Ram Mandir | अयोध्येत प्रभू रामचंद्र विराजमान होताच तब्बल इतक्या हजार लोकांना मिळणार रोजगार
Ram Mandir | 22 जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिराच उद्घाटन होईल. त्यानंतर अयोध्येत दररोज लाखो भाविक येतील. त्यामुळे कुठल्या क्षेत्रात किती हजार नोकऱ्यांची होणार निर्मिती? जाणून घ्या. स्टाफिंग कंपन्यांनी बरेच अंदाज बांधले आहेत. त्यावर अमलबजावणी सुरु होईल.
Ram Mandir | अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठेची तयारी जोरात सुरु आहे. ही धार्मिक बाजू झाली. त्याचवेळी दुसरे सेक्टरसुद्धा ही संधी साधून घेण्यासाठी खूप उत्साहीत आहेत. खासकरुन हॉस्पिटलॅटी, ट्रॅव्हल आणि टूरिज्म सेक्टरला खूप बूस्ट मिळणार आहे. 22 जानेवारीला राम मंदिराच उद्घाटन झाल्यानंतर अयोध्येत दररोज येणाऱ्या भक्तांची संख्या लाखोंच्या घरात जाईल असा अंदाज आहे. भक्तांची संख्या वाढल्यानंतर त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तिन्ही इंडस्ट्रीमध्ये जवळपास 20 हजारपेक्षा जास्त नोकऱ्यांची निर्मिती होईल असा अंदाज आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये नोकऱ्या वाढतील अशी स्टाफिंग कंपन्यांना अपेक्षा आहे. पुढची 20 ते 30 वर्ष अयोध्येला श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या वाढतच जाणार आहे.
रेडस्टँड इंडियामध्ये स्टाफिंग आणि रेडस्टँड टेक्नोलॉजीजे चीफ कमर्शियल ऑफिसर यशब गिरी यांनी सांगितलं की, “अयोध्येत पुढची काहीवर्ष दररोज 3 ते 4 लाख भाविक येतील, ते एक ग्लोबल टूरिज्म सेंटरमध्ये बदलणार आहे” या भागात निवासी व्यवस्था आणि ट्रॅव्हलच्या मागणीत वाढ झाली आहे. अयोध्येच्या हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये वाढ नोंदवण्यात आलीय. भाविकांसाठी पायभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देण्यात येईल. रेडस्टँडला अपेक्षा आहे की, दरवर्षी पर्यटकांची संख्या वाढण्याबरोबरच 20,000-25,000 कायमस्वरुपी आणि तात्पुरते जॉब्स तयार होतील. हॉटेल स्टाफ, हाऊसकिपिंग, फ्रंट-डेस्क मॅनेजर, शेफ आणि टूर गाइड या क्षेत्रात नोकऱ्या वाढतील.
किती हजार नोकऱ्या जनरेट होणार?
“मागच्या सहा महिन्यात हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल आणि टूरिज्मशी संबंधित कमीत कमी 10 हजार आणि जवळपास 20,000 नोकऱ्या जनरेट झाल्या आहेत” असं टीमलीजचे कंज्यूमर एवं ईकॉमर्स वाइस प्रेसीडेंट आणि हेड बालासुब्रमण्यम ए यांनी सांगितलय. यात हॉटल कर्मचारी, शेफ, सर्वर्स, ड्राइव्हरचा समावेश आहे. हॉस्पिटॅलिटी सेक्टरच्या अधिकाऱ्यांनुसार हॉस्पिटॅलिटी मॅनेजर्स, रेस्टॉरंट आणि हॉटल कर्मचारी, लॉजिस्टिक्स मॅनेजर्स, ड्राइवर्स आदी क्षेत्रात नोकऱ्या या वर्षाच्या अखेरीस किंवा 2025 च्या पहिल्या सहा महिन्यात ओपन होण्याची शक्यता आहे. फक्त अयोध्येतच नाही, लखनऊ, कानपूर, गोरखपूरमध्ये मागणी आणि पुरवठा याची काय स्थिती असेल, यावर हॉटेल कंपन्या आणि रेस्टॉरंट मालकांची नजर असेल.