दोन मुलांपेक्षा जास्त मुले असल्यास सवलती बंद ? अर्थसंकल्पात तरतूद करण्याची…

Union Budget 2024 | दोन पेक्षा जास्त मुले असल्यास त्याला कोणत्याही प्रकारची सबसिडी दिली जाऊ नये. कोणत्याही सरकारी योजनेचा त्याला लाभ दिला जाऊ नये. त्याची पदोन्नती रोखण्यात यावी, अशी मागणी जनतेने आपल्या सूचना देऊन केली आहे.

दोन मुलांपेक्षा जास्त मुले असल्यास सवलती बंद ? अर्थसंकल्पात तरतूद करण्याची...
Follow us
| Updated on: Jan 07, 2024 | 2:55 PM

नवी दिल्ली, दि. 7 जानेवारी 2024 | लोकसभेची निवडणुकीची रणधुमाळी एप्रिल, मे महिन्यात होत आहे. यामुळे यंदा अंतरिम बजेट सादर करण्यात येणार आहे. येत्या 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. लोकसभे निवडणूक असल्यामुळे अर्थसंकल्पात योजना आणि सवलतींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अर्थसंकल्पासंदर्भात लोकांची मते मागण्यात आली आहे. यावेळी जनतेकडून अनेक सूचना आल्या आहेत. त्यात महत्वाची सूचना म्हणजे दोन पेक्षा जास्त मुले असल्यास सर्वच सवलती रद्द करण्याची आहे.

काय आहेत सूचना

सामान्य व्यक्तींकडून ई मेल आणि माईगव वेबसाईट (MyGov) जनतेकडून अर्थसंकल्पाबाबत सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यानंतर अनेक सूचना आल्या आहेत. त्यात कोणी म्हटले की, दोन पेक्षा जास्त मुले असल्यास त्याला कोणत्याही प्रकारची सबसिडी दिली जाऊ नये. कोणत्याही सरकारी योजनेचा त्याला लाभ दिला जाऊ नये. त्याची पदोन्नती रोखण्यात यावी. त्याला निवडणूक लढवण्यावर बंदी आणावी. तसेच त्याला सरकारचा कोणताही पुरस्कार दिला जाऊ नये. वाहनांची स्क्रॅप पॉलिसीसंदर्भात सूचना आली आहे. वाहने पंधरा वर्षांऐवजी वीस वर्षांनी स्क्रॅप करण्याची सूचना करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

गृहकर्जासंदर्भात अशी केली मागणी

जनतेने गृहकर्जासंदर्भात मागणी केली आहे. मागील वर्षी देशांत पाच लाख घरांची विक्री झाली होती. पुढील वर्षी अशीच विक्री राहणार आहे. यामुळे गृहकर्जावर देण्यात येणारी करातील सूट दोन लाखांवरुन पाच लाख करण्यात यावी. हाऊसिंग प्रोजेक्टसाठी सिंगल विंडे प्रणाली आणली गेली पाहिजे. निवृत्तीनंतर कॅन्ट्रॅकवर सरकारी नोकरी करणाऱ्यांना पेन्शन दिले जाऊ नये, अशी एक सूचना आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅसची किंमत कमी करण्याची मागणी काही जणांनी केली आहे. वरिष्ठ नागरिकांना रेल्वेतील सवलत पुन्हा सुरु करा, वरिष्ठ नागरिकांसाठी तीर्थयात्रा योजना करा, तत्काल तिकीट कन्फर्म मिळायला हवे, मुंबई, कोलकोता, बंगळुरु, हैदराबाद, अहमदाबाद शहरात हायस्पीड ट्रेन सुरु करण्याची मागणी केली आहे.

'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.