मोठी बातमी! दहशतवाद्यांची कुंडली भारताच्या हाती, थेट लिस्टच काढली; आता…
काश्मीरमध्ये सध्या एकूण 14 दहशतवादी सक्रीय आहेत. भारतीय सेनेने या दहशतवाद्यांची संपूर्ण माहिती मिळवलेली आहे.

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधू काढण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. असं असतानाच आता भारतीय सैन्याने दहशतवाद्यांची एक यादीच केली आहे. त्यामुळे आता भारतीय सैन्य लवकरच मोठी कारवाई कारवाई करण्याची शक्यता आहे.
लष्कर ए तोयबा आणि जैस ए मोहम्मदचे दहशतवादी सक्रीय
मिळालेल्या माहितीनुसार काश्मीरमध्ये सध्या एकूण 14 दहशतवादी सक्रीय आहेत. भारतीय सेनेने या दहशतवाद्यांची संपूर्ण माहिती मिळवलेली आहे. याच माहितीनुसार सोपोर भागात लष्कर ए तोयबाचा एक स्थानिक दहशतवादी येथे सक्रीय आहे. याच यादीनुसार अवंतीपुरा या भागात जैस ए मोहोम्मद या दहशतवादी संगटनेचा एक दहसतवादी सक्रीय आहे. पुलवामामध्ये जैश ए मुहम्मद आणि लष्कर ए तोयबा या दोन्ही दहशतवादी संघटनांचे प्रत्येकी दोन दहशतवादी सक्रीय आहेत.
आणखी कोणत्या भागात किती दहशतवादी?
सोफीयान या भागातही हिजबूलचा एक आणि लष्कर ए तोयबाचे चार, तर अनंतनागमध्ये हिजबूलचचे दोन स्थानिक दहशतवादी सक्रीय आहेत. गुलमाम या भागातही लष्कर ए तोयबाचा एक स्थानिक दहशतवादी सध्या सक्रीय आहे. या सर्वच दहशतवाद्यांची माहिती भारतीय सेनेने काढली आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांचं काय होणार? याकडे सर्वांचच लक्ष असणार आहे.
भारताने आतापर्यंत काय-काय कारवाई केली?
भारतीय सेनेला घाबरून नुकतेच कश्मीर रेजिस्टेंस फ्रंटने तीन दिवसांनी पहलगामच्या हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे आतापर्यंत भारतीय सैन्याने अनेक संशयितांना तांब्यात घेतलं आहे. आतापर्यंत एकूण 7 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. तसेच 2 दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आलंय. त्यानंतर आता भारतीय सेनेने एक यादी तयार केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक पातळीवर सक्रीय असणाऱ्या दहशतवाद्यांची ही यादी असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
आगामी काळात नेमके काय होणार?
दरम्यान, दुसरीकडे भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी मोठे निर्णय घेतले आहेत. यालाच प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही काही भारतविरोधी निर्णय घेतले आहेत. सिंधू जलवाटप करार स्थगित करून पाणी आडवले तर आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ, असा इशारा पाकिस्तानच्या पंतप्रधानाने दिला आहे. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.