आदिवासी नेत्याला काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष करा; शिवाजीराव मोघे सोनिया गांधींना भेटणार
काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाच्या बदलाच्या हालचाली सुरू झालेल्या असतानाच काँग्रेस नेते शिवाजीराव मोघे यांनी मोठं विधान केलं आहे. (adivasi leader should be congress maharashtra president)
नवी दिल्ली: काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाच्या बदलाच्या हालचाली सुरू झालेल्या असतानाच काँग्रेस नेते शिवाजीराव मोघे यांनी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आदिवासी नेत्याला संधी द्या, अशी मागणीच शिवाजीराव मोघे यांनी केली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्षपद मिळवण्यासाठी रस्सीखेच सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे. (adivasi leader should be congress maharashtra president)
दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवाजीराव मोघे यांनी ही मागणी केली. महाराष्ट्र काँग्रेसला गत वैभव मिळवून देणाऱ्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष करायला हवं. तसेच आदिवासी समाजातील नेत्याला प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे पक्षाने आदिवासी नेत्याला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बसवावे, अशी मागणी मोघे यांनी केली. मोघे यांनी ही मागणी केल्याने ते सुद्धा या स्पर्धेत असल्याचं बोललं जात आहे.
सोनियांकडे मागणी करणार
आदिवासी समाज कधीही काही मागत नाही. यामुळे आदिवासी नेत्याकडे पक्षाने प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली पाहिजे, असं सांगतानाच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आदिवासी समाजाला नेतृत्व देण्याची मागणी करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
मोदी सरकार हुकूमशहाच्या भूमिकेत
यावेळी मोघे यांनी मोदी सरकारवरही जोरदार टीका केली. केंद्रातील मोदी सरकार हुकूमशहाच्या भूमिकेत आहे. त्यामुळेच ते शेतकऱ्यांशी चर्चा करत नाही, अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, आज दुपारी विज्ञान भवन येथे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकार दरम्यान कृषी कायद्यांवर चर्चा होणार आहे. एकूण 40 शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार आहेत. तसेच केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, पीयूष गोयल आदी मंत्री सरकारकडून बैठकीत सहभागी होणार असून कृषी कायद्यावर तोडगा काढण्यासाठीची ही आठवी बैठक आहे. (adivasi leader should be congress maharashtra president)
ओबीसी नेत्यांची नावे चर्चेत
दरम्यान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांच्या रुपाने मराठा नेत्याची निवड करण्यात आल्यानंतर आता प्रदेशाध्यक्षपदासाठी ओबीसी नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते राजीव सातव आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. परंतु, हे तिन्ही नेते बाहेरच्या पक्षातून आल्याने त्यांच्या नावाला मूळ काँग्रेसी नेत्यांनी विरोध दर्शवल्याचं सूत्रांनी सांगितलं. या तिन्ही नेत्यांच्या नावाला तीव्र विरोध झाल्यास काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा होऊ शकते, असं सांगितलं जातं. (adivasi leader should be congress maharashtra president)
VIDEO | TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 7:30 PM | 7 January 2021https://t.co/fvkh4MICtg#Top9 #Top9News #BreakingNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 7, 2021
संबंधित बातम्या:
मुंबई महापालिकेत शिवसेना-काँग्रेस वाद शिगेला! कशी होणार महाआघाडी?
शिवसेनेला मुंबईत जशास तशी टक्कर देण्याची काँग्रेसची तयारी! भाई जगतापांच्या हाती कोणती सूत्रं?
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या निवडीतही निष्ठावान Vs आयाराम गयाराम?
(adivasi leader should be congress maharashtra president)