Aditya-L1 : आदित्य L1 सूर्याच्या किती जवळ? तिसरा अर्थ बाऊंड मॅन्यूवर पार; मिशन सोलारची नवी अपडेट काय?
चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारताने आता सूर्याच्या दिशेने झेप घेतली आहे. भारताच्या या सोलार मिशनला यश येताना दिसत आहे. सूर्याच्या दिशेने झेपावलेल्या आदित्य एल-1ने अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.
नवी दिल्ली | 10 सप्टेंबर 2023 : आदित्य एल-1 सूर्याच्या दिशेने एक एक पाऊल टाकताना दिसत आहे. आदित्य एल-1 ने तिसरा अर्थ बाऊंड मॅन्यूवर यशस्वी पूर्ण केला आहे. आता आदित्य एल-1 296 किलोमीटर x 71767 किलोमीटर ऑर्बिट मध्ये पोहोचला आहे. इस्रोने रात्री 2 वाजून 30 मिनिटाने ट्विट करून त्याची माहिती दिली. आदित्य एल-1ने ISTRAC बंगळुरूपासून तिसरा अर्थ बाऊंड मॅन्युवर यशस्वी पूर्ण केल्याचं इस्रोने म्हटलं आहे. हा अभिमानास्पद क्षण आहे. चांद्रयानापाठोपाठ आता भारताची सूर्यावर झेप घेण्याची मिशनही यशस्वी होताना दिसत आहे.
ISTRAC/ISROच्या मॉरिशस, बंगळुरू आणि पोर्ट ब्लेअर येथील ग्राऊंड स्टेशन्सने या ऑपरेशनच्या दरम्यान सॅटेलाईटवर नजर ठेवली होती. आता एल-1 296 km x 71767 किलोमीटर ऑर्बिटमध्ये पोहोचला आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ठरल्याप्रमाणे हे यान काम करत असून यानाचं काम असचं सुरू राहिल्यास सूर्याच्या बाबतची माहिती मिळण्यास यश मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दुसरा अर्थ बाऊंड पाच दिवसांपूर्वीच पूर्ण
आदित्य एल-1 ने दुसरा अर्थ बाऊंड मॅन्यूवर पाच दिवसांपूर्वीच म्हणजे 5 सप्टेंबर रोजी पूर्ण केला होता. आता आदित्य एल-1चा अजून एक मॅन्यूवर आहे. 15 सप्टेंबर रोजी त्याचं शेड्यूल आहे. त्यानंतर सन अर्थ सिस्टिममध्ये याला लँगरेंज 1 पॉइंटमध्ये स्थापित केलं जाणार आहे. हा पॉइंटपासून पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर आहे.
या पॉइंटवरून सूर्याचा अधिक जवळचा व्ह्यू पाहायला मिळतो. या पॉइंटला आदित्य एल-1 स्थापित झाल्यावर अत्यंत जवळून सूर्याचं निरीक्षण करण्यास मदत मिळणार आहे. 125 दिवसानंतर आदित्य एल-1 लँगरेंजे 1 पॉइंट म्हणजे एल 1 पॉइंटपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. यापूर्वी या यानाने पहिला मॅन्यूवर 3 सप्टेंबर रोजी पूर्ण केला होता.
मिशन कधी सुरू झालं?
2 सप्टेंबर रोजी आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर लॉन्च करण्यात आलं होतं. PSLV-C57 रॉकेटद्वारे ते लॉन्च करण्यात आलं होतं. सूर्यावरील भारताचं हे पहिलंच मिशन आहे. यापूर्वी अनेक देशांनी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अनेक यान पाठवले आहे. आदित्य एल -1 सूर्यावर लँड करणार नाही. तर सूर्याच्या जास्तीत जास्त जवळ जावून सूर्याचं निरीक्षण करणार आहे.
त्यामुळे संशोधनात अनेक महत्त्वाचे मुद्दे मिळणार आहेत. सूर्य पृथ्वीपासून 15.1 कोटी किलोमीटर दूर आहे. विशेष म्हणजे चांद्रयान मोहीम यशस्वी केल्यानंतर भारताने लगेच सूर्यावर स्वारी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारताच्या या महत्त्वकांक्षी मोहिमेकडे केवळ भारतातील जनतेचंच नव्हे तर जगातील सर्वच देशांचं लक्ष लागलं आहे.