Sharad Pawar | ‘मनात कोणीही संभ्रम ठेऊ नका, मी कधीच…’ शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

Sharad Pawar | दिल्लीत महत्वाच्या बैठकीत शरद पवार काय म्हणाले?. दिल्लीत शरद पवार यांनी पुण्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत.

Sharad Pawar | 'मनात कोणीही संभ्रम ठेऊ नका, मी कधीच...' शरद पवार यांचं मोठं वक्तव्य
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 9:15 AM

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पुण्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सोमवारी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही महत्वाची बैठक पार पडली. आज दिल्लीतच भाजपा प्रणीत NDA ची महत्वाची बैठक होणार आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र आणि गोव्याच्या 48 खासदारांशी संवाद साधणार आहेत.

सायंकाळी 6 वाजता नवीन महाराष्ट्र सदनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याआधी काल शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली.

शरद पवार यांचा गट विरोधी पक्षात

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी बंडाच निशाण फडकवलं. राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुतांश आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा आहे. हा गट सत्तेत सहभागी झाला आहे. त्याचवेळी शरद पवार यांचा गट विरोधी पक्षात आहे. शरद पवार गटातील आमदारांची संख्या कमी आहे. त्यामुळेच त्यांना विरोधी पक्षनेते पद काँग्रेसला सोडाव लागलं.

शरद पवार यांनी काय महत्वाच वक्तव्य केलं?

राष्ट्रवादी काँग्रेसमधील सद्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी महत्वाच वक्तव्य केलं आहे. “मी कधीच कॉम्प्रोमाईज करणार नाही. मनात कोणीही संभ्रम ठेऊ नका. आपण भाजपबरोबर जाणार नाही. आगामी निवडणूकीच्या दृष्टीने पक्षाची बांधणी करा आपला विचार लोकांपर्यंत घेऊन जा” असा शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला. मनात संभ्रम न ठेवता काम करा असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांच्या भूमिकेवरुन नेहमीच विरोधकांकडून राजकीय संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. मागच्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर होते. त्यावरुन विरोधक शरद पवार यांना लक्ष्य करत आहेत. त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.