PM मोदींच्या दौऱ्यानंतर 20 वर्षात पहिल्यांदा लक्षद्विप होऊ लागले गुगलवर ट्रेंड
PM Modi Visit Lakshadweep : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच लक्षद्विप दौरा केला होता. या दरम्यान त्यांनी अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यांच्या या दौऱ्यानंतर लक्षद्विपबाबत लोकांची उत्सूकता वाढली आहे. लोकं लक्षद्विपबाबत गुगलवर सर्च करु लागले आहे. अनेक सेलिब्रिटींनी देखील लक्षद्विपला भेट देण्याचं आवाहन केले आहे.
Lakshadweep’s Popularity Soars : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 जानेवारी रोजी केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपला भेट दिली होती. यावेळी त्यांनी अनेक फोटो शेअर केले होते.. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, साहसप्रेमींनी एकदा लक्षद्वीपचाही त्यांच्या यादीत समावेश करावा. मोदींच्या या आवाहनानंतर गुगल सर्चमध्ये लक्षद्वीपसाठी लोकांची वाढती आवड दिसून येत आहे. जगभरात, लक्षद्वीपबाबत Google वर लोकं सर्च करु लागले आहेत. गेल्या 20 वर्षांत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात लोकं त्याबाबत सर्च करत आहेत.
लक्षद्वीपसाठी जगभरातील लोकांची उत्सुकता वाढली
एनएआय वृत्तसंस्थेनुसार, लक्षद्वीपकडे जगभरातील लोकांची उत्सुकता वाढण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे पंतप्रधान मोदींना केलेला दौरा. पीएम मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत मालदीवचे मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांनी अपमानास्पद टीका केली होती. यानंतर मालदीवला बायकॉट करण्याऱ्या पोस्ट लोकं करु लागले. मालदीवच्या अनेक टूर कंपन्यांनी रद्द केले. याचा मालदीवला सर्वात मोठा फटका बसला. पण यासोबतच लक्षद्विपबाबतची उत्सूकता वाढली.
पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर भारतातील क्रिकेटर आणि सिनेकलाकार लक्षद्विपला भेट देण्याचं आवाहन करत आहेत. यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला अनेकांचा पाठिंबा मिळाला आहे.
अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या X हँडलवरून एक पोस्ट शेअर केली आहे. याशिवाय सचिन तेंडुलकरने बीचवर क्रिकेट खेळतानाचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.
मालदीवने तीन मंत्र्यांना केले निलंबित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोंवर चुकीच्या कमेंट केल्याने मालदीव सरकारने आपल्या मंत्र्यांना निलंबित केले आहे. याबाबत आता भारतातही रोष वाढू लागला आहे. मालदीव दौऱ्यावर बहिष्कार टाकण्याची मोहीमच सुरु झाली आहे.पं
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर मालदीवच्या काही मंत्र्यांनी अपमानास्पद टिप्पणी केली होती. ज्यामध्ये मालदीवच्या खासदारांनी असा दावा केला की पंतप्रधान मोदी मालदीवचा पर्याय म्हणून लक्षद्विपला पर्यटन स्थळ म्हणून प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अशा कमेंट करणे त्यांना चांगलंच महागात पडलं आहे. सोशल मीडियावर संताप पसरला आहे. अनेक भारतीयांनी नाराजी व्यक्त केली आणि मालदीवमध्ये नियोजित सुट्ट्या रद्द केल्या.
सुश्री अब्दुल्ला यांनी भारतातील लोकांची वैयक्तिक माफी मागितली आणि त्यांना सोशल मीडियावरील #BoycottMaldives मोहीम संपवण्याचे आवाहन केले. त्यांनी भारतीय पर्यटकांना मालदीवमध्ये परत येण्याचे आवाहन केले आणि काही व्यक्तींच्या टिप्पण्यांनी संपूर्ण देशाच्या भावना परिभाषित करू नयेत यावर भर दिला.