Aditya L1 फक्त 400 कोटीमध्ये देणार सूर्याची माहिती, नासापेक्षा 97 टक्के स्वस्त बजेट
Aditya L1 Mission | म्हणजे NASA ने त्यांच्या सूर्य मिशनसाठी किती हजार कोटी खर्च केले?. भारताची ही पहिली सूर्य मोहीम आहे. त्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. चांद्रयान-3 च्य यशामुळे देशवासियांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात उंचावला आहे.
हैदराबाद : मागच्या महिन्यात चांद्रयान-3 च चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करुन इस्रोने यशाचा झेंडा रोवला आहे. आता सूर्याच्या दिशेने झेप घेण्याचा दिवस आहे. चंद्रावर पोहोचण थोडं सोपं होतं. पण सूर्यापर्यंतच अंतर कापण सोपं नाहीय. महत्त्वाचे म्हणजे आदित्य एल 1 च बजेट फक्त 400 कोटी रुपये आहे. चांद्रयान-3 च्या तुलनेत या मिशनची कॉस्ट 200 कोटीने कमी आहे. चांद्रयान-3 वर 615 कोटी रुपये खर्च आला होता. दुसऱ्याबाजूला नासाच्या सूर्य मोहीमेपेक्षा इस्रोच मिशन 97 टक्के स्वस्त आहे. देशाच्या पहिल्या सूर्य मिशनबद्दल, त्याच वैशिष्ट्य काय? जाणून घ्या. भारताची पहिली सूर्य मोहीम आदित्य एल 1 मिशनच काऊंटडाऊन सुरु आहे. मागच्या महिन्यात चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं होतं.
भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला होता. इस्रोच्या या कामगिरीने सर्वांचा आत्मविश्वास उंचावला आहे. भारत सूर्यावर आपल पहिल मिशन लॉन्च करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. भारताला आणि इस्रोला आदित्य एल-1 मिशनकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. आदित्य एल -1 सतीशन धवन अवकाश तळावरुन लॉन्च करण्यात येईल. PSLV-C57 रॉकेट आदित्य L1 सॅटेलाइटला पृथ्वीच्या लोअर ऑर्बिटमध्ये सोडेल. सकाळी 11.50 ला लॉन्चिंग होईल. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये L1 बिन्दु आहे. त्याला हॅलो ऑर्बिट म्हटलं जातं. तिथे आदित्य एल-1 ला स्थापित केलं जाईल. सूर्याबद्दल महत्त्वाची माहिती या मिशनव्दारे मिळेल. सूर्याबद्दलची बरीच रहस्य उलगडतील अशी अपेक्षा आहे.
आदित्य एल 1 किती लाख किलोमीटरचा प्रवास करणार?
सूर्याच्या विभिन्न थरांबद्दल माहिती मिळेल. आदित्य एल-1 मिशनच आयुष्य पाच वर्ष असेल. तितका काळ हा उपग्रह सूर्याभोवती भ्रमण करेल. सूर्यावर येणारी वादळं, सौर कोरोना आणि अन्य घटकांबद्दल माहिती मिळेल. चांद्रयान-3 प्रमाणे आदित्य सुरुवातीला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालेल. काही राऊंड मारल्यानंतर 15 लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या एल-1 पॉइंटच्या दिशेने कूच करेल. त्या पॉइंटवर भ्रमण करताना आदित्य एल 1 सूर्याच्या बाहेरील थराबद्दल माहिती देईल. नासाने किती हजार कोटी खर्च केले?
इस्रोच्या प्रत्येक मिशनमधून एक नवीन कीर्तिमान स्थापित होतो. दुसऱ्या देशांच्या तुलनेत भारताने कमी बजेटमध्ये सोलर मिशनची योजना बनवली आहे. आदित्य एल 1 मिशनसाठी 400 कोटी रुपये खर्च आला. नासाने तेच आपल्या सूर्य मिशनसाठी 12,300 कोटी रुपये खर्च केले आहेत. इस्रो पुन्हा एकदा कमी खर्चात मिशन यशस्वी करण्याचा नवीन रेकॉर्ड करणार आहे.