Chandrayaan 4 | आता फक्त चंद्रावर जायचं नाही, तर रिर्टनही यायचं, कसं असेल चंद्रयान 4 मिशन?, जाणून घ्या डिटेल
Chandrayaan 4 | भारताच्या बहुप्रतीक्षित स्पेस मिशन गगनयान नंतर चंद्रयान-4 मिशन लॉन्च होईल. चंद्रयान 4 हे भारताच खूप Advance मिशन असेल. हे मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी भारताला काही वर्ष लागू शकतात. इस्रोने या मिशनबद्दल नवीन माहिती दिलीय.
Chandrayaan 4 | चंद्रयान-3 च्या यशानंतर ISRO ने चंद्रयान-4 मिशनवर काम सुरु केलय. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने या मिशनबद्दल माहिती दिलीय. चंद्रयान-4 मिशनमध्ये काय असेल?. चंद्रयान-3 मध्ये फक्त 3 मॉड्यूल होते. आता चंद्रयान-4 मध्ये 5 मॉड्यूल असतील. सॉफ्ट लँडिंगपासून चंद्रावरील नमुने गोळा करणं आणि सुरक्षित रित्या पृथ्वीवर परतण हे सर्व या मिशनमध्ये असणार आहे. काही दिवसांपूर्वी इस्रोचे प्रमुख एस.सोमनाथ यांनी या मिशनबद्दल माहिती दिली होती.
भारताच्या बहुप्रतिक्षित मिशन गगनयान नंतर चंद्रयान-4 मिशन लॉन्च होईल. हे मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी चार वर्ष लागू शकतात. यावर वेगाने काम सुरु आहे. त्यामुळे निर्धारित वेळेआधी सुद्धा मिशन लॉन्च होऊ शकतं. इस्रोने चंद्रयान-4 बद्दल सोशल मीडिया X वर नवीन माहिती दिलीय. यात मॉड्यूल, इंजिनबद्दल माहिती दिलीय.
चंद्रयान 4 फक्त भारताच मिशन नसेल, हा देशही सोबत असेल
चंद्रयान-4 हे जपानच्या JAXA सोबतच इस्रोच संयुक्त मिशन आहे. जापानच्या H3 रॉकेटने हे मिशन लॉन्च केलं जाऊ शकतं. चंद्रयान-4 मधून एकूण पाच मॉड्यूल चंद्रावर पाठवले जाणार आहेत. यात एसेंडर मॉड्यूल, डिसेंडर मॉड्यूल, प्रोपल्शन मॉड्यूल, ट्रांसफर मॉड्यूल आणि रीएंट्री मॉड्यूल असेल. प्रत्येक मॉड्यूलच वेगवेगळ काम असेल. महत्त्वाच म्हणजे दोन टप्प्यांमध्ये हे मिशन लॉन्च होणार आहे. सुरुवात पृथ्वीवरुन लॉन्चिंगने होईल. चंद्रावर लँड झाल्यानंतर तिथले नमुने गोळा करणार. त्यानंतर चंद्रावरुन पुन्हा पृथ्वीवर येण्यासाठी लॉन्चिंग होईल. चंद्रयान-4 च लॉन्चिंगवेळी एकूण वजन 5200 किलोग्रॅम असेल. चंद्रावरुन हे यान पृथ्वीच्या दिशेने येईल, त्यावेळी वजन 1527 किलो असेल. सहजतेने हा यानाला पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करता यावा, यासाठी यानाच वजन कमी असेल.
कुठल्या मॉड्यूलची काय जबाबदारी असेल?
प्रोपल्शन मॉड्यूल : रॉकेटपासून वेगळ झाल्यानंतर पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याची प्रोपल्शन मॉड्यूलची जबाबदारी असेल. चंद्रयान-3 मध्ये याच मॉड्यूलने हे काम केलं होतं.
डिसेंडर मॉड्यूल : प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळ झाल्यानंतर सर्व मॉड्यूलसना चंद्रावर उतरवण्याची जबाबदारी डिसेंडर मॉड्यूलची असेल.
एसेंडर मॉड्यूल : नमुने गोळा केल्यानंतर चंद्राच्या पुष्ठभागावरुन हे मॉड्यूल उड्डाण करेल. ट्रांसफर मॉड्यूलसोबत पृथ्वीवर येईल.
ट्रांसफर मॉड्यूल : चंद्रावर गोळा केलेले नमुने पुन्हा पृथ्वीवर आणण्याची जबाबदारी या मॉड्युलचीच असेल. री एंट्री मॉड्यूल : चंद्रावर गोळा केलेले नमुने सकुशल लँड करण्याची जबाबदारी या री एंट्री मॉड्यूलचीच असेल.
This is what we know so far about #ISRO‘s Moon sample return mission Chandrayaan-4:
The mission will involve a PSLV & a LVM3 launch & consist of 5 modules – Ascender, Descender, Propulsion, Transfer & Re-entry module.
Here’s a graphic showcasing each module & their functions 👇 pic.twitter.com/ZCRduWoqY0
— ISRO Spaceflight (@ISROSpaceflight) March 5, 2024
भारताच्या यशस्वी ठरलेल्या चंद्रयान 3 मिशनमध्ये तीन मॉड्यूल होते. यात प्रोप्ल्शन मॉड्यूल, लँडर मॉड्यूल आणि रोवर मॉड्यूल होता. चंद्राच्या कक्षेत पोहोचवण्याच काम प्रोप्ल्शन मॉड्यूलने केलं. लँडर मॉड्यूलने सॉफ्ट लँडिंग केली. रोव्हरने चंद्रावरील माहिती गोळा केली.