झालं आहे. PSLV-C57 रॉकेटने उपग्रहाला अपेक्षित कक्षेत सोडलं. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये L1 पॉइंट आहे. त्या दिशेने आता आदित्य-L1 चा प्रवास सुरु झालाय. इस्रोने टि्वट करुन ही माहिती दिली.

  • 02 Sep 2023 01:00 PM (IST)

    Aditya L1 Live : चौथ्या स्टेजमध्ये इंजिन पुन्हा ऑन

    आदित्य-L1 ला घेऊन उड्डाण करणाऱ्या PSLV-XL रॉकेटच चौथ्या स्टेजच इंजिन पुन्हा ऑन झालं आहे. आदित्य-L1 चा प्रवास योग्य दिशेने सुरु आहे. सर्व तंत्र व्यवस्थित काम करतय. आदित्य L 1 च वजन 1,480.7 किलो आहे. लॉन्चनंतर 63 मिनिटांनी PSLV रॉकेटपासून आदित्य L 1 वेगळं होईल.

  • 02 Sep 2023 12:36 PM (IST)

    Aditya L 1 Live : आदित्य L 1 च वजन किती?

    PSLV-XL रॉकेटने आज 1,480.7 किलो वजनाच्या आदित्य L 1 रॉकेटला घेऊन प्रक्षेपण केलं. आतापर्यंत तीन टप्पे या मिशनचे यशस्वी झाले आहेत. पृथ्वीच्या लोअर ऑर्बिटमध्ये आदित्यला स्थापित केलं जाईल.

  • 02 Sep 2023 12:03 PM (IST)

    Aditya L 1 Live : आतापर्यंतचे सर्व टप्पे यशस्वी

    लॉन्चिंगनंतर आदित्य L 1 ने आतापर्यंतचे सर्व टप्पे यशस्वी केले आहेत. सामान्यपणे उपग्रहाचा प्रवास सुरु आहे.

  • 02 Sep 2023 11:50 AM (IST)

    Aditya L 1 Live : आदित्य L 1 सूर्याच्या दिशेने झेपावलं

    भारताच्या पहिल्या सूर्य मोहीमेला प्रारंभ झाला आहे. आदित्य L 1 हे सॅटलाइट सूर्याच्या दिशेने झेपावलं आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन लॉन्चिंग झालं. PSLV रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण झालं.

  • 02 Sep 2023 11:38 AM (IST)

    Aditya L 1 Live : भारताच्या पहिल्या सूर्य मोहीमेच्या लॉन्चिंगचा LIVE VIDEO पाहा

    काही मिनिटात PSLV रॉकेट आदित्य L 1 ला घेऊन अवकाशात झेपावणार आहे. चांद्रयाननंतर भारताचे हे महत्त्वाच मिशन आहे. इथे क्लिक करुन Live Video तुम्ही पाहू शकता.

  • 02 Sep 2023 11:35 AM (IST)

    Aditya L 1 Live : आदित्य L 1 ला कक्षेत सोडायला कितीवेळ लागेल?

    PSLV रॉकेटच प्रक्षेपण झाल्यानंतर उपग्रह जवळपास 25 मिनिटात कक्षेत सोडला जातो. पण आदित्य L 1 ला कक्षेत स्थापित करायला अंदाजे 63 मिनिट लागतील. श्रीहरिकोटा येथील दुसऱ्या लॉन्च पॅडवरुन प्रक्षेपण होणार आहे. PSLV रॉकेटच हे सर्वात मोठ मिशन असेल.

  • 02 Sep 2023 10:47 AM (IST)

    Aditya L 1 Live : माजी वैज्ञानिक मयलस्वामी अन्नादुराई यांनी काय सांगितलं?

    “L1 पॉइंटपर्यंत पोहोचण टेक्निकल दृष्ट्या खूप आव्हानात्मक आहे. तिथे पोहोचून त्या कक्षेत पाचवर्ष भ्रमण करणं सोप नाहीय. आदित्य L 2 मध्ये एकूण सात उपकरण आहेत. त्याद्वारे सूर्यावर काय घडतं त्याचा अभ्यास केला जाईल” असं पद्मश्री पुरस्कार विजेते इस्रोचे माजी वैज्ञानिक मयलस्वामी अन्नादुराई यांनी सांगितलं.

  • 02 Sep 2023 10:40 AM (IST)

    Aditya L 1 Live : सगळ्यांनाच या मिशनची उत्सुक्ता

    “लॉन्चची आम्हाला सर्वांनाच उत्सुक्ता आहे. सूर्याचा अभ्यास करण्याच भारताच हे एक वेगळ मिशन आहे. आदित्य L1 कडून संशोधन सुरु व्हायला काही महिने लागतील. त्यानंतर आपल्याला सूर्याबद्दल अपडेट मिळायला सुरुवात होईल” असं फिजिकल रिसर्च लॅबोरटरीचे संचालक डॉ. अनिल भारद्वाज यांनी सांगितलं.

  • 02 Sep 2023 10:34 AM (IST)

    Aditya L 1 Live : लॉन्चिंग पाहण्य़ासाठी लोक मोठ्या संख्येने पोहोचले

    आदित्य L1 ची लॉन्चिंग पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने श्रीहरिकोटा येथे आले आहेत. इस्रोचा आम्हाला गर्व आहे, असं इथे आलेल्या लोकांनी सांगितलं. चेन्नईहून लॉन्चिंग पाहण्यासाठी आलेल्या बामा यांनी सांगितलं की, “मी पहिल्यांदा इथे आलीय. मला माझा आनंद शब्दात सांगता येणार नाही”

  • 02 Sep 2023 10:29 AM (IST)

    Aditya L 1 Live : लॉन्चिंग आधी ISRO कडून महत्त्वाची अपडेट

    इस्रोने माहिती दिलीय. श्रीहरीकोटामध्ये आज हवामान स्वच्छ आहे. मिशनच्या लॉन्चिंगसाठी वैज्ञानिक पूर्णपणे सज्ज आहेत. इस्रोप्रमुख एस. सोमनाथ बंगळुरुतील इस्रोच्या मुख्यालयात येणार आहेत. मिशनच्या लॉन्चिंगआधी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह इस्रोच्या कार्यालयात पोहोचतील.

  • 02 Sep 2023 09:44 AM (IST)

    Aditya L 1 Live : आदित्य एल 1 ला सूर्यापर्यंत पोहोचण्यासाठी किती दिवस लागणार?

    आदित्य एल 1 आज लॉन्च होईल. सूर्याच्या कक्षेपर्यंत पोहोचण्यासाठी या उपग्रहाला 125 दिवस लागतील अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिली. म्हणजे जवळपास 4 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागणार आहे.

  • 02 Sep 2023 09:22 AM (IST)

    Aditya L 1 Live : आदित्य स्थापित होणार तो L 1 पॉइंट म्हणजे नक्की काय?

    सर्वकाही ठरवल्यानुसार व्यवस्थित घडलं, तर आदित्य एल-1 हॅलो ऑर्बिटमध्ये प्रवेश करेल. सूर्याच्या कक्षेतील पाच पॉइंटपैकी हा एक पॉइंट आहे. पार्किंग स्पॉट म्हटलं तरी चालेल. L1 पॉइंटवरुन आदित्यच कुठल्याही अडथळ्याविना पूर्णवेळ सूर्यावर लक्ष राहील. सूर्यावर जे काही घडेल, त्याचे पृथ्वीवर काय परिणाम होतात, याच डिटेलमध्ये अभ्यास करता येईल.

  • 02 Sep 2023 08:47 AM (IST)

    Aditya L 1 Live : आदित्य एल 1 ला किती लाख किलोमीटरचा प्रवास करायचाय?

    चांद्रयान-3 प्रमाणे आदित्य सुरुवातीला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालेल. काही राऊंड मारल्यानंतर 15 लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या एल-1 पॉइंटच्या दिशेने कूच करेल. त्या पॉइंटवर भ्रमण करताना आदित्य एल 1 सूर्याच्या बाहेरील थराबद्दल माहिती देईल.

  • 02 Sep 2023 08:32 AM (IST)

    Aditya L 1 Live : हॅलो ऑर्बिट काय आहे?

    PSLV-C57 रॉकेट आदित्य L1 सॅटेलाइटला पृथ्वीच्या लोअर ऑर्बिटमध्ये सोडेल. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये L1 बिन्दु आहे. त्याला हॅलो ऑर्बिट म्हटलं जातं. तिथे आदित्य एल-1 ला स्थापित केलं जाईल.

  • 02 Sep 2023 08:08 AM (IST)

    Aditya L 1 Live : कुठून आणि किती वाजता होणार आदित्य एल 1 च लॉन्चिंग

    सतीन धवन अवकाश तळावरुन आदित्य एल 1 मिशनच लॉन्चिंग होणार आहे. PSLV-C57 हे रॉकेट आदित्य एल 1 उपग्रहाला पृथ्वीच्या लोअर ऑर्बिटमध्ये सोडेल. सकाळी 11 वाजून 50 मिनिटंनी लॉन्चिंग होईल.

  • 02 Sep 2023 07:57 AM (IST)

    Aditya L 1 Live : आदित्य एल 1 ला सूर्याच्या कुठल्या कक्षेत सोडणार?

    चांद्रयान-3 प्रमाणेच आदित्य सर्वप्रथम पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करेल. काही फेऱ्या मारेल. त्यानंतर 15 लाख किलोमीटरचा प्रवास करुन L-1 पॉइंटवर पोहोचेल. L-1 हा पृथ्वी आणि सूर्याच्या मधला एक पॉइंट आहे. या पॉइंटवर फेऱ्या मारताना आदित्य-एल 1 सूर्याच्या बाहेरच्या थराबद्दल माहिती देईल.

  • 02 Sep 2023 07:56 AM (IST)

    Aditya L 1 Live : आदित्य मिशनच आयुष्य किती वर्ष असेल?

    आदित्य एल-1 च आयुष्य पाच वर्षांच असेल. तो इतकी वर्ष सूर्याभोवती फेऱ्या मारेल. सूर्यावरील वादळं, सूर्यावरील कोरोना आणि अन्य घडामोडींसंबंधी माहिती मिळवेल.

  • 02 Sep 2023 07:55 AM (IST)

    Aditya L 1 Live : भारताच्या आधी कुठल्या देशांनी सूर्य मोहिमा केल्या?

    आदित्य L 1 मिशनचा खर्च 400 कोटी रुपये आहे. NASA ला सूर्य त्याच सूर्य मोहीमेसाठी 12,300 कोटी रुपये खर्च आला होता. चांद्रयान मोहिम सुद्धा भारताने अत्यंत कमी खर्चात यशस्वी करुन दाखवली होती. फक्त 600 कोटीच्या घरात या मिशनसाठी खर्च आला होता.

  • 02 Sep 2023 07:53 AM (IST)

    Aditya L 1 Live : भारताच्या आधी कुठल्या देशांनी सूर्य मोहिमा केल्या?

    भारताच्या आधी अमेरिका, जापान, यूरोप आणि चीनने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी उपग्रह पाठवले आहेत. सूर्यावर जाणारा भारत पहिला देश नाहीय.

Published On - Sep 02,2023 7:52 AM

Follow us
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.