आयएएस पूजा खेडकर यांचे निमित्त अन् IAS, IPS ची ही प्रकरणेही चर्चेत, वादात आलेले अधिकारी कोण, कोण?
पूजा खेडकर प्रकरणानंतर लोकसेवा आयोगासारख्या देशातील सर्वात महत्वाच्या परीक्षेबाबत संभ्रम निर्माण करणारी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. त्यातच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे मनोज सोनी यांनी मुदतीपूर्वीच राजीनामा दिला आहे. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास अजून पाच वर्षांचा कालावधी राहिला होता.

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची चर्चा देशभरात होत आहे. ती चर्चा कामामुळे नाही तर वादांमुळे आहे. पुण्यात प्रशिक्षणासाठी रुजू होण्यापूर्वी स्वतंत्र गाडी, कॅबिन त्यांना हवी होती. त्यानंतर त्या येथेच थांबल्या नाही. त्यांनी स्वत:च्या खासगी गाडीवर अंबर दिवा लावला. वैभव कोकाट या तरुणाने त्या गाडीचा फोटो ट्विट केला अन् पूजा खेडकर माध्यमांमध्ये चर्चेत आल्या. मग एकामागे एक सुरस कथा त्यांच्या उघड होऊ लागल्या. त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असताना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र मिळवणे, दिव्यांग प्रमाणपत्राबाबत निर्माण झालेला संशय, वेगवेगळे नाव वापरता अकरा वेळा दिलेली लोकसेवा आयोगाची परीक्षा हे सर्व प्रकरण समोर आली. सध्या माध्यमे अन् सोशल मीडियात पूजा खेडकर प्रकरणाची चर्चा जोरात सुरु असताना देशातील काही आयएएस आणि आयपीएसची चर्चा सोशल मीडियात होत आहे. सोशल मीडियावर काही युजर त्यांचे डिटेल शेअर करत आहे. त्यात दावा करत आहे की, त्या अधिकाऱ्यांनीही आरक्षण कोटाचा लाभ घेण्यासाठी चुकीची माहिती देत यूपीएससीची परीक्षा क्रॅक केली. ‘टीव्ही ९ मराठी’ सोशल मीडियावरील या दाव्यांची पुस्टी करत नाही....