G20 Summit : भारतात आलेल्या एका राष्ट्रप्रमुखाने पाकिस्तानला दाखवून दिली जागा
G20 Summit : पाकिस्तानला अजिबात भाव दिला नाही. एकवेळ या देशाचे पाकिस्तानसोबत खूप चांगले संबंध होते. पण आता हा देश भारताच्या खूप जवळ आला आहे. पाकिस्तानी नागरिक आता आपल्याच देशाची खिल्ली उडवत आहेत.
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये G20 शिखर परिषद समाप्त झाली आहे. परिषदेसाठी आलेले जागतिक नेते मायदेशी परतले आहेत. पण सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स सोमवारी दिल्लीतच थांबले. द्विपक्षीय चर्चेमध्ये त्यांनी सहभाग घेतला. 100 बिझनेसमन आणि 7 मंत्र्यांच्या शिष्टमंडळासह सौदीचे क्राऊन प्रिन्स भारतात आले आहेत. पंतप्रधान मोदी आणि क्राऊन प्रिन्समध्ये जी केमिस्ट्री आहे, त्याचा परिणाम जागतिक मंचावर दिसून आलाय. भारत आणि सौदी अरेबियात अनेक करारांवर स्वाक्षरी झाल्या आहेत. यात एनर्जी सेक्टर आणि चीनच्या BRI ला उत्तर देण्यासाठी कॉरिडोर बनवण्याचा प्लान आहे. पीएम मोदी यांनी खाडी देशांसोबत संबंध अधिक भक्कम करण्यावर जोर दिला आहे. यात सौदी अरेबियावर त्यांचा फोकस आहे. 2016 आणि 2019 मध्ये त्यांनी सौदी अरेबियाचा दौरा केला आहे.
अनेक करार केले आहेत. इस्लामिक देशांवर सौदी अरेबियाचा मोठा प्रभाव आहे. याचा वापर करुन पाकिस्तानला साइडलाइन करण्याच्या प्लानचा परिणाम आता दिसू लागलाय. सौदी अरेबिया भारताचा सर्वात मोठा STARTEGIC पार्टनर आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलय. “ही पार्ट्नरशिप नेक्स्ट लेव्हलवर घेऊन जाण्यासाठी आम्ही अनेक काम केली आहेत. आम्हाला मिळून मानवतेच्या भल्यासाठी काम करण्याची प्रेरणा मिळेल. सौदी अरेबिया आणि भारताची मित्रता क्षेत्रीय समृद्धी आणि मानवी कल्याणासाठी आवश्यक आह” आजच्या बैठकीतून दोन्ही देशाच्या संबंधांना नवीन दिशा मिळेल. मानवतेच्या भल्यासाठी काम करण्याची प्रेरणा मिळेल. भारतासाठी वेळच वेळ
रविवारी भारत, पश्चिम आशिया आणि युरोप दरम्यान कॉरिडोर स्थापित करण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. यामुळे फक्त दोन देश जोडले जाणार नाहीत, तर आशिया, पश्चिम आशिया आणि युरोप दरम्यान आर्थिक सहकार्य, ऊर्जा विकास आणि डिजिटल कनेक्टिविटीला बळ मिळेल. 2019 च्या भारत यात्रेनंतरचा सौदीच्या क्राऊन प्रिन्सचा हा दुसरा भारत दौरा आहे. सौदीच्या प्रिन्सकडे पाकिस्तानसाठी अजिबात वेळ नाहीय. अलीकडेच त्यांचा इस्लामाबाद दौरा रद्द झाला होता. पाकिस्तानात अनेक लोक आपल्याच सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडवत आहेत. सौदीच्या क्राऊन प्रिन्सकडे भारतासाठी वेळच वेळ आहे, अशी चर्चा पाकिस्तानात आहे.