RSS Chief Mohan Bhagwat : मोदी सरकारच कौतुक पण मणिपूरच्या मुद्यावर मोहन भागवत यांचं मोठं विधान, VIDEO

RSS Chief Mohan Bhagwat : आरएसएस प्रमुख मोहन भागवत सोमवारी 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय समापन समारंभ' कार्यक्रमात सहभागी झाले होते. निवडणुकीत संघाला ओढणं, निवडणूक मर्यादा, मणिपूरमधील अशांतता, दुसऱ्यांच्या मताचा सन्मान अशा मुद्यांवर मोकळेपणाने सरसंघाचालक मोहन भागवत यांनी आपले विचार व्यक्त केले.

RSS Chief Mohan Bhagwat : मोदी सरकारच कौतुक पण मणिपूरच्या मुद्यावर मोहन भागवत यांचं मोठं विधान, VIDEO
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 8:09 AM

निवडणुका झाल्यात, नव्या सरकारचा शपथविधी झाला. मंत्र्यांना खाते वाटप जाहीर झालं. आता निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी कोणाच नाव घेतलं नाही. पण इशाऱ्यांमध्ये बरच काही बोलून गेले. निवडणुकीत संघाला ओढणं, निवडणूक मर्यादा, मणिपूरमधील अशांतता, दुसऱ्यांच्या मताचा सन्मान अशा मुद्यांवर मोकळेपणाने सरसंघाचालक मोहन भागवत यांनी आपले विचार व्यक्त केले. नागपूरमध्ये ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय समापन समारंभाला’ ते संबोधित करत होते.

RSS प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, “निवडणुकीचे निकाल आलेत. सरकार सुद्धा बनलं आहे. जे झालं, ते का झालं? कसं झालं? हे लोकशाहीचे नियम आहेत. समाजाने आपल मत दिलय. संघाचे लोक यामध्ये पडत नाही. आम्ही निवडणुकीत परिश्रम करतो. जे सेवा करतात, मर्यादेने चालतात, सगळे लोक काम करतात. पण कुशलता लक्षात घेतली पाहिजे. मर्यादा आपला धर्म आणि संस्कृती आहे”

‘निवडणूक लढताना एक मर्यादा असते’

“सहमती व्हावी यासाठी संसद आहे. स्पर्धेमुळे यात अडचणी येतात. म्हणून बहुमताबद्दल बोलल जातं. निवडणुकीत संघासारख्या संघटनेला ओढण्यात आलं. बरच काही बोललं गेलं. टेक्नोलॉजीचा आधार घेऊन असं केलं गेलं. विद्येचा उपयोग प्रबोधनासाठी असतो. पण आधुनिक तंत्रज्ञानाचा चुकीचा वापर केला गेला. निवडणूक लढताना एक मर्यादा असते” असं सरसंघाचालक मोहन भागवत म्हणाले.

NDA सरकारबद्दल काय म्हणाले?

“सरकार बनलय. पुन्हा NDA च सरकार आलय. मागच्या 10 वर्षात बरच काही चांगलं झालय. जागतिक स्तरावर प्रतिष्ठा वाढली आहे. विज्ञान आणि संस्कृतीच्या क्षेत्रात आपण पुढे जातोय. पण म्हणून आव्हान संपली असं नाहीय. आपल्याला आता अन्य समस्यांमधून बाहेर पडायचं आहे” असं मोहन भागवत म्हणाले. मणिपूरबद्दल मोहन भागवत काय म्हणाले?

मणिपूरबद्दलही मोहन भागवत यांनी महत्त्वाच विधान केलं. “मणिपूर मागच्या वर्षभरापासून शांततेच्या प्रतिक्षेत आहे. वर्षभरापासून मणिपूर होरपळतय. हे कोणी घडवून आणलय का? याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला कसं बनायच आहे, याकडे लक्ष दिलं पाहिजे. सर्वांना स्वत:वर संयम ठेवावा लागेल. अजून बरीच काम करायची आहेत. सगळी काम फक्त सरकार करणार नाही. आम्ही चर्चा करतो, पण चर्चा करुन सर्वकाही होत नाही” असं मोहन भागवत म्हणाले.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.