नवी दिल्ली : नवीन संसदेच्या इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी काळात लोकसभेच्या जागा वाढणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे पुन्हा नव्याने सीमांकनाची चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह आणि भाजपचे राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनीही नवीन सीमांकनाबाबत उल्लेख केला. यापूर्वी 1976 सीमांकन झाले होते. त्यानुसार लोकसभेच्या 543 जागा आहे. आता 2026 मध्ये सीमांकन होण्याची शक्यता आहे.
काय होणार बदल
गेल्या 52 वर्षांपासून लोकसंख्येच्या आधारे सीमांकन झालेले नाही. सध्याच्या लोकसभेच्या 543 जागा 1971 च्या जनगणनेच्या आधारावर आहे. 1971 च्या जनगणनेला आधार मानून शेवटचे परिसीमन 1976 मध्ये केले गेले. त्यावेळी देशाची लोकसंख्या 54 कोटी होती. त्यानंतर देशात शेवटची जनगणना 2011 मध्ये झाली होती. त्यावेळी देशाची लोकसंख्या सुमारे 121 कोटी होती. 2021 ची जनगणना अजून व्हायची आहे. परंतु आता देशाची लोकसंख्या 142 कोटी झाल्याचा अंदाज आहे.
राज्य | सध्याच्या जागा | नवीन बदल |
महाराष्ट्र | ४८ | ८२ |
उत्तर प्रदेश | ८० | १४७ |
बिहार | ४० | ७६ |
पश्चिम बंगाल | ४२ | ६७ |
आंध्र प्रदेश | २५ | ३७ |
तेलंगाना | १७ | २५ |
मध्य प्रदेश | २९ | ५५ |
तामिळनाडू | ३९ | ५३ |
राजस्थान | २५ | ५० |
कर्नाटक | २८ | ४५ |
गुजरात | २४ | ४४ |
महाराष्ट्रात 82 जागा
1971 मध्ये प्रत्येक 10 लाख लोकसंख्येमागे लोकसभेची एक जागा असा फॉर्म्युला स्वीकारण्यात आला होता. त्यामुळे त्यावेळी 543 लोकसभेच्या जागा निश्चित झाल्या. 2011 मध्ये देशाची लोकसंख्या सुमारे 121 कोटी होती. परंतु 2026 मध्ये समान जनगणनेचा आधार घेत परिसीमन केले आणि 10 लाख लोकसंख्येमागे एक जागा हे सूत्र स्वीकारले तर देशभरात एकूण 1210 जागा असतील. परंतु नवीन संसदेच्या लोकसभेत जास्तीत जास्त 888 खासदारच बसू शकतील. परिसीमनाच्या आधारे 1210 जागांसह हे समायोजित केले तर यूपीला 147 जागा मिळतील आणि महाराष्ट्राला 82 जागा मिळतील. हाच फॉर्म्युला इतर राज्यांमध्येही लागू होईल.
काय होणार बदल
सीमांकनानंतर दक्षिणेकडील पाच राज्यांमध्ये 42% जागा वाढतील. तर आठ हिंदी भाषिक राज्यांतील जागा सुमारे 84 टक्क्यांनी वाढतील. म्हणजेच दक्षिणेकडील राज्यांच्या तुलनेत दुप्पट जागा. गेल्या निवडणुकीत या आठ राज्यांतून भाजपला 60 टक्के जागा मिळाल्या होत्या. म्हणजेच नवीन सीमांकन भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे.
कधी कधी झाले सीमांकन
हे ही वाचा
नवीन मार्गांवर जाऊन नवीन कीर्तिमान होतात…मोदी यांनी दिला विरोधकांना मोठा संदेश
नवीन संसद भवनावर राज ठाकरे यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, ट्विट करत म्हटलं…