Punjab | अडकले मोदी, आठवले गांधी! नेमका काय आहे हा प्रकार जो पुन्हा पुन्हा ट्रेन्ड होतोय?
मोदी विरुद्ध गांधी, अशी लढाई याआधीही सोशल मीडियामध्ये अनेकदा पाहायला मिळालेली आहे. दरम्यान, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबत याच सगळ्याबाबत वेगळं ट्वीट समोर आलं आहे.
सोशल मीडियात (Social Media) मोदी सर्वात जास्त चर्चिले जातात, यात शंका घेण्याचं काहीच कारण नाही. व्हॉट्सअप (WhatsApp), फेसबुकवर (Facebook) मोदींवरचे मेसेज, त्याचे ट्वीट (Tweet), फेसबुकवरच्या पोस्ट (Post) असं सगळं सातत्यानं चर्चेत. अशातच आता मोदी (Narendra Modi) पंजाबातल्या (Punjab) एका फ्लायओव्हरवर 15 ते 20 मिनिटं अडकल्याच्या बातमीनं पुन्हा एक मोदी सगळ्या सोशल मीडियात ट्रेन्ड झाले नसते, तरच नवल. अनेकांनी या घटनेवर वेगवेगळे हॅशटॅग वापरत पोस्ट केल्या आहेत. मात्र या सगळ्या गेल्या काही काळापासून सुरु झालेला एक ट्रेन्ड मोदी विरुद्ध गांधी असा सुरु झाला तो, तो यावेळी बघायला मिळालेलाय.
मोदी पंजाबमध्ये अडकले. पण तरिही लोकांना राजीव गांधी का आठवलेत, असाही एक प्रश्न उपस्थित होतोय. नेमकं यामागचं कारण आहे तरी काय?, हे देखील समजून घ्यायला हवं.
काय झालंय गांधी आठवायला?
त्याचं झालं असं, की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत पंजाबमध्ये मोठी चूक झाली. एका फ्लायओव्हरवर मोदींचा ताफा अडकून पडला होती. पंधरा ते वीस मिनिटं मोदींचा ताफा अडकून पडल्यामुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली. पंजाबमधील आंदोलकांनी हा ताफा अडकवल्याचं बोललं जातंय. दरम्यान, याबाबत आता केंद्रीय गृहमंत्रालयानं पंजाब सरकारकडे स्पष्टीकरणही मागितलं.
राजकारण या गोष्टीवरुन सुरु झालं नसतं, तरच नवल! भाजपनं पंजाब काँग्रेसला या घटनेवरुन तीव्र शब्दांत सुनावलंय. महाराष्ट्रातले भाजपचे नेतेही या घटनेची टीका करत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी या घटनेवर ट्वीट करत निषेध नोंदवलाय. पण एकानं या घटनेच्या निमित्तानं थेट गांधी परिवाराची आठवण काढली आहे.
मोदी विरुद्ध गांधी, अशी लढाई याआधीही सोशल मीडियामध्ये अनेकदा पाहायला मिळालेली आहे. दरम्यान, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबत याच सगळ्याबाबत वेगळं ट्वीट समोर आलं आहे.
प्रत्युश कुमार श्रीवास्तव यांनी हे ट्वीट केलं आहे. प्रत्युश यांनी केलेल्या दाव्यानुसरा 1987 साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर हल्ला झाला होता. एका बंदुकीनं हा हल्ला करण्यात आला होता, असंही ते म्हणालेत. तर दुसरीकडे तामिळनाडूत 1991 साली त्यांची हत्या करण्यात आली होती. दरम्यान, आता पंजाबमध्ये झालेला हा प्रकार हा देखील त्याचप्रकारचा असल्याचं त्यांनी म्हटलंय. याप्रकरणी वेळीच कठोर कारवाई केली पाहिजे. असं प्रत्युश यांचं म्हणणंय. पाच वाजून तेरा मिनिटांनी त्यांनी हे ट्वीट केलंय. या ट्वीटसोबत त्यांनी राजीव गांधीचा एक फोटोही शेअर केला आहे.
1987 when PM Rajiv Gandhi visited Sri Lanka, he was attacked with a gun.
1991 he was assassinated in Sriperumbudur, Tamil Nadu
Today, a similar breach happened within our own country in Punjab with PM Narendra Modi.
ACTION of exemplary nature should be taken. #StandwithModi pic.twitter.com/iK3ZMw7Sqb
— Pratyush Kumar Srivastav (@Pratyus12520262) January 5, 2022
राजकारण जोरात!
दरम्यान, महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील भाजपच्या नेते आणि मंत्र्यांनी पंजाबमध्ये जे झालं, त्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. वाचा कोणत्या राजकीय नेत्यांनी काय म्हटलंय?
नितीन गडकरी यांचं ट्वीट –
पंजाब में प्रधानमंत्री जी की सुरक्षा के साथ खिलवाड़ होना दुर्भाग्यपूर्ण और गंभीर मामला है। पंजाब के लोगों के जीवन में परिवर्तन लाने वाले महत्वपूर्ण परियोजनाओं के उद्घाटन और शिलान्यास कार्यक्रम में प्रधानमंत्री जी को न पहुँचने देना यह पंजाब के लोगों का अपमान है। @narendramodi
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 5, 2022
रावसाहेब दानवेंचं ट्वीट –
प्रधानमंत्री जी की सुरक्षा को बाधित कर आज कांग्रेस ने दुनिया के सबसे विशाल हमारे लोकतंत्र को शर्मसार किया है। पीएम की सुरक्षा में बरती गई लापरवाही कांग्रेस सरकार का अक्षम्य अपराध है। देश और पंजाब की जनता कांग्रेस को इस अपराध के लिए माफ नहीं करेगी।
— Raosaheb Patil Danve (@raosahebdanve) January 5, 2022
जेपी नड्डा यांचं ट्वीट –
In doing they did not bother that the PM was to pay tributes to Bhagat Singh & other martyrs, and lay the foundation stone for key development works. By their cheap antics,Congress Gov in Punjab has shown that they are anti-development & have no respect for freedom fighters too.
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) January 5, 2022
इतर बातम्या –
PM MODI PUNJAB | समजून घ्या, नेमकं मोदींसोबत पंजाबमध्ये काय झालं? सुरक्षेतली चूक की आणखी काही?
VIDEO: दोन-चार पादरेपावटे फुसफुसले म्हणजे सरकारला आग लागत नाही, राऊतांचा विरोधकांवर हल्लाबोल