Heart Attack : हार्ट अटॅकसाठी सात रुपयांच्या या तीन औषधी ठरतात रामबाण

Heart Attack : ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर ह्रदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सर्वात आधी जे उपचार करतात किंवा ज्या गोळ्या देतात त्या गोळ्या या किटमध्ये आहे. त्यामुळे ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर घरीच या औषधीचे सेवन केल्यास आपले प्राण वाचण्याचे प्रमाण अधिक आहे.

Heart Attack : हार्ट अटॅकसाठी सात रुपयांच्या या तीन औषधी ठरतात रामबाण
Follow us
| Updated on: Feb 20, 2024 | 12:28 PM

नवी दिल्ली | बदलत्या जीवनशैलीमुळे ह्रदयविकार हा आजार आता सामान्य झाला आहे. परंतु सध्या या आजाराचे प्रमाण वाढले आहे. हा आजार जीवघेणा ठरु लागला आहे. अगदी युवकांनाही हा आजार होत आहे. ह्रदयविकारासाठी सात रुपयांची एक किट खूप उपयुक्त ठरणार आहे. सात रुपयांच्या या किटमध्ये तीन प्रकारच्या गोळ्या दिल्या गेल्या आहेत. लखनऊमध्ये तयार केलेल्या या किटला राम किट नाव दिले आहे. परंतु ही किट आपण कोणत्याही शहरात असलो तरी आपणास तयार करता येणार आहे. कलाकार ऋतुराज सिंह यांचे ह्रदयविकाराने २० फेब्रुवारी रोजी निधन झाले. यामुळे ह्रदयविकार आल्यास प्रथम कोणत्या औषधी लागतात, त्याची माहिती…

ह्रदयविकाचा झटका आल्यावर घरीच औषधी घेतल्यास फायदा

ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर ह्रदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सर्वात आधी जे उपचार करतात किंवा ज्या गोळ्या देतात त्या गोळ्या या किटमध्ये आहे. त्यामुळे ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर घरीच या औषधीचे सेवन केल्यास आपले प्राण वाचण्याचे प्रमाण अधिक आहे. तसेच रुग्णालयापर्यंत पोहचण्याआधीच रुग्णावर उपचार सुरु होतात. त्यामुळे रुग्णालयात जाण्यापूर्वीच उपचार सुरु होऊन जातात.

काय आहेत या राम किटमध्ये

लक्ष्मीपत सिंघानिया इंस्टीट्यूट ऑफ कार्डियोलॉजी अँन्ड कार्डिएक सर्जरी या हॉस्पिटलने केलेल्या राम किटमध्ये तीन गोळ्या आहेत. त्यात इकोस्प्रिन (Ecosprin रक्त पातळ करणारे औषध), रोसुवास्टेटिन (Rosuvastatin कोलेस्ट्रॉलला कंट्रोल करणारी औषध) आणि सॉर्बिट्रेट (Sorbitrate चांगल्या कार्डीयक फक्शनसाठी, ही गोळी चघळण्यासाठी) या तीन औषधी आहेत. या औषधी ह्रदयविकारचा झटका आलेल्या रुग्णांना फायदेशीर ठरणाऱ्या आहेत.

हे सुद्धा वाचा

का दिले राम किट नाव

‘राम किट’ नाव भगवान राम याचे नावावरुन ठेवले आहे. कारण ईश्वरावर सर्वांची श्रद्धा आणि विश्वास असतो. या किटमध्ये रक्तपातळ करण्याची गोळी आहे. ह्रदयापर्यंत जाणाऱ्या सर्व रक्तवाहिन्या उघडण्याचे काम या औषधी करतात. प्राण वाचवणाऱ्या या औषधांची किमत फक्त सात रुपये आहे.

रामबाण ठरणार औषधी

औषधाला राम किट नाव दिले आहे. कारण भगवान राम यांचे बाण कधी लक्ष्य चुकवत नव्हते. यामुळे या औषधी प्रभू रामाच्या बाणासारखे लक्ष चुकवणार नाही. या राम किटवर भगवान रामाचा फोटो दिला आहे. तसेच औषधींसोबत रुग्णालयाच फोन नंबर दिला आहे, असे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.