काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी केले नरेंद्र मोदींचे कौतुक, राहुल गांधींबद्दल म्हणाले..

आझाद यांचे मोदी यांच्याशी जवळकीचे संबंध असल्याचे त्यांनी काँग्रेस सोडल्याचा आरोप करण्यात येतो आहे, त्यावर त्यांनी उत्तर दिले आहे. मोदी हे तर निमित्त आहे. काँग्रेस नेतृत्व आपल्यावर चिडलेले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जी-२३ ने पत्र लिहून पक्षश्रेष्ठींना काही सूचना केल्या होत्या. पक्षश्रेष्ठींना कधीही वाटत नव्हते की कुणी आपल्याला प्रश्न विचारावेत. कुणी त्यांना पत्र लिहाले. त्यानंतर कितीतरी काँग्रेसच्या मिटिंग झाल्या मात्र त्यात कोणतीही सूचना मान्य करण्यात आली नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी केले नरेंद्र मोदींचे कौतुक, राहुल गांधींबद्दल म्हणाले..
काँग्रेस नेतृत्वावर प्रश्नचिन्हImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 10:23 PM

नवी दिल्ली – काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर गुलाम नबी आझाद (Gulam Nabi Azad)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे कौतुक केले आहे. आझाद म्हणाले की, मी त्यांना कठोर व्यक्ती समजत होतो, पण त्यांच्य़ात माणुसकी आहे. मला वाटत होते की, त्यांना बायको नाही, मुले नाहीत त्यामुळे त्यांना कुणाची पर्वा नसेल, पण असे नाहीये. यावेळी आझाद यांनी काँग्रेसच्या कार्यकारी समितीवरही (congress working committee) टीका केली आहे. ते म्हणाले की या समितीचा काहीही उपयोग नाही. चौकीदार चोर आहे, ही घोषणा केळ राहुल गांधी यांची होती. त्या घोषणेच्या समर्थनासाठी कुणीही पुढे आले नव्हते.

राजीनामा दिल्यापासून झोपलेलो नाही- आझाद

राजीनामा देण्यापूर्वी आणि दिल्यानंतर सहा दिवस झोपू शकलेलो नाही, असेही आझाद यांनी सांगितले आहे. या पक्षाला मी आपल्या रक्ताने घडवले आहे. या पक्षात आता कुठून तुठन लोकं आली आहेत, जे कोणत्याही उपयोगाचे नाहीत. ते आता आमच्याशी मुकाबला करीत आहेत. ज्यांना स्वताचे घरही माहित नाही ते आम्हाला प्रश्न विचारीत आहेत, अशी टीका आझाद यांनी केली आहे.

सोनिया गांधी यांच्याबाबत 30वर्षांपूर्वी होता, तेवढाच आदर आजही आपल्या मनात असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांच्याबाबतही आहे, कारम ते इंदिरा गांधी यांच्या परिवारातील आहेत. राजीव आणि सोनिया यांचे पुत्र आहेत. वैयक्तिक पातळीवर त्यांना दिर्घायुष्य मिळावे, हच आपली भावना आहे. आम्ही त्यांना एक सफल नेते करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते त्याला राजी नव्हते.

हे सुद्धा वाचा

मोदी हे तर निमित्त आहे, काँग्रेस माझ्यावर चिडलेली आहे- आझाद

आझाद यांचे मोदी यांच्याशी जवळकीचे संबंध असल्याचे त्यांनी काँग्रेस सोडल्याचा आरोप करण्यात येतो आहे, त्यावर त्यांनी उत्तर दिले आहे. मोदी हे तर निमित्त आहे. काँग्रेस नेतृत्व आपल्यावर चिडलेले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जी-२३ ने पत्र लिहून पक्षश्रेष्ठींना काही सूचना केल्या होत्या. पक्षश्रेष्ठींना कधीही वाटत नव्हते की कुणी आपल्याला प्रश्न विचारावेत. कुणी त्यांना पत्र लिहाले. त्यानंतर कितीतरी काँग्रेसच्या मिटिंग झाल्या मात्र त्यात कोणतीही सूचना मान्य करण्यात आली नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मोदींसोबत ते मी नव्हे – आझाद

मोदींसोबत असल्याची टीका आपल्यावर करण्यात येते, मात्र मोदी आणि भाजपाची स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी जे कारणीभूत ठरले तेच मोदींसोबत आहेत. अशी टीकाही आझाद यांनी केली आहे.

सोनियांनी विश्वास ठेवता तेव्हा चांगले निकाल दिले होते

1998 ते 2004 सालापर्यंत सनिया गांधी वरिष्ठ नेत्यांचा सल्ला घेत असत. त्या त्यांचा सल्ला ऐकतही असत, त्यांना विचारल्याशिवाय निर्णय घेत नसत. त्यांनी आपल्याकडे 8 राज्यांची जबाबदारी दिली होती. त्यातील सात राज्यांत आपण विजय मिळवून दिला होता. त्यामुळे त्यांनी कधीही कामात हस्तक्षेर केला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यानंतर राहुल गांधी आले, त्यामुळे 2004 नंतर सोनिया गांधी वरिष्ठ नेत्यांचे ऐकण्याएवजी राहुल यांचे ऐकायला लागल्या. राहुल यांच्याकडे सल्ला देण्यासारखा अनुभव नाही. तरीही सोनियांना वाटत होते की सगळ्या नेत्यांनी राहुल यांच्या सांगण्याप्रमाणे काम करावे.

मोठ्या नेत्यांवर वैयक्तिक हल्ले योग्य आहेत का?

आझाद म्हणाले की – आमचे राजकारणाचे शिक्षण इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात झाले आहे. त्यावेळी आम्ही ज्युनियर होतो, त्यावेळी त्या आम्हाल सांगत की तुम्ही अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी भेटत जा. आपल्यापेक्षा मोठ्यांना मान द्यायला हवा, विरोधातील नेत्यांनाही तितकाच सन्मान द्यायला हवा, जेवढा आपण पार्टीतील नेत्यांना देतो. मात्र राहुल यांचे धोरण केवळ मोदी यांच्यावर हल्ला करणे हे आहे.

राहुल गांधी यांच्याबाबत कुठलाही व्यक्तिगत द्वेष नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राहुल एक चांगले व्यक्ती आहेत, पण त्यांच्याकडे हार्ड वर्क करण्याची कुशलता नसल्याचे आझाद यांनी सांगितले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.