PUBG murder: 16 वर्षांच्या भावाने मम्मीला गोळी मारल्यानंतर, धक्क्यात असलेल्या 10 वर्षांच्या चिमुरडीने 12 दिवसांनी सोडले मौन, म्हणाली..

तिचे वडील काही दिवसांनी लखनौला पोहोचले, तिचा 16वर्षांचा भाऊ बालसुधारगृहात पाठवण्यात आला आणि तिची हक्काची आई तिच्यासमोर गेली. हे सगळ्या दु:खाचा डोंगर या 10वर्षांच्या लहान मुलीला सोसावा लागला. तिची घरातून सुटका झाल्यानंतर ती कुणाशीच बोलत नव्हती. आता या घटनेला 12दिवस उलटून गेल्यानंतर या 10वर्षांच्या मुलीने तिचे मौन सोडले आहे.

PUBG murder: 16 वर्षांच्या भावाने मम्मीला गोळी मारल्यानंतर, धक्क्यात असलेल्या 10 वर्षांच्या चिमुरडीने 12 दिवसांनी सोडले मौन, म्हणाली..
PUBG murder 10 year girlImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 5:57 PM

लखनौ – 16वर्षांच्या मुलाने ज्यावेळी आईची हत्या (Son killed mother)केली, त्यावेळी त्याची 10वर्षांची लहान बहीणही (10 years old younger sister)घरात होती. तीन दिवस आईचा मृतदेह घरात असताना, ती शेजारच्या खोलीत होती. (3 days dead body in home) भावाने तिला धमकावून दुसऱ्या खोलीत ठेवलेले होते. या लहानगीने भावाने गोळी मारताना पाहिल्याचे अनेकजण सांगत होते. हा सगळा प्रकार जेव्हा समोर आला, पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतर, या 10वर्षांच्या लहानगीचीही तिथून सुटका करण्यात आली होती. तिचे वडील काही दिवसांनी लखनौला पोहोचले, तिचा 16वर्षांचा भाऊ बालसुधारगृहात पाठवण्यात आला आणि तिची हक्काची आई तिच्यासमोर गेली. हे सगळ्या दु:खाचा डोंगर या 10वर्षांच्या लहान मुलीला सोसावा लागला. तिची घरातून सुटका झाल्यानंतर ती कुणाशीच बोलत नव्हती. आता या घटनेला 12दिवस उलटून गेल्यानंतर या 10वर्षांच्या मुलीने तिचे मौन सोडले आहे.

काय सांगितले या 10वर्षांच्या चिमुरडीने

ही मुलगी या सर्व घटनाक्रमात त्या घरात राहत होती. तिने सांगितले की – मी माझ्या भावाला गोळी मारताना पाहिले नाही. मला फक्त आवाज ऐकू आला. मम्मी बेडवर पडली होती, रक्त पसरलेलं होतं. भावाने माझा चेहरा दुसऱ्या बाजूला फिरवला आणि त्याने मला शेजारच्या खोलीत नेलं. त्याने मला तिथे सोडले आणि तो स्कुटी घएऊन बाहेर निघून गेला. मी त्याच खोलीत काही वेळ बसून राहिले. त्यानंतर मी उठून मम्मीच्या खोलीत गेले. दरवाजा उघडला तर आई तडफत होती. मी तिच्या जवळ गेले आणि तिला हात लावला. तिला मिठई मारमार होते, तेवढ्यात भाऊ आला. मला काही कळत नव्हतं. मी पळाले आणि शेजारच्या खोलीत गेले. ज्या रात्री हा प्रकार घडला त्यावेळी दुसरे कुणी घरात होते का असा प्रश्न तिला विचारला गेला, तेव्हा तिने मानेनेच नाही असे उत्तर दिले.

भावाने घरभर मारला रुम फ्रेशनर

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरात घाणेरडा वास यायला लागला. मी भावाला सांगितले की वास येतोय. त्यानंतर त्याने सगळ्या घरात रुम फ्रेशनर मारला. नंतर दुसऱ्या दिवशी वास अधिक उग्र झाला. तेव्हा भआवाने सांगितले की घराजवळच्या खडड्यात जनावर मरुन पडले आहे.

हे सुद्धा वाचा

सगळं व्यवस्थित होईल, पप्पा येतील तेव्हा बघतील

साधना सिंह यांची 4जून रोजी हत्या करण्यात आली. त्यावेळी घरात 16वर्षांचा मुलगा ज्याने गोळी झाडली आणि 10वर्षांची मुलगी एवढेच उपस्थित होते. पुढे काय झाले हेही मुलीने सांगितले – मी आईच्या शेजारच्या खोलीत होते. भावाने मम्मीच्या खोलीची किल्ली माझ्याकडेच दिली होती. त्या रात्री उशिरा मम्मीच्या खोलीत गेले तेव्हा मम्मी बेडवर आधी पडलेली तशीच पाठीवर पडलेली होती. मी झोपायला जायच्या आधीही ती त्याच स्थितीत होती. तिच्या डोक्यातून येत असलेले रक्त फरशीवर पसरलेले होते. तिचे दोन्ही हात जोरजोरात हलत होते. पायही हलत होते. खूप भीती वाटत होती.

भावाने धीर दिला होता

भाऊ परत आल्यावर रडत तिने भावाजवळ जाऊन मम्मी एवढेच म्हटले. त्याच्यावर भावाने तिला शांत राहण्याचा इशारा केला. भाऊ तिला म्हणाला की- सगळं काही ठीक होईल, काही दिवसांत. मी आहे, तू घाबरु नकोस. तुझ्या खोलीतून बाहेर जाऊ नकोस. मम्मीची खोली उघडू नकोस. पप्पा येतील, तेव्हा बघू. तोपर्यंत मी काहीतरी करतो.

मम्मी मेली आहे, हे माहितच नाही

घरातून 7 जूनला या मुलीची सुटका केल्यानंतर, तिला नातेवाईकांकडे ठेवण्यात आले आहे. तिथे अनेक जण तिला त्या रात्री घरात काय झाले, हे विचारतायेत. आत्तापर्यंत तिने इतकेच सांगितले आहे की भावाने गोळी मारताना पाहिलेले नाही. तिच्या भावाने जे पोलिसांना सांगितले आहे, तेच ती सांगते आहे. आपली मम्मी मेली आहे, हेही या लहानगीला अजून माहिती नाही.

भाऊ मम्मीच्या कुत्र्याला घरात येऊ देत नव्हता

त्या रात्री मम्मीचा कुत्रा मॅक्स खूप जोरात भुंकत होता. भावाने त्याला लॉबीत बांधून ठेवले होते. मॅक्स भुंकायचा थांबतच नव्हता. तो जास्त ओरडायला लागला की भाऊ त्याला सोडायचा. तो मम्मीच्या खोलीकडे जायला लागला, की चिडून भाऊ त्याला पुन्हा बांधून ठेवत असे. असेही या लहान मुलीने सांगितले आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.