लोकसभेत धडा घेतल्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपने कसा बदलला मार्ग?

लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळू शकले नाही. त्यानंतर भाजपने आता विधानसभा निवडणुकीत लोकसभेत झालेली चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने आपला ट्रॅक बदलला आहे.

लोकसभेत धडा घेतल्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपने कसा बदलला मार्ग?
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 5:48 PM

दुधामुळे जर तोंड जळालं तर माणूस ताक पण फुकून फुकून पितो असं म्हटलं जातं. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला मार्ग पूर्णपणे बदलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देवघर येथील सभेतील भाषण जर पाहिले तर ते लक्षात येईल. ‘अटॅक इज द बेस्ट डिफेन्स’ असे म्हटले जाते. पंतप्रधान मोदी सध्या त्याचाच वापर करत आहेत. आरक्षणाचा मुद्दा विरोधकांनी जोर लावून धऱला आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. या निकालातून भाजपने धडा घेतला. ज्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक आणि काँग्रेसने भाजपच्या विरोधात प्रचार केला. राहुल गांधी यांनी थेट हल्लाबोल केला. हेतूंवर प्रश्न उपस्थित केला. आरक्षण संपवणे हा त्यांचा एकमेव उद्देश असल्याचे म्हटले. त्यानंतर आता भाजप देखील आक्रमर झालेली पाहायला मिळतेय. एकीकडे योगी आदित्यनाथ ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देत इशारा देत आहेत, तर नरेंद्र मोदी ‘एक है तो सेफ है’चा नारा देत आहेत.

लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुकांमधून भाजपने धडा घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. एप्रिल-मे महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचार शिगेला असताना आरक्षणाबाबत अमित शहा यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फिरत होता. व्हिडीओ पाहून अमित शाह आरक्षण रद्द करणार असल्याचा दावा करत असल्याचे दिसत होते. जात जनगणनेच्या मुद्द्यावर आक्रमक होत विरोधकांनी जर भाजप सत्तेवर आली तर राज्यघटना धोक्यात येईल, असा प्रचार सुरु केला. कदाचित अतिआत्मविश्वासाने भाजपने विरोधकांचे हे बोलणं हलक्यात घेतले. मात्र, नंतर एडिटेड व्हिडिओबाबत पक्षाने गुन्हा दाखल केला, काहींवर कारवाईही झाली पण तोपर्यंत उशीर झाला होता.

आता विधानसभा निवडणुकीत भाजपला कोणतीही चूक करायची नाहीये. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ चा नारा देत विरोधकांच्या जात जनगणनेच्या मुद्दय़ाची धार बोथट करण्याचा प्रयत्न केला. ‘हिंदुंना जाती जातील फूट पाडण्याचा प्रयत्न झाला आहे. ‘एक हैं तो नेक हैं’ म्हणत ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेची सौम्य आवृत्तीही पीएम मोदींनी वाढवली.

काँग्रेसचे इरादे धोकादायक आहेत. काँग्रेसचे राजकुमार यांनी एससी, एसटी, ओबीसी आरक्षण रद्द करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांचे वडील (राजीव गांधी) काँग्रेसचे प्रमुख असताना त्यांनी आरक्षण रद्द करण्याची घोषणा केली होती, पण एससी, एसटी, ओबीसी यांच्या एकजुटीमुळे ते निवडणुकीत (१९८९ लोकसभा निवडणूक) पराभूत झाले होते. तेव्हापासून आजपर्यंत केंद्र सरकारमध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. ज्या राज्यांमध्ये एससी, एसटी आणि ओबींची लोकसंख्या जास्त आहे, तिथे काँग्रेसला मोठा झटका बसला होता.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून पीएम मोदींचा पलटवार

राहुल गांधी यांनीही विधानसभा निवडणुकीत ‘जात जनगणने’चा मुद्दा मांडला आहे. तर प्रत्युत्तरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर पलटवार करत राजीव गांधींना आरक्षण संपवायचे आहे, त्यांच्या मुलालाही तेच हवे आहे, असे म्हटले आहे.

राजीव गांधींच्या राजवटीत काँग्रेसने वर्तमानपत्रात जाहिराती दिल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय. आरक्षण हे बंधन आहे, ते बंधनकारक आहे. ते म्हणाले की, काँग्रेसला एससी, एसटी, ओबीसींचे ऐक्य नष्ट करायचे आहे आणि ज्या दिवशी असे होईल त्या दिवशी आरक्षण संपेल.

जात जनगणनेकडे लक्ष वेधत पीएम नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेस एससी, एसटी आणि ओबीसी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. ते म्हणाले की, ‘काँग्रेसने नवे षड्यंत्र रचले आहे. तुमच्या डोळ्यात धूळफेक करण्याची नवी खेळी काँग्रेसने खेळली आहे. या लोकांना एससी, एसटी, ओबीसीची सामूहिक शक्ती तोडायची आहे, तिचे तुकडे करायचे आहे. मी तुम्हाला इशारा देण्यासाठी आलो आहे. तुम्हाला जागे करण्यासाठी आलो आहे. तुम्हाला अधिक काळजी घ्यावी लागेल आणि लक्षात ठेवा की तुम्ही एक असाल तर तुम्ही सुरक्षित आहात.’

काँग्रेसवर आदिवासी महिलांचा अपमान केल्याचा आरोपही पंतप्रधान मोदींनी केला. ते म्हणाले, ‘काँग्रेसचे नेते आदिवासी मुलींचा अपमान करतात. भाजपने आदिवासी कन्येला राष्ट्रपती बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा काँग्रेसने त्यांचा पराभव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आजही ते राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान करतात.

विधानसभेच्या ८१ जागा असलेल्या झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात 13 नोव्हेंबरला 43 जागांवर मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात 20 नोव्हेंबरला 38 जागांसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. विधानसभेच्या 288 जागा असलेल्या महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात सर्व जागांसाठी मतदान होणार आहे. झारखंड निवडणुकीसोबतच 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.