Boycott Maldives | मालदीवची सगळी बुकिंग रद्द करणाऱ्या EaseMyTrip च्या प्रशांत पिट्टींची दुसरी मोठी घोषणा
Boycott Maldives | EaseMyTrip फक्त मालदीवची बुकिंग रद्द करुन थांबलेले नाहीत. त्यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतलाय. भारताच्या अपमानानंतर मालदीव विरोधात जनमानसात संतापाची भावना आहे. इज माय ट्रीपचे सहसंस्थापक प्रशांत पिट्टी यांनी दुसरी एक मोठी घोषणा केलीय.
Boycott Maldives | भारताच्या पंतप्रधानांचा अपमान करणाऱ्या मालदीवला येणाऱ्या दिवसात जबर किंमत मोजावी लागणार आहे. सोशल मीडियावर Boycott Maldives ट्रेंड होत असून भारतातील अनेक सेलिब्रिटी समोर आले आहेत. explore Indian islands म्हणून भारतात एक मोहिम सुरु झाली आहे. मालदीवला पर्याय ठरु शकणाऱ्या समुद्र किनाऱ्याचा प्रचार, प्रसार या मोहिमेतून सुरु झाला आहे. EaseMyTrip ही भारतातील दुसरी मोठी ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी आहे. त्यांनी एका मोठ्या धाडसी निर्णयाने सुरुवात केली. EaseMyTrip ने मालदीवची सगळी फ्लाइट बुकिंग रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यानंतर आता EaseMyTrip चे सहसंस्थापक प्रशांत पिट्टी यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. EaseMyTrip ही भारतात मोठी झालेली एक मेड इन इंडिया कंपनी आहे. मागच्यावर्षी या कंपनीचा टनओव्हर 8 हजार कोटी रुपये होता.
इज माय ट्रीपचे सहसंस्थापक प्रशांत पिट्टी यांनी एक मोठी घोषणा केलीय. यापुढे मालदीवची बुकिंग स्वीकारणार नाही हे त्यांनी जाहीर केलय. EaseMyTrip ही भारतातील दुसरी मोठी ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी आहे. “दरवर्षी भारतातून 3 लाख लोक मालदीवला जायचे, त्यांना आता EaseMyTrip वर मालदीवची सुविधा मिळणार नाही” हे त्यांनी स्पष्ट केलय.
यापुढे भारतातल्या या ठिकाणाचा प्रचार, प्रसार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला मालदीवपेक्षा लक्षद्वीपच्या रुपाने चांगल लोकेशन दाखवलय. त्या ठिकाणचे फोटो आणि व्हिडिओ दाखवलेत. आम्ही यापुढे लक्षद्वीपचा प्रचार, प्रसार करणार आहोत” असं प्रशांत पिट्टी यांनी जाहीर केलय. त्यांनी वेगवेगळ्या एअरलाइन कंपन्यांना लक्षद्वीपपर्यंत थेट कनेक्टिव्हिटी बनवण्याच अपील केलय. जेणेकरुन लोक थेट लक्षद्वीपला जाऊ शकतात.
#WATCH | Bengaluru: Co-founder of EaseMyTrip, Prashant Pitti says, “…Our company is entirely homegrown and made in India. Amid the row over Maldives MP’s post on PM Modi’s visit to Lakshadweep, we have decided that we will not accept any bookings for Maldives…We want Ayodhya… pic.twitter.com/99EQ0kxGZM
— ANI (@ANI) January 8, 2024
बिझनेसपेक्षा देश आमच्यासाठी महत्त्वाचा
“आम्ही लक्षद्वीपसाठी पाच पॅकेजेस आणलेत. त्याचबरोबर आम्ही अयोध्येचा सुद्धा प्रचार, प्रसार करणार आहोत. अयोध्येला आम्हाला आंतरराष्ट्रीय स्थळ बनवायच आहे, जगभरातून लोक तिथे आले पाहिजेत” असं प्रशांत पिट्टी म्हणाले. त्यांनी अन्य ट्रॅव्हल कंपन्यांना आपल्या अभियानात सहभागी होण्याच आवाहन केलय. बिझनेसपेक्षा देश आमच्यासाठी महत्त्वाचा आहे असं प्रशांत पिट्टी म्हणाले.
भारताने विषय लावून धरला
मालदीवच्या महिला मंत्री मरियम शिउना यांनी पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर या सगळ्या वादाला सुरुवात झाली. भारताने हा मुद्दा मालदीवच्या मोहम्मद मुइज्जू सरकारसमोर लावून धरलाय. भारत सरकारच्या नाराजीनंतर मरियम शिउनासह मालशा शरीफ आणि महजूम माजिद यांना निलंबित करण्यात आलं.