ISRO | चंद्र, सूर्यानंतर भारताची पुढची झेप आता ‘या’ ग्रहावर, जाणून घ्या ISRO च्या या स्पेशल मिशनबद्दल

ISRO | भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने आता एका महत्त्वाच्या मिशनवर काम सुरु केलय. पुढच्यावर्षी हे मिशन लॉन्च होऊ शकतं. सध्या इस्रोच्या टीमचा सर्व फोकस आदित्य L1 आणि मिशन गगनयानवर आहे. चांद्रयान सीरीजप्रमाणे भारताची ही दुसरी मोहिम असेल. इस्रोच्या वैज्ञानिकांनी आपल्या कामगिरीने याआधी सुद्धा थक्क करुन सोडलय.

ISRO | चंद्र, सूर्यानंतर भारताची पुढची झेप आता 'या' ग्रहावर,  जाणून घ्या ISRO च्या या स्पेशल मिशनबद्दल
ISRO New Mission
Follow us
| Updated on: Nov 07, 2023 | 9:19 AM

बंगळुरु : यशस्वी चांद्रयान-3 मिशननंतर इस्रोकडून भरपूर अपेक्षा वाढल्या आहेत. सध्या भारताची आदित्य एल-1 ही सूर्य मोहीम सुरु आहे. त्यानंतर मिशन गगनयान आहे. याकडे सगळ्या देशाच लक्ष लागलं आहे. कारण भारताची ही पहिली मानवी अवकाश मोहिम आहे. त्यानंतर ISRO ने आता आणखी एक महत्त्वाच्या मिशनवर काम सुरु केलय. 2014 नंतर भारत पुन्हा एकदा या मिशनवर काम करतोय. चंद्र, सूर्यानंतर ISRO आता मंगळ ग्रहाची रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी ISRO ने तयारी सुरु केली आहे. 2024 मध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो मंगळयान-2 मिशन लॉन्च करणार आहे. NASA ला ज्यामध्ये यश मिळालेलं नाहीय, ती रहस्य उलगडण्याचा इस्रो प्रयत्न करणार आहे. त्याआधी इस्रोच सर्व लक्ष मिशन गगनयानवर आहे. भारताची ही पहिली मानवी अवकाश मोहीम आहे.

चंद्रयान-3 चं चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग करुन भारताने इतिहास रचला. त्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्थेने आणखी एक यश मिळवलं. सूर्याचा जवळून अभ्यास करण्यासाठी आदित्य L-1 मिशन ल़ॉन्च केलं. या यानाचा सध्या L1 पॉइंटच्या दिशेने प्रवास सुरु आहे. गगनयान मिशनची टेस्टिंग जवळपास पूर्ण झाली आहे. इस्रोच्या वैज्ञानिकांनी आता मंगळयान-2 वर काम सुरु केलय. 2024 च्या अखेरपर्यंत इस्रो मिशन मंगळयान लॉन्च करु शकतं. हे मार्स ऑर्बिटर मिशन -2 असणार आहे. याआधी 2014 साली भारताची पहिली मंगळ मोहीम यशस्वी ठरली होती. महत्त्वाच म्हणजे पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यशस्वी पाऊल ठेवणारा भारत जगातील पहिला देश ठरला होता.

आता दुसऱ्या मिशनचा उद्देश काय?

मंगळयान-1 ही भारताची दुसऱ्या ग्रहावरील पहिली मोहीम होती. पीएसएलव्ही रॉकेटद्वारे हे मिशन लॉन्च करण्यात आलं होतं. मंगळाच्या कक्षेत यशस्वीरित्य मंगळयान-1 ने प्रवेश केला होता. मंगळाच्या कक्षेत पोहोचणारा भारत जगातील चौथा देश ठरला होता. आता इस्रो मंगळ ग्रहाच्या पुढच्या टप्प्यावर काम सुरु करणार आहे. मार्स ऑर्बिटर मिशन -2 मध्ये मंगळाच्या ऑर्बिटमधूनच तिथलं पर्यावरण आणि वातावरणाचा अभ्यास करण्यात येईल. या मिशनद्वारे माहिती नसलेली बरीच नवीन माहित मिळू शकते.

मंगळयान-2 मध्ये किती पेलोड असतील?

मंगळयान-2 मिशनमध्ये चार पेलोड पाठवण्यात येतील. मार्स ऑर्बिट डस्ट एक्सपेरिमेंट (MODEX) असेल. हा पेलोड मंगळावरील धुळीचा अभ्यास करेल. त्याशिवाय एनर्जेटिक आयन स्पेक्ट्रोमीटर (EIS) असेल. त्याद्वारे चुंबकीय किंवा गुरुत्वाकर्षणाची माहिती मिळवली जाईल. रेडियो ऑकल्टेशन (RO) हा तिसरा पेलोड मंगळावरील वातावरणाचा अभ्यास करेल. इलेक्ट्रिक फील्ड एक्सपेरिमेंट या चौथ्या पेलोडमध्ये हाय रिजॉल्यूशन कॅमेरा असेल, ज्याद्वारे मंगळाचे फोटो काढण्यात येतील. सध्या मंगळावर नासाच मार्स एटमोस्फेयर एंड वोलेटाइल एवोल्युसन म्हणजे Maven मिशन सुरु आहे. 2 वर्षांसाठी हे मिशन डिजाईन करण्यात आलं होतं. 2013 मध्ये सुरु झालेली ही मोहीम अजून सुरु आहे. हे यान मंगळावर काम करणाऱ्या नासाच्या रोव्हरशी कनेक्ट आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.