हिमाचल प्रदेशातही मुख्यमंत्री बदलणार? जयराम ठाकूर यांना तातडीने दिल्लीचं बोलावणं

हिमाचल प्रदेशमध्येही (Himachal prasdesh) मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु झाल्या की काय असा प्रश्न तयार झाला आहे. कारण, मुख्यमंत्री जयराम ठाकूर (CM Jairam Thakur) यांना दिल्लीला (Delhi) बोलावण्यात आलं आहे. 2 दिवसांआधीच ते दिल्लीहून शिमल्याला परतले होते. दिल्लीत त्यांनी अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या. मात्र, आता पुन्हा एकदा जयराम ठाकूर यांना दिल्लीला बोलावण्यात आल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

हिमाचल प्रदेशातही मुख्यमंत्री बदलणार? जयराम ठाकूर यांना तातडीने दिल्लीचं बोलावणं
Himachal CM Jairam Thakur
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 4:04 PM

शिमला: हिमाचल प्रदेशमध्येही (Himachal prasdesh) मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरु झाल्या की काय असा प्रश्न तयार झाला आहे. कारण, मुख्यमंत्री जयराम ठाकूर (Himachal prasdesh CM Jairam Thakur) यांना दिल्लीला (Delhi) बोलावण्यात आलं आहे. 2 दिवसांआधीच ते दिल्लीहून शिमल्याला परतले होते. दिल्लीत त्यांनी अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या. मात्र, आता पुन्हा एकदा जयराम ठाकूर यांना दिल्लीला बोलावण्यात आल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. दिल्लीला बोलवण्यामागे गुजरात पॅटर्न (Gujrat) असल्याची चर्चा सध्या दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. ( After reaching Shimla, BJP recalled Himachal Pradesh Chief Minister Jairam Thakur to Delhi  BJP CM Change Gujrat CM )

जयराम ठाकूर यांना दिल्लीला कशासाठी बोलावण्यात आलं?

गुजरातमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या अगदी एका दिवसानंतर जयराम ठाकूर यांना शिमल्याहून परत बोलावण्यात आलं आहे. दिल्लीहून ते परतलेच होते, की त्यांना तातडीने पुन्हा दिल्लीत येण्यास सांगण्यात आलं. यातच आता काँग्रेस नेत्यांना मुख्यमंत्र्यांवर भाष्य करण्याची आयती संधी मिळाली. हिमाचलचे मुख्यमंत्री बदलासाठीच त्यांना दिल्लीत बोलावण्यात आल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, भाजपकडून या सर्व गोष्टींचं खंडन करण्यात आलं आहे. भाजपच्या म्हणण्यानुसार, हे आधीच घोषित झालं आहे की 2022 च्या विधानसभा निवडणुका, भाजप जयराम यांच्याच नेतृत्त्वात लढणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या या चर्चांमध्ये दम नसल्याचं भाजप नेत्यांकडून सांगण्या आलं आहे.

6 दिवसांआधीच जयराम दिल्ली दौऱ्यावर

हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर हे मागच्या आठवड्यात दिल्लीतच वास्तव्यास होते. 8 सप्टेंबरपासून ते दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेतल्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्यासोबतची त्यांची चर्चा झाली. हेच नाही तर जयराम ठाकूर यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतली आणि त्यांना हिमाचलच्या विशेष विधानसभा सत्रात उपस्थित राहण्याचं आमंत्रणही दिलं. दिल्ली दौऱ्यानंतर जयराम हे मध्यप्रदेशात गेले, तिथं त्यांनी उज्जैनला भेट दिली. त्यानंतर रविवारी ते दिल्लीहून विमानाने शिमल्यात पोहचले. मात्र,शिमल्यात पोहचताच, दिल्लीहून पुन्हा बोलावणं आलं आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्लीला जावं लागलं. आज जयराम हे भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत. कदाचित या बैठकीत हिमाचलच्या पोटनिवडणुकीवर चर्चा होऊ शकते. हेच नाही तर हिमाचलच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचीही शक्यता असल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

काँग्रेसचं काय म्हणणं आहे?

कुल्लूच्या ढालपूरमध्ये काँग्रेसने मोठी रॅली काढली, या रैलीत काँग्रेसने मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्यावर कडक शब्दात टीका केली. काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंह म्हणाले की, उत्तराखंड, कर्नाटक आणि गुजरातनंतर हिमाचलमध्येही रात्रीत मुख्यमंत्री बदलू शकतात. जयराम ठाकूर यांचं अपयशी सरकार राज्यात असल्याची टीका त्यांनी केली. शिवाय, भाजपला काँग्रेसचा हिमाचलमधला चेहरा कोण असेल, याची चिंता करण्याची गरज नाही. काँग्रेस हायकमांड तो निर्णय घेण्यास सक्षम असल्याचं विक्रमादित्य म्हणाले. जयराम यांनी आपल्या खुर्चीची काळजी करावी, रात्रीत चेहरे बदलले जाऊ शकतात, भाजपची हीच पद्धत असल्याचं विक्रमादित्य म्हणाले.

हेही वाचा:

रुपाणी, नितीन पटेल यांच्या नेतृत्वातच निवडणूक लढवण्याची भाजपची भाषा कशी बदलली?; 27 दिवसात निर्णय फिरवण्यामागचं गौडबंगाल काय?
बिल्डर ते लीडर, भूपेंद्र पटेलांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, नितीन पटेल म्हणाले, मान सन्मान महत्वाचा !

 

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.